नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या अंगणातील खूप झाडे अशी असतात जी घरात भरभराट आणतात, लक्ष्मी घरात सदैव नांदते, पैसे इतके येतात की तुम्ही नेहमीच श्रीमंत राहता. अशी पाच झाडे किंवा त्यातील एक कोणतेही झाड जे तुमच्या घरी असायलाच हवे.
ही झाडे जर असतील तर तुमच्या प्रगतीला, धन संपत्तीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ही झाडे तुमच्या घरी आहेत का ते पाहून घ्या किंवा नसतील तर नक्कीच लावा ज्यामुळे तुमच्या घरातील अलक्ष्मी निघून जाईल आणि घरात सुख नांदेल.
अंगणातील झाडे ही घराचं सौंदर्य वाढवतात, काही झाडे सौंदर्यच नाही तर आपलं भाग्य, नशीब बदलून टाकतात. समाजात मान, प्रतिष्ठा ही झाडे तुम्हाला मिळवून देतात, ही झाडे जर असतील तर तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.
आपल्या भारतीय संस्कृतीत मानाची काही झाडं आहेत त्यांची आपण पूजा करतो, त्यात देव बघतो, अशामध्ये एक महत्वाचे झाड म्हणजे अंगणातील तुळस. ही तुळस प्रत्येकाच्या अंगणात असणं गरजेचं आहे.
यामध्ये साक्षात माता लक्ष्मी चा वास असतो त्यामुळे आपल्याला तिचे आशिर्वाद प्राप्त होतात आणि तिची कृपा बरसते. तुळशीचे महत्व आयुर्वेदात सुद्धा सांगितले आहे . जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर तुळशीचे झाड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावावे.
दुसरं जे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड. केळीचे झाड ज्या घरी असेल त्या लोकांना मानसिक आरोग्य लाभते. मनाला शांती लाभते. अशा घरात नेहमी शांती नांदते. घराच्या ईशान्य दिशेला तुम्ही हे झाड लावू शकता. हे झाड लावल्याने घरात सुखाबरोबर समाधान लाभते.
तिसरे झाड हे शमीचे झाड आहे , जे तुमचे सर्व दोष नाहिशे करतात. तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहू जर वक्र असेल तर नक्की तुम्ही हे झाड घरासमोर लावलं पाहिजे.
त्यामुळे हे झाड तुमच्या कुंडलीतील दोष नक्की हटवेल. तुम्ही हे झाड लावल्यावर दररोज सायंकाळी त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर तुमचे दोष नाहीसे होतील.
चौथे झाड आहे रुईचे झाड. पांढरी रुई ही धनलाभ होण्यास मदत करते. ज्यांना अतिशय जलद गतीने पैसा हवाय त्यांनी हे झाड तुमच्या घरासमोर नक्की लावा.
हे झाड तुमच्या घरात सुख, पैसा, समृद्धी येते. घराच्या उत्तर दिशेला हे झाड लावा. फक्त धनलाभ नव्हे तर शत्रूंवर विजय मिळवून देण्याच काम हे झाड करत, तसेच वैवाहिक जीवनात नाते संबंध सुधारण्याचे काम हे झाड करते.
पाचवे जे झाड आहे ते आहे मनी प्लांट. हे झाड तुम्ही बाजारातून स्वतः विकत घ्यायचं नाही तर ते शेजारी किंवा कुठून तरी हस्तगत करायचे आहे. हे झाड तुम्ही घरी लावायचं आहे जे कधीही सुकू द्यायच नाहीये.
नेहमी हिरवेगार ठेवायचे आहे. हे झाड घर सुखी ठेवायला मदत करते, तसेच नाते संबंध दृढ करते. हे झाड जर असेल तर तुमची भरभराट नक्कीच होईल.
अशा प्रकारे ही पाच झाडे तुम्हाला ऐश्वर्य, धनलाभ, सुख प्रदान करतील ज्र तुम्ही तुमच्या घरी यांची लागवड करून काळजी घेतली तर!
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.