या वस्तू आजच घराबाहेर काढा, कितीही पैसा कमवा यामुळे सेविंग झीरोच राहणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, घरात प्रवेश करताना रितसर वास्तूशांत केली जाते. सुवासिनी, ब्राह्मण भोग केले जातात. वास्तू उभी राहताना त्यात काही दोष नसतात. पण, जेव्हा लोक त्या वास्तूत रहायला जातात तेव्हा त्यांना त्रास सुरू होतो.

बऱ्याचदा काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशावेळी आपल्याला काही वास्तूदोष असल्याचंही सांगण्यात येतं.

तुम्हाला जर घरामध्ये सुखशांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरात देखील काही वास्तूबदल करावे लागतात. त्यासाठी नक्की काय उपाय करायचे असतात याबाबतीत बऱ्याच टिप्स असतात.

घरात अशा काही गोष्टी असतील ज्या अत्यंत वाईट अवस्थेत आहेत किंवा भग्न पावल्या आहेत तर घरातून या गोष्टी हद्दपार करा. या गोष्टी नकारात्मकतेला आमंत्रण देणाऱ्या ठरतात.

घरात अनेक मोठी माणसे काही गोष्टींसाठी मनाई करत असतात. या गोष्टी अनेक शतकांपासून चालत आल्या आहेत. यातीलच एक बाब म्हणजे गरम तव्यावर पाणी टाकणे. गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये.

हे तुम्ही अनेक जणांकडून ऐकले असेल. मात्र त्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने त्याचा येणारा आवाज छन हा चांगला नसतो.

यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होते. घरातील सदस्याला यामुळे आजार होऊ शकतो. असंही म्हटलं जातं की गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो.

असा पाऊस विध्वंसेचे कारण बनू शकतो. यासाठी वडीलधारी मंडळी असे न करण्यास सांगतात. तव्याचा संबंध राहुशी जोडलेला असतो. यासाठी तव्याची योग्य ती साफ-सफाई न केल्यास मोठ्या समस्येचे कारण बनू शकते.

वास्तुशास्त्रानुसार तवा किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जो बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही. तवा नेहमी लेटून ठेवावा. उभा करून ठेवणे योग्य नाही. देवांची चित्रे : घरामध्ये देवांची अव्यवस्थित अवस्थेत असलेली चित्रे ठेवणे योग्य नाही.

देवदेवतांचे हे असे फोटो वाईटाला आमंत्रण देतं. अशा प्रतिमा घरात ठेवल्याने आर्थिक नुकसानीचीही शक्यता आहे. असे फोटो घरात असल्यास तात्काळ ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.

फाटलेले कपडे : वास्तुशास्त्रानुसार फाटलेले कपडे कुटुंब आणि घरातील शांती नष्ट करतात. फाटलेले कपडे जास्त काळ घरात राहिल्यास वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो. अशाने घरात दारिद्र्यही येते.

तुटलेल्या वस्तू : घरात कोणतीही तुटलेली किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नका. अशा वस्तू जास्त काळ घरात राहिल्यास वास्तुदोष वाढतो. नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही वाढतो.

छताची स्वच्छता : घराचे छत कधीही अस्वच्छ ठेवू नये. घराचं छत हे तुमचं उन,वारा,पाऊस यापासून रक्षण करतं. ज्यानं आपलंं रक्षण केलं आहे ते छत कधीही अस्वच्छ ठेवू नये. घराचे छत, खिडक्या आणि दरवाजे ही लक्ष्मीच्या येण्याची तीन स्थानं आहेत.

काही खास चित्रे : ताजमहाल, बुडणाऱ्या बोटी किंवा जहाजे, कारंजे, वन्य प्राणी, काटेरी झाडे यांची चित्रे घरात लावू नयेत. वास्तुनुसार, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते. अशी चित्र घरात शोभेसाठी ठेवली असतील तर ती आजच घराबाहेर काढा.

कोळ्याची जाळी : घरात कोळी अगदी सहज पाहिला जातो. कोळी कोपऱ्यांमध्ये आपलं जाळं विणतो. मात्र हे जाळं म्हणजे वाईटाचं लक्षण मानलं गेलं आहे. कोळ्याचं जाळं घरात राहिल्यास त्याचे नकारात्मक परिणाम घरावर पडतात.

तुटलेले फर्निचर: फर्निचरमुळे घराला शोभा येते. मात्र कालांतराने हेच फर्निचर खराब होतं किंवा तुटतं. अशावेळेस घरातलं तुटलेलं किंवा खराब झालेलं फर्निचर बदलण्याचा सल्ला दिला जातो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *