उद्या श्रावणातील शेवटचा शनिवार, सात जन्माची गरिबी पाप जाईल फक्त हे करा….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना इच्छित फळ मिळते. तसेच त्यांच्या आशीर्वादाने आनंदी जीवन जगता येते. श्रावणातील सोमवारप्रमाणेच शनिवारचेही खूप महत्त्व आहे.

शनिदेवाचा हा उपाय शनिवारी केल्याने भगवान शंकराचा आशीर्वादही मिळतो अले म्हटले जाते. भगवान शंकराच्या कृपेने शनिदेवाचा कोणताही दुष्प्रभाव होत नाही. ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि धैय्याचा कोप असतो त्यांनी श्रावण शनिवारी हे उपाय करावेत.

शनिवारी करवंदाच्या झाडाचे दर्शन घेऊन करून त्याच्या मुळास पाणी अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या करिअरशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

शनिवारी भरणी नक्षत्रात स्नान करून आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि मंदिरात जाऊन 51 कापसाचे दान करा. असे केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते असे म्हणतात.

शनिवारी पाण्यात थोडे दही टाकून स्नान करा आणि मंदिरात जाऊन कापूर दान करा. हे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या वागण्याने कोणालाही प्रभावित करू शकाल.

श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या दिव्यात तीळ टाका.श्रावण शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती खायला दिल्यास कुंडलीतील राहू-केतूशी संबंधित दोष दूर होतात.

शिवलिंगावर केवळ जल अर्पण केल्यास शनिदोषापासून मुक्तता होते. या महिन्यात शिवपूजा केल्याने अविवाहित लोकांनाच इच्छित जीवनसाथी प्राप्त होतो तसेच या महिन्यात सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात.

केवळ पाणी अर्पण करून आपण आपल्या कुंडली मधील अनेक दोष दूर करू शकतात. पितृ दोष निवरण्यासाठीही हा महिना खूप महत्वाचा आहे. शिवलिंगावर केवळ जल अर्पण केल्यास पितृ दोष आणि याशिवाय काळ सर्प दोष यातुन सुटका होते.

कोणताही भक्त जो भीती, चिंता किंवा मानसिक तणावाने त्रस्त आहे, तो श्रावण महिन्यात काही उपाय करून या समस्या आणि मानसिक आजारांपासून मुक्त होऊ शकतो.

श्रावण महिन्यात भक्ताने जलाभिषेक आणि रुद्राभिषेक खऱ्या मनाने केल्यास खूप फायदा होतो. जर कोणी रोज स्नान करून भगवान शिवाला जल अर्पण करून सोम सोमया नमः मंत्राचा जप केल्यास त्याचा मानसिक ताण दूर होतो.

श्रावण महिन्याच्या शनिवारी महादेवांना कच्च दूध अर्पण केल्यास आणि काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खाऊ घातल्यास भक्तांना महादेवांसह शनीदेवही अर्पण होतात. परिणामी त्यांच्या आयुष्यात आनंदमयी घटना घडतात. विशेषतः रखडलेली कामं मार्गी लागतात.

आपलीही काही कामं रखडली असतील, आपल्या जन्म पत्रिकेत शनी अशुभ स्थितीत असेल, आपल्याला शनीदोष असेल, आपण अडचणींचा सामना करत असाल तर उद्या श्रावणात महादेवांसह शनीदेवाचीही मनोभावे पूजा करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *