नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे.
त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा झाला असून, ८ श्रावणी सोमवार करण्याची संधी मिळणार आहे. हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकमास हा यंदा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास १६ ऑगस्टला संपणार आहे.या वर्षी मंगळवार, १८ जुलैपासून अधिक मास सुरू होईल आणि १६ ऑगस्ट रोजी संपेल.
चांगली गोष्ट म्हणजे अधिकमास सुरू होण्याआधीच १५ जुलैला श्रावण शिवरात्री संपेल, पण रक्षाबंधनाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. साधारणत: रक्षाबंधनाचा सण श्रावण शिवरात्रीच्या १५ दिवसांनीच साजरा केला जातो, मात्र अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात ४६ दिवसांचे अंतर राहील.
अधिक महिन्याला खरमास असेही म्हटले जाते. खरमास म्हणजे खराब महिना. दुसऱ्या अर्थाने सांगायचे झाले, तर ज्या महिन्यात शुभ कार्ये करणे वर्जित मानले गेले आहे, असा महिना म्हणजे खरमास. सूर्य दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो.
सूर्याच्या या राशीबदलाला ‘सूर्यसंक्रांत’ अथवा ‘सूर्य संक्रमण’ असे म्हणतात. मात्र, अधिक महिन्यात सूर्य रास बदलत नाही. त्यामुळे सृष्टी मलिन झाल्यासारखी भासते, म्हणून याला मलमास असेही म्हणतात. अधिक महिन्यात सूर्य प्रतिकूल असल्याचे मानले गेले आहे.
यासाठी या कालावधीत हाती घेतलेली नवीन कामे पूर्णत्वास जाऊन यशप्राप्ती होईलच, असे नाही, अशी लोकमान्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी अधिक महिना शुभ मानला जात नाही, असे म्हटले जाते.
सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी,पूजा पाठ करावेत. स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठण करावे.
या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, श्री रामकथेचे पठण, विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे.
या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप दररोज १०८ वेळा करावा.
अधिकमास सुरू होईल. या अधिकमासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास पण म्हणतात. या दरम्यान परंपरा आहे की या दरम्यान लोक गरजवंतांना धन किंवा धान्याचे दान केले तर ते शुभ असते.
या मासात दान आणि पुण्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे दान किंवा पुण्य केले ते दुप्पट तर होते आणि ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर ठरते.
अधिक मासात व्रत, उपवास आणि पूजा आणि दान करण्याचे अत्याधिक महत्त्व आहे. आपल्या कुवतीप्रमाणे व्यक्तीने दान केले पाहिजे. तसेच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की रात्रीचे दान केला नाही पाहिजे.
काही स्थितीत रात्री दान केले जाऊ शकते. जसे यज्ञ, विवाह, संक्रांती, चंद्र किंवा सूर्यग्रहण.गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस.
तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, मुकदमा करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, जनहिताची कामे करणे, सेवा कार्य करणे यात दोष नाही.
मेष- चांदी, लाल कपड़े, डाळिंब, मालपोहा, तूप, केळी, सोने, तांबे आणि गहू,वृषभ- मोती, वाहन, सफेद वस्त्र, मालपोहा, मावा, चांदी, सोने, साखर, गाय, हिरे, तांदुळ, केळी
मिथुन- बांगड्या, सिंदूर, साड़ी, मूर्तीसाठी छत्र, पन्ना, मूगाची डाळ, सोने, तेल, केळी, मालपोहा, काशाची भांडी ..
कर्क- मावा, दूध, साखर, मालपोहा,तांदुळ, मोती, चांदी, सफेद कपड़े, पाणीपोईत माठ, तेल, सोने, गाय
सिंह- धार्मिक पुस्तकें, लाल कपड़े, सोने, चांदी, तांबे, पितळ, गहू, डाळिंब सफरचंद, मसूर, माणिक्य
कन्या- तेल, केले, सफरचंद, मुगाची डाळ, सोने, छत्र, गोशाळेत धन आणि गवत…तुला- साखर, सफेद कपड़े, तांदुळ, केले, मालपोहा आणि मावा
वृश्चिक- मौसंबी , डाळिंब, तूप, गहू, लाल कपड़े, तांबे…धनु-लाकडाचे सामान, पिवळे कपड़े, तीळ, धान्य, दूध, चण्याची डाळ, तूप,
मकर आणि कुंभ राशी- तेल, औषध, केळी, अवजार, निळे कपड़े, लोहा, मौसमी फल….मीन- चण्याची डाळ, तूप, दूध, पिवळे कपड़े आणि दूधाने बनवलेली मिठाई,
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.