अर्जंट पैसे हवे असतील तर लिहा हा नंबर..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपला विश्वास कदाचित बसणार नाही पण हे खरे आहे. कोणतीच गोष्ट जादूने घडत नाही. पण जदुसारखी नक्कीच होऊ शकते. म्हणजे थोडे जरी प्रयत्न केले तर त्याचा अनपेक्षित परीणाम नक्कीच दिसेल शास्त्रातील काही टोटके उपाय आपल्या जिवनात नक्कीच बदल घडवून आणू शकतात.

पैसा मिळवण्यासाठी दिवस रात्र धडपडतो खूप कष्ट करतो. मध्ये अनेक जणांना प्रारब्धामुळे नशिबामुळे पैसा मिळून जातो. ते जादा श्रीमंत बनतात. मात्र काही कमनशिबी लोक असे असतात की दिवस रात्र मेहनत करून सुद्धा काबाड कष्ट करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही.

अशाच लोकांसाठी एक अत्यंत प्रभावशाली एंजल नंबर असेही म्हणतात. गरीब असो श्रीमंत असो तुम्हाला जितक्या पैश्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे, मनोकामना आहे.

तितके पैसे स्मरण करत, तितके पैसे प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत हा एंजल नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर लिहायचा आहे. जितक्या काही रुपयांची इच्छा आहे.

तितकी मेहनत करण्याची, कष्ट करण्याची बुद्धी पणाला लावण्याची तुमची स्वतःची तयारी असायला हवी. जसं की लॉटरीचे टिकट १० रुपयांचे काढले आहे. त्यावर १ लाखांचे बक्षीस असेल तर त्यातून १ लाखच मिळतील.

१ करोड मिळणार नाहीत. अगदी त्याच प्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, कार्य करत आहात. त्यातून जितका पैसा मिळायला हवा तितकाच तो मिळणार आहे.त्यापेक्षा जास्त मिळणे अशक्य आहे.

कदाचित काहीजण ज्याला आपण गुप्त धन असे म्हणतो जे अचानक आपल्याजवळ येऊ लागते. कोणतीही अपेक्षा नसताना अशा प्रकारे सुद्धा धन प्राप्ती होऊ शकते. हा आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे.

हा जो नंबर आहे हा एंजल नंबर आहे. हा नंबर आपण आपल्या डाव्या भागावर लिहायचा आहे. लिहिण्यासाठी लाल रंगाच्या शाईचा वापर करायचा आहे.

काळी शाई चुकूनही वापरू नये. त्याचे उलटे परिणाम प्राप्त होतात. आहे तो पैसा सुद्धा निघून जातो. असा वाईट अनुभव काही जणांना आलेला आहे. त्यामुळे आवर्जून सांगतो की लाल शाईचा वापर करा.

तुम्ही लाल स्केचपेन वापरू शकता. त्याचा वापर करून आपण आपल्या डाव्या अंगठया ला नंबर आपण लिहायचा आहे. हा उपाय केवळ एक दिवस करून चालणार नाही.

प्रत्येक शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यावर आपण या लाल रंगाच्या शाईने हा नंबर लिहायचा आहे. डाव्या हाताच्या अंगठ्यावर खाली ज्या ठिकाणी पहिल्यांदा लिहाल. त्याच ठिकाणी अगदी वारंवार गिरवायचा आहे.

लिहिताना त्याचा उच्चार करा. तोंडाने बोला. हा जो नंबर आहे त्याचा जप करा. तो नंबर आहे. 1221 हा जादुई एंजल नंबर आहे. हा नंबर तुम्ही लिहिताना जेव्हा तुम्ही हा नंबर लिहिताय तेव्हा तुम्हाला जितकी रक्कम हवी आहे. जितका पैसा हवा आहे.

पैश्यांची अपेक्षा आहे. ती रक्कम आपण आपल्या मनामध्ये धरायची आहे. इतकी रक्कम, इतका पैसा, इतके धन मला मिळायलाच हवे. जर तुम्ही 1 लाख म्हणताय, 50 हजार तर नक्की येतील.

1 करोड म्हणताय 50, 60 लाख नक्की येतील. तुमचे पैसे कमविण्याचे जे सोर्स आहेत त्यातून जितका पैसा मिळू शकतो, जसं त्या 10 रुपयाच्या तिकिटावर 1 लाखाचीच लॉटरी लागणार आहे.

जर तुम्हाला 1 कोटींची पाहिजे तर तुम्हाला तिकीटाची रक्कम वाढवावी लागेल. म्हणजे 10 रुपयांचे नव्हे 100, 1000 रुपयांचे तिकीट काढावे लागेल. म्हणजे तुम्हाला खूप जास्त पैसा हवा आहे तुमची अपेक्षा आहे तर कष्ट सुद्धा तितके जास्त करावे लागतील.

बुध्दी सुद्धा तितकीच पणाला लावावी लागेल. कारण या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. आज तुम्हाला जे श्रीमंत लोक दिसत आहेत त्यांनी त्यांचं शरीर खपवलेले आहे.

जास्तीत जास्त वेळा जप करा. कमीत कमी 60 दिवस नित्य नियमाने दररोज उठल्यावर या मंत्राचा जप करा.

अंघोळ केल्यावर या नंबरचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी लिहिला आहे तो पुसटसा होणार आहे. तो पुन्हा लिहा लाल रंगाच्या शाईने. रिझल्ट्स तुमच्या समोर असतील.

प्रत्येक वेळी गिरवताना लक्षात घ्या तुम्ही जी रक्कम मनात ठेवली आहे ती रक्कम आपण पुन्हा पुन्हा बोलायची आहे.

अत्यंत प्रभावशाली असा हा नंबर आहे.कोणताही उपाय करताना किंवा कोणतीही उपासना करताना आपल्या इष्ट देवी देवतांचे नामस्मरण करत जा.

अजून एक ट्रिक म्हणजे पांढरा शुभ्र कागद आणि हिरव्या शाईचा पेन घ्या, एक बॉक्स काढा वरती 786,नंतर 10,खाली 23 नंतर 12 व बॉक्स खाली ओम ऱ्ही नमः हा बीज मंत्र लिहा.

ही घडी घालून गव्हाच्या पिठात मळून गाढा आणि हा गोळा तुम्ही शुद्ध जल पाणी वाहते पाणी नदीचे तिथं विसर्जित करा.

त्याच सोबत आपण ज्या गुरु मानतो त्याचे सुद्धा नामस्मरण करत जावे यामुळे आपल्यात एक प्रकारची शक्ती निर्माण होते.

ज्यामुळे अशक्य असणारे काम सुद्धा शक्य होते. तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा बोला कारण ईश्वर कृपेनेच आपल्याला ते प्राप्त झालं आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!