अधिक महिन्यात शुक्रवारी दान करा या वस्तू, पैसा कधीच कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते. कर्ण हा आपल्या दानशूरपणासाठी आजही ओळखला जातो.

कोणतेही धार्मिक कार्य असले की, यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, असे संस्कार आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू असल्याचे दिसतात.

अधिक महिन्यातही दानधर्म करण्याविषयी काही पुराणात, शास्त्रांमध्ये उल्लेख आल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही घालून दिल्याचे दिसून येते.

अधिक महिना व्रत-वैकल्ये, उपास, दान, पूजा, यज्ञ, हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे पापकर्मांचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते.

या कालावधीत दान केलेला एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा,

श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप, तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्ये केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.

याशिवाय, दीपदान, वस्त्र तसेच भागवत कथा ग्रथांचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य फलदायी मानले गेले आहे. असे केल्याने धन, वैभव, धान्य वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी आणि संतोषी मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने केवळ सुख आणि समृद्धी मिळत नाही तर शुक्र ग्रहाला बळ मिळते.

ज्योतिषी सांगतात की जर मुलांच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर त्यांचे लग्न लवकर होते. तसेच माँ लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. शुक्रवारी या वस्तूंचे दान केल्यास फळ मिळते.

शुक्रवारी या वस्तूंचे दान करा.विवाहित महिलांना शुक्रवारी लाल रंगाचा श्रृंगार करून बांगड्या, साडी, सिंदूर, कुंकुम इत्यादी दान करा.

असे केल्याने मां लक्ष्मी प्रसन्न होते. एवढेच नाही तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

शुक्रवारी गरीब आणि गरजूंना जुनी पुस्तके किंवा जुने जोडे इत्यादी दिल्याने शुभ होते. या दिवशी मीठ दान केल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात.

असे मानले जाते की शुक्रवारी रेशमी कपडे, जुनी चादर इत्यादी वस्तू दान केल्याने घरात आनंदाचे वातावरण राहते. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येतो.

शुक्रवारी विधवेला पांढरे वस्त्र दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते. वास्तूनुसार घरात कचरा ठेवू नये. शुक्रवारी रद्दी पेपर कोणत्याही गरजूला मोफत द्या. असे केल्याने लक्ष्मीही प्रसन्न होते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *