नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये, महिषासुराचे माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांसोबतचे युद्ध 9 दिवस चालले होते. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला,
तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजाविधी केली जाते.
देवी सिंहाची स्वारी करत असली तरी नवरात्रीच्या काळात ती पृथ्वीवर आल्यावर तिचे वाहन बदलते. माता जगदंबेच्या आगमनाची तारीख नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवसावर अवलंबून असते.
म्हणजेच ज्या दिवशी नवरात्रीची सुरुवात होते त्या दिवसाच्या आधारावर त्यांचे वाहन ठरते. यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे.पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.24 वाजता सुरू होईल
आणि 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 12.03 वाजता समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात.
घटस्थापना केवळ शुभ मुहूर्तावर केले जाते, यामुळे देवी दुर्गा घरात 9 दिवस निवास करते. कलश स्थापना मुहूर्त – सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 असणार आहे.नवरात्राच्या पहिल्या दिवशी कार्याच्या संपन्नतेसाठी प्रार्थना करून घटस्थापना करण्याची प्राचीन परंपरा आणि पद्धत आहे.
देशातील कोट्यवधी घरांमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत रुढ आहे. तर काही ठिकाणी मोठ्या मंडळांमध्येही दुर्गादेवीसह घटस्थापना केली जाते. घरातील सुख, शांतता समृद्ध होण्यासाठी नवरात्रातील संपूर्ण दिवस घटस्थापना करून दुर्गा देवीचे पूजन केले जाते.
या वर्षी नवरात्र रविवार, 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी संपेल. दसरा विजयादशमी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
यावेळी शेरावली माँ सिंहावर नव्हे तर हत्तीवर स्वार होऊन येणार आहे.देवी भागवत पुराणात माँ दुर्गेच्या सवारीचे तपशीलवार वर्णन केले आहे. देवी पुराणातही या विषयावर एक श्लोक आहे जो पुढीलप्रमाणे आहे –
शशिसूर्ये गजरुधा शनिभौमे तुरंगमे । गुरु शुक्रे डोलायन बुधे नौका प्रकीर्तिता ॥ या श्लोकाचा अर्थ असा आहे की सोमवार आणि रविवारपासून नवरात्र सुरू होते तेव्हा माँ दुर्गेचे वाहन हत्ती असणार.
त्याचबरोबर मंगळवार आणि शनिवारपासून नवरात्र सुरू होत असेल तर मातेचे वाहन घोडा मानले जाते. पण, गुरुवार किंवा शुक्रवारपासून नवरात्र सुरू झाल्यास माँ दुर्गा डोलीत बसून येते.
बुधवारी कलशाची स्थापना झाल्यावर माता दुर्गा बोटीवर बसून येते. यावेळी शारदीय नवरात्रीला माँ दुर्गा हत्तीवर बसून येणार आहे. देवी पुराणानुसार हे खूप शुभ संकेत आहे. हत्तीवर स्वार होऊन माँ दुर्गेचे आगमन पाऊस आणि शेतीसाठी अतिशय शुभ मानले जाते.
अशा परिस्थितीत आजूबाजूला हिरवळ असेल. यासोबतच भरपूर अन्नधान्य उत्पादनही होईल.देवी भागवत या ग्रंथात सांगितले आहे की जेव्हाही नवरात्रीचा पहिला दिवस सोमवार किंवा रविवारी येतो तेव्हा मातेचे वाहन हत्ती असते.
या दिवशी, नवरात्रीच्या वेळी, माता देवी हत्तीवर स्वार होऊन येते. मातेचे वाहन सिंह असले तरी माता जेव्हा पृथ्वीवर येते तेव्हा ती वेगवेगळ्या वाहनांमध्ये येते. देवीच्या या वाहनांचे आगमन आणि त्याचे परिणाम देवी भागवत पुराणात तपशीलवार वर्णन केले आहेत.
देवी भागवत पुराणानुसार, हत्तीवरून मातेचे आगमन खूप शुभ असणार आहे. देवी जेव्हा हत्तीवर स्वार होऊन येते, तेव्हा ती आपल्यासोबत भरपूर आनंद, ज्ञान आणि समृद्धी घेऊन येते.जेव्हा-जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा देशात धनसंपत्ती वाढते.
यासोबतच धान्याची दुकानेही भरली जाणार आहेत. देशात सुख-समृद्धी नांदेल. हत्तीवर स्वार होऊन आईचे येणे हे येत्या वर्षभरात पाऊस चांगलाच पडणार असल्याचे द्योतक आहे. 23 ऑक्टोबरला नवरात्री संपणार आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.