या अधिक महिन्यात जावयाला वाण आणि कोणकोणत्या वस्तू द्याव्यात? लेकीची ओटी कशी भरावी?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना देखील म्हटलं जातं.

महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो.

या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा अर्चा करुन पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं.

चैत्रापासून फाल्गुनापर्यंत म्हणजे 12 महिन्यात 355 दिवस असतात, तर नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस हे 365 दिवस असतात. याचा अर्थ 10 दिवस तीन वर्षांनी 30 झाल्यावर अधिकचा महिना येतो.

वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर म्हणजे साधारण 33 महिन्यांनंतर येत असतो. म्हणून या महिन्यात 33 या आकड्याला तेवढंच महत्त्व आहे. म्हणून या महिन्यात 33 वस्तूचं दान, वाण, जणांना अन्नदान, जोडप्यांसह सामुहिक पूजा केली जाते.

या वर्षी श्रावण महिन्यात अधिक महिने असल्याने, सावन महिना 59 दिवसांचा म्हणजेच 2 महिन्यांचा असणार आहे. दर 3 वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो.

ज्याला अधिक मास म्हणतात. अधिक मास ही काळाची परिस्थिती अनुकूल करण्यासाठी केली जाते. हिंदू धर्मात आदिमासला खूप महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी जुलै महिन्यात अधिक महिने येत आहेत.

म्हणजे आणखी एक हिंदू महिना. अधिक महिन्यांमुळे हे वर्ष 12 नव्हे तर 13 महिन्यांचे असणार आहे. सनातन धर्मात अधिमास हा पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ व पुण्यपूर्ण महिना मानला जातो.

18 जुलै, मंगळवारपासून अधिक मास किंवा माल मास सुरू होत आहे. अधिक मासला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण त्याचे स्वामी भगवान श्री हरी विष्णू आहेत. असे मानले जाते की या महिन्यात केलेले धार्मिक कार्य आणि उपासना पाठ अधिक फळ देतात आणि मोक्ष प्राप्त होतो.

हिंदू सण आणि महिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नात्यातील ऋणानुबंध आपसूक दृढ होतात. हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पतीपत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महीने आणि उत्सव करत असतात.

अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना ‘नारायणा’ समान भासतो.

अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.

यंदा अधिकमास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो. अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण.

विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.नवीन लग्न झालेल्यांसाठी या महिन्याचे विशेष महत्व असते.

सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात. तसेच, काही ठिकाणी या महिन्यात जावयाला घरी बोलवले जाते, त्याला गोडा-धोडाचं जेवण दिलं जातं. त्याचं मानपान आणि त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे.

तर हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रुप मानलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रुप मानून पूजा केली जाते.

म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तूपातील 33 अनारसे दिले जातात. एका चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिलं जातं.

यालाच जावयाचं वाण असं म्हणतात. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे.

म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं.

जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात.

म्हणूनतुम्हा जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देऊन. 33 दिव्याने जावयाला नक्की औक्षवान करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *