अमावस्येला ही लक्षणे दिसली तर तुमच्यावर काळी जादू झाली आहे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्राचीन काळापासून काळी जादू किंवा तंत्र-मंत्र मान्यता चालू आहेत. काही लोकांचा यावर विश्वास आहे तर काही लोकांच्या मते ही अंधश्रद्धा आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात.

अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते.

करणी म्हणजे विशिष्ट अर्थाने वापरला जाणारा शब्द नसून मंत्र तंत्राच्या भाषेत सर्व प्रयोगांसाठी सामान्यपणे वापरला जातो करणी म्हणजे मांत्रिक अथवा तांत्रिक प्रयोग समूह वशीकरण वगैरे त्याचबरोबर मंत्र-तंत्र व भानामती भूत-पिशाच्च अंगावर सोडणे इत्यादी सर्व प्रकार करणीचेच आहेत.

तसेच भानामती हा तांत्रिक बाहुल्यांचा खेळ आहे यात अघोरी साधना आणि विशिष्ट प्रकारच्या भावल्यांचे साधन केले जाते व त्याच्याकडून कोणतेही कार्य करून घेतले जाते वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे कापड वापरून भावल्या बनवतात.

तसेच त्यात भरण्याच्या वस्तू देखील वेगवेगळ्या असतात या बाहुल्या कडून शत्रूच्या घरात उत्पात घडवणे माणसांना आजारी अथवा भ्रमिष्ट बनवणे भयभीत करणे घरातील वस्तू नष्ट अथवा अदृश्य करणे,

परस्परात भांडणे लावणे ,गर्भपात घडवणे , आग लावणे , हिरवी झाडे जाळून टाकने, अंगावरचे कापड जाळणे अंगावर बीबव्याच्या फुल्या उमटवणे त्वचेस सुया टोचल्या प्रमाणे त्रास होणे या प्रकारे असतात ,

चेटूक किंवा चेटकी करणे , हा पण बाहुल्यांचा खेळ आहे भानामती मध्ये 96 बाहूंल्या असतात त्यांची चेटूक मात्र 2 ते 8 बाहुल्यानी करतात चेटकाने माणूस भ्रमिस्ट व आजारी होतो .

शूद्र करणी जर केली असेल तर यात अनेक उपप्रकार आहेत, घाणेरडा वास येणे शिजवलेले अन्न , दूध इत्यादी नासून जाणे, सतत अंगावर बोचल्याच्या भावना होणे, खूप अशक्‍तपणा येणे व भीती वाटणे यासारखी लक्षणे या तऱ्हेने होतात.

तसेच हा प्रकार जास्त करून पाहायला मिळतो मूठ मारण म्हणजेच हा प्रकार अघोरी असून ज्या व्यक्तीस मूठ मारली जाते ती तरफडून त्रास होउन आजारी पडून ओकून मृत्यू पावतो मुठ मुठ मारण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गोटे वापरतात

हा मुठ मारण्यासारखा प्रकार आहे परंतु यात एका मडक्यात तांदूळ ज्वारी अथवा कडधान्य भरून ते अभिमंत्रित करतात ते मडके लक्ष असलेल्या व्यक्तीच्या घराजवळ फोडून त्यातील धान्य तिकडे पडल्याने त्याला खूप भयानक पीडा होते ,

यानंतर पितर सोडणे म्हणजे पितर किंवा खेडा कोकणी देव वगैरे नावांनी ओळखले जाते गोल गोटे अभिमंत्रित अथवा पिशाच्चभारित करून ते एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबावर किंवा घरावर सोडतात

हे पितर चेडा अनेक प्रकारे उत्पात करून त्या व्यक्तीस त्रस्त करतात इतर अदृश्य रूपात राहून त्या व्यक्तीस मारहाण करतात त्या मारण्याच्या खुणा शरीरावर स्पष्ट दिसतात त्रास पीडा यातना देने असे प्रकार करतात .

भूत बाधा व भूत सोडणे हा एक प्रकार आढळतो, मृत व्यक्तीच्या वासना , शरीर वातावरणात भ्रमण करीत असतात असे वासना शरीर जेव्हा एखाद्या व्यक्तीस झपाटते तेव्हा त्यास भूतबाधा असे म्हणतात

परंतु जेव्हा एखादे पिशाच मंत्राने बांधून त्याचे एखाद्या व्यक्तीस त्रास देण्यास पाठवलेले असते तेव्हा त्यास भूत सोडणे असे म्हणतात हे विविध प्रकारचे उपद्रव निर्माण करून त्या व्यक्तीच्या बुद्धीवर ताबा मिळवून तिला बडबड व विचित्र कर्म करायला भाग पाडते त्रास देते.

करणी करणे हा शब्द संस्कृत ‘कृ’ या धातूपासून बनला असून त्याचा अर्थ एखादी क्रिया एखाद्या व्यक्तीकडून हेतू परस्पर केली जाणे असा होतो तर ही बाधा वाईट परिस्थिती व निसर्ग नियमाने अथवा अपघातामुळे आपोआप होते.

त्रास , भांडणे होऊन पीडा होते म्हणून करणी केली व बाधा झाली असे म्हणतात . वरील लक्षणे जर दिसत असतील तर तुम्हाला करणीबाधा झाली आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!