13 जुलै, कामिका एकादशी, भगवान विष्णूंना दाखवा हा नैवेद्य, सात पिढ्या बसून खातील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू दिनदर्शिकेनुसार उद्या गुरुवार,13 जुलै, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी असून ती कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. त्यास पवित्रा एकादशी असेही म्हणतात. यावेळी कामिका एकादशी विशेष आहे कारण ती केवळ गुरुवारीच भगवान विष्णूला समर्पित दिवस आहे.

या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवतांचीही पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या दानधर्माला अधीक महत्व आहे. असं म्हणतात की कामिका एकादशीची कथा श्रीकृषष्णाने धर्मराज युधिष्ठिरास सांगितली होती. या आधी वशिष्ठ मुनींनी दिलीप राजास सांगितली होती.

ही कथा ऐकून त्यांना पापांपासून मुक्ती मिळाली आणि मोक्ष प्राप्तीी झाली. कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूचे ध्यान केल्यावर कामिका एकादशीला नवस करुन पूजा करावी. यानंतर अखंड, चंदन, फुले, धूप, दिवे इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करावी.

फळे आणि मिठाई अर्पित करावे. विष्णूला लोणी-साखरेचा नवैद्य दाखवावा व तुळशीचे पान अर्पित करावे. तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी. यानंतर, कामिका एकादशीची कथा ऐकावी. पूजेच्या शेवटी भगवान श्री विष्णूची आरती करा. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पत्र जरूर अर्पण करा,

पण या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नका. त्यासाठी आधीच आदल्या दिवशी आणून ठेवावेत. तुळशीला या दिवशी विशेष महत्व आहे. तसेच या दिवशी तुम्ही सायंकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा,

यानंतर अजून एक दिवा तुम्ही तुळशीत लावायचा आहे. दिवा लावून तुळशीला नमस्कार करा व प्रदक्षिणा घाला. त्यानंतर तुळशी मातेसमोर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय

या मंत्राचा 21 वेळा जप करा. असे केल्यास तुमचं भाग्य जागे होईल, भगवान विष्णूंचा आशीर्वाद पाठीशी राहील. कामिका एकादशीचे व्रत मनोभावे आचरल्यास ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तता होते, असे मानले जाते.

आषाढ महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीनंतर व्रत-वैकल्यांचा, सण-उत्सवांचा श्रावण मास सुरू होतो. त्यामुळे या कामिका एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!