नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. भारतात हिन्दी धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तूम्हास तूळस नक्कीच दिसेल. तुळस वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.
त्यामुळे तूळस भारतीयांच्या मनाशी जूळलेले रोपटे आहे. आपल्या घरातील , अंगणातील तुळशीला शास्त्रात खूप महत्व आहे, तुलसी माता साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेची रोज सकाळी लवकर उठून पूजा केल्यास अनेक लाभ होतात.
तुळशीचे रोप नसेल तर नक्की आणा आणि कुंडीत लावा व तिचे पूजन करून तुमच्या घरासाठी प्रार्थना करा. तसेच सायंकाळी तुळशीत दिवा लावून नमस्कार रोज करत जा,
असे नित्य केल्याने माता लक्ष्मी व त्यांना प्रिय असणारे भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यामुळे कोणत्याही कामात विघ्न येत नाहीत व घरात वाईट, नकारात्मक ऊर्जा येत नाही.
तुळशी च्या रोपट्याजवळ किंवा तुळशीच्या वृंदावनाजवळ या पाच वस्तू चुकूनही ठेऊ नका, किंवा तुळशीच्या बाबतीत या चुका होण्यापासून टाळा आणि ज्या ठिकाणी या चुका होतात त्या ठिकाणी माता तुळशी वास करत नाही
आणि परिणामी अश्या घरातुन माता लक्ष्मी सुद्धा निघून जाते. त्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, गरिबी निर्माण होते, त्या घरातील व्यक्तींचे जे भाग्य आहे, नशीब आहे, ते त्याना साथ देत नाही .
पहिली गोष्ट म्हणजे शिवलिंग…. बऱ्याच ठिकाणी आपण असे पाहतो की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवलेल असते. बऱ्याच जणांना असे वाटते की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल,
घरासाठी ते खूप शुभकारक ठरेलं, मात्र लक्षात ठेवा कधीही चुकून देखील कोणत्याही तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू नका, तुम्ही जे पाहिलेलं आणि ऐकले आहे ते शिवलिंग नाही तो शाळीग्राम आहे.
तुळशीमध्ये आपण शिवलिंगाची स्थापना करु नका, शाळीग्राम आणि शिवलिंग हे दिसायला अगदी सारखे असतात मात्र शाळीग्राम हे भगवान विष्णूच रूप आहे तर शिवलिंग हे शिवशंभू महादेवाचं रूप आहे
आणि आपल्याला माहित असेल तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते, भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी शाळीग्राम स्थापन करा.
त्याने आपल्याला खूप सारे फायदे होतील मात्र शिवलिंग ठेऊ नका, त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती निर्माण होतात, आपल्या नशिबामध्ये दुर्भाग्य येते. दुसरी गोष्ट गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ लावू नका.
बऱ्याच जणांचे असं होते की मुख्य दाराची चौकट असते म्हणून एखादा गणपतीचा फोटो लावलेला असतो, आणि मग अगदी जवळ त्या ठिकाणी तुळशीचं रोपटं लावलेलं असत,
अशा प्रकारची चूक तुम्ही चुकूनही करू नका, कारण गणपती बाप्पांनी तुळशी मातेला श्राप दिला होता कि, ‘तू माझ्या जवळ कधीही येऊ शकणार नाही’ कि गणपती मध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी दोन हातांच अंतर नक्की ठेवा.
तिसरी गोष्ट अशी की… आपण बरेचदा असे करतो की, आपल्या घरातील जो कचरा असतो तो कचरा गोळा करून त्या दाराजवळ आणून ठेवतो किंवा बरेचदा असे होते कि, आपल्या अंगणामध्ये जे तुळशी वृंदावन असते ते आपल्या दरवाजाच्या समोर असते
आणि मग सगळा कचरा गोळा करून आपण त्या वृंदावणाजवळ तुळशीजवळ नेऊन साठवतो आणि नंतर तो गोळा करून टाकला जातो, तुळशी वृंदावनाजवळ कधीही कचरा साठवू नका ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे
किंवा तुळशीजवळ कचरा पडू देऊ नका, तुळशीजवळ जितकी स्वच्छता आपल्याला राखता येईल तितकी राखा, आपण जितके सात्विक राहू तितका जास्त फायदा आपल्याला होईल.
तुळशीजवळ कचरा साठल्याने तिथे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मग माता तुळशी असो किंवा अन्य कोणतेही देवता असो त्यांना अस्वछता अजिबात आवडत नाही
आणि म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी जास्त वेळ राहतं नाही. बरेचजण आपले कपडे धुतल्यानंतर त्या ठिकाणी सुखायला, कपडे वळायला टाकतात. मित्रानो तुम्ही जे कपडे वाळायला घालत ते कपडे चुकूनही माता तुळशीजवळ जाणार नाही याची काळजी घ्या,
किंवा तुळशीजवळ हे कपडे वाळायला घालू नका. बऱ्याच ठिकाणी असे देखील होते कि या कपड्यांचे पाणी त्या तुळशीवरती पडते किंवा या कपड्याची सावली देखील आपल्या तुळशीच्या रोपट्यावर पडत असते त्यामुळे मोठया प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिति होते.
पुढची गोष्ट आपली पाण्याची टाकी… बरेचजण दारासमोर जागा नसते, अंगण नसत, ज्यांचा फ्लॅट वगैरे आहे किंवा जे बंगल्यामध्ये राहतात त्यांच्या घरासमोर जागा असते आणि जर असा प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरामध्ये किंवा आपले जे छत असते
त्या छतावरती तुळस लावली जाते किंवा जे आपले टेरेस ची जागा असते किंवा बरेचजण बाल्कनी चा आधार घेतात, बाल्कनी मध्ये सुद्धा रोपटं लावतात. उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी हे रोपटं लावण्याचा प्रयत्न करा,
तुम्ही तुमचे जे छत आहे त्यावरती जर तुळशीचं रोपटं लावल असेल आणि त्याच्याजवळ जर पाण्याची टाकी असेल तर पाण्याच्या टाकीपासून आपलं रोपटं हे कमीत कमी चार ते पाच हात लांब असावं याची काळजी नक्की घ्या
किंवा या पाण्याच्या टाकीची सावली सुद्धा आपल्या तुळशीच्या रोपट्यावरती पडू देऊ नका. कारण याचे अत्यंत नकारात्मक परिणाम घडत असतात.
बऱ्याच ठिकाणी देवपूजा करताना जी घंटी वापरली जाते किंवा पाणी घालताना जो तांब्या वापरतात तर तुळशीला पाणी घालतात तो तांब्या त्याच ठिकाणी त्या रोपट्याजवळ ठेवला जातो,
किंवा वृंदावनामध्ये घंटी आणि तांब्या ठेवला जातो न करता घंटी आणि तांब्या त्या ठिकाणी ठेऊ नका, त्यासाठी आपण वेगळी जागा करावी कारण धर्मशास्त्रानुसार हे अमान्य आहे.
शेवटची गोष्ट चपला किंवा बूट… तुळशी वृंदावना जवळ चपला ठेवतात तर असे करू नका. कारण ती एक पवित्र जागा आहे म्हणून अशा ठिकाणी चपला किंवा बूट ठेवणे टाळा तर अशा या गोष्टीची काळजी घ्या माता लक्ष्मी आणि माता तुळशी व भगवान विष्णू आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील.
हिन्दू लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामांपासून वाचवते. तुळशीतील प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणामुळे हे प्रत्येकास हवेहवेसे वाटते.
तूळसपानाचा चहा पिल्यास ताजेतवाने वाटते. शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्टया व्यक्ती प्रबळ होतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.