दिवाळी येण्याआधी या गोष्टींचं विसर्जन करा नाहीतर दिवाळी करून काही उपयोग होणार नाही….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवघ्या काही दिवसात दिवाळी येणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन आहे. आता सणवार सुरू झाले आहेत. दसरा, कोजागिरी पौर्णिमा व धनतेरस, दिवाळी अशा रीतीने हिंदू धर्मातील सण असतात. दिवाळी हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. हिंदू वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो. आपण सगळेच खूप उत्साहात साजरा करत असतो.

दिवाळी येण्याआधी आपण घर स्वच्छ करत असतो. आपल देवघर स्वच्छ करत असतो. नवीन वस्तू आणत असतो. देवघरात सजावट करत असतो. घरादाराची सजावट करत असतो. परंतु तुम्ही तुमच्या देवघरात बघितले की तुमच्या देवघरामध्ये काहीतरी चुकीचे तर नाही ना?

इतकं सारं करून काही छोट्या चुका होतात ज्यामुळे आपलं नुकसान होत असते. म्हणून दिवाळी येण्याआधी देवघरातून या पाच मूर्ती किंवा पाच फोटोंच तुम्ही विसर्जन करा.

हे फोटो आणि या मुर्त्या आपल्या देवघरामध्ये कधीच नसायला पाहिजे आणि ठेवायलाच नाही पाहिजे पण चुकून आपल्याकडून ते ठेवले जातात, त्यांची पुजा-अर्चना सुद्धा केली जाते,

पण याचे परिणाम हे वाईट होऊ शकतात किंवा काहीतरी आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून तुमच्या देवघरात सुद्धा या मुर्त्या किंवा या फोटो असतील तर नक्कीच त्यांचे विसर्जन करा. त्या

पहिले म्हणजे महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती, तुमच्या घरामध्ये महादेवाचा फोटो अथवा महादेवाची मूर्ती असेल तर लगेच त्यांचे विसर्जन करा. एकदा बघून घ्या की तुमच्या देवघरातून त्या फोटोमध्ये महादेव आहेत का किंवा मूर्ती महादेवाची आहे का असेल तर लगेच विसर्जन करा. महादेवाची फक्त पिंडी पुजली जाते हे तुम्ही लक्षात ठेवा.

आता दुसरं म्हणजे हनुमानाचा फोटो किंवा हनुमानाची मूर्ती. हनुमानाचा सुद्धा फोटो आणि मूर्ती पूजन होत नाही. देव घरात ठेवायला नाही पाहिजे. हनुमान फक्त मंदिरात असतात. त्यांची पूजा फक्त मंदिरात केली जाते. घरात नाही. तुमच्या घरात हनुमानाची मूर्ती, हनुमानाचा फोटो असतील तर त्वरित विसर्जन करा.

यानंतर आहे लक्ष्मी माताची उभी असलेली मूर्ती किंवा उभा असलेला फोटो. लक्ष्मी माता कधीही बसलेल्या स्वरूपात असावी आणि तिच्या दोन बाजूला हत्ती असावे. लक्ष्मी माता एक कमळावर बसलेली असावी.

घरामधील लक्ष्मी माता उभे असतील किंवा कोणत्या प्राण्यावर बसलेली असेल तरीही त्या फोटोचे, त्या मूर्तीचे विसर्जन करावे. माता लक्ष्मी कमळावर बसलेली पाहिजे. तिच्या आजूबाजूला नेहमी दोन हत्ती पाहिजेत.

नंतर आहेत, कोणत्याही देवांच्या देवघरात असलेल्या मोठ्या मुर्त्या! तुमच्या घरात कोणतीही मूर्ती असते, काही मोठे असते, मोठ्या म्हणजे खूप मोठ्या, तुमच्या हातापेक्षा मोठ्या ,पण मोठ्या मूर्ती असतील तर त्यांचे सुद्धा तुम्ही विसर्जन करावे.

मोठ्या मुर्त्या देवघरात पुजल्या जात नाहीत. त्या फक्त मंदिरात पूजतात. या पाच मुर्त्या आणि फोटो जे आहेत ते म्हणजे महादेवाचा फोटो किंवा मूर्ती, हनुमानाची मूर्ती किंवा फोटो,

लक्ष्मी माता उभी असलेली मूर्ती, किंवा लक्ष्मी माता कोणत्या प्राण्यावर बसलेली असली ती मूर्ती किंवा तो फोटो आणि शेवटचं कोणत्याही देवांच्या मोठ्या स्वरूपात असलेल्या मुर्त्या, देवघरात ठेवायला नाही पाहिजेत.

याचे तुम्ही विसर्जन करा. विसर्जन कसे करावे? विसर्जन करायचे असेल तर एखादा शुभ दिवस निवडावा, गुरुवार, शुक्रवार, सोमवार निवडावा. त्यादिवशी त्या देवांना फुले हार वाहावेत.

अगरबत्ती ओवाळावी. दिवा लावावा आणि एक नैवेद्य त्यांच्यासाठी बनवावा. गोड-धोड काहीतरी नैवेद्य बनवावा आणि प्रार्थना करावी. पूजा अर्चना करावी. आरती करावी . त्यानंतर त्या देवांची विसर्जन आपण करू शकतो.

त्यांचे विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यात करू शकता किंवा कोणत्यातरी मंदिरात जाऊन त्यांना ठेवू शकता. अशा रितीने त्यांच तुम्ही विसर्जन करू शकता.पण दिवाळी येण्याआधी तुम्ही ह्या पाच मूर्ती किंवा पाच फोटो तुमच्या देवघरातून काढून त्यांचे विसर्जन नक्की करा. नाहीतर अशुभ संकेत मिळू शकतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *