नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, यंदाची दिवाळी ही ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ही १५ नोव्हेंबरला संपणार आहे. दिवाळीची सुरूवात ही वसुबारसच्या सणाने होणार आहे. ९ नोव्हेंबरला गुरूवारी वसूबारसचा सण आहे. या दिवसाची पूजा कशी करायची? या पूजेचा मुहूर्त काय? दिवाळीला अवघे काही दिवस राहिले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने कोरोना संकटातही बाजार मर्यादित स्वरुपात खुले होऊ लागले आहे. दिवाळीसाठी आकाश कंदील, फराळाचे साहित्य, नवनवीन वस्त्रे,
लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावेळी लागणारी सोने-चांदीची नाणी, नवीन दागिने यांच्या खरेदीचा जोर आता वाढलेला दिसत आहे. या दिवशी सोने-चांदीसह काही अशा वस्तू आहेत, ज्या घरात आणणे समृद्धीकारक ठरते.
दिवाळीची सुरूवात ही वसूबारसच्या सणाने होते. यंदा वसूबारस ही ९ नोव्हेंबरला आहे. ९ नोव्हेंबरला गुरूवारी हा सण साजरा केला जाणार आहे. वसूबारसच्या दिवशी गाई-वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.
यामुळे लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी केरसूणीची पूजा केल्यानंतर वापरल्याने अनेक वास्तू दोष नाहीसे होतात. तसेही झाडूचा अपमान केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो असे मानले गेले आहे.
त्यामुळे तुम्ही जर दिवाळीतील नवीन झाडूची पूजा केल्यास, लक्ष्मी माता तुमच्या परिवारावर प्रसन्न होत असते. तसेच याशिवाय तुमच्या घरातील दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडूची पूजा केली जाते आणि जुनी झाडू की बाहेर काढली जाते. अशी मान्यता किंवा हिंदू परंपरा आहे.
आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसूबारस आहे. वसूबारसच्य दिवशी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे. वसूबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा करतात.
लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसूबारसच्या दिवशी गाई-वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी गाई-वासराची पूजा करताना घरातील सूवासिनी गाईच्या पायांवर पाणी घालतात, हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात.
शिवाय, ज्यांच्या घरी गुरे, गाई-वासरू आहेत, त्यांच्या घरी वसूबारसच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. गाईला कुंकू-हळद आणि अक्षदा वाहिल्यानंतर तिला निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाई-वासराला खायला दिला जातो.
या दिवशी अंगणात छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरूवात केली जाते. रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा या दिवशी लावला जातो.
तसेच, या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. हे पदार्थ गाई-वासराला खाऊ घातले जातात. हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरूवात केली जाते.
कारण दिवाळीच्या काळात असे बरेच लोक करीत असतील, तुमच्या पैकी ही भरपूर लोक नवीन झाडू दिवाळीच्या वेळेस घेत असतील आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करत असतील आणि जुनी झाडू बाहेर काढत असतील.
तर अनेक लोकांना नवीन झाडू खरेदी करण्याचा दिवस किंवा वेळ माहिती नसते. त्यामुळे बरेच लोक असतील, ते दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीचा 1,2 दिवशी आधी खरेदी करत असतात आणि इतर सामानाबरोबर झाडू विकत घेत असतात, परंतु झाडू घेण्याचा खास दिवस असतो.
तुम्ही कोणत्याही दिवशी झाडू घेऊ शकत नाही, तसं तर घेतली तर काही अडचणी येत नाहीत. परंतु शास्त्रानुसार एक शुभ दिवस असतो, त्याच दिवशी आपण ही झाडू घ्यायचे असते.
कारण झाडू सुद्धा लक्ष्मी मातेच्या एक रूप मानले जाते.तर दिवाळीच्या पूजेसाठी झाडू एका विशिष्ट दिवशी आणला पाहिजेत. नोव्हेंबर मध्ये वसुबारस मग त्यानंतर दिवाळी सुरू होईल. तर तुम्ही दिवाळीच्या पूजेसाठी झाडू घेत आहात किंवा इतर वर्षभरात आपल्याला साफ-सफाईसाठी झाडू लागतो,
तेव्हा आपण घेतो. तरीही झाडू फक्त शनिवार या दिवशी घेतली गेली पाहिजे, मग की दिवाळीच्या पूजेसाठी असेल किंवा घरात वापरण्यासाठी आपण झाडू घेत असाल, शास्त्रानुसार तर ती फक्त शनिवारच्या दिवशी घेतली गेली पाहिजे.
त्यामुळे येत्या काळात आता दिवाळीच्या आधी येणारा पहिला शनिवार असतो, त्या दिवशी तुम्ही ही झाडू घेतली पाहिजे. तुम्ही दिवाळीच्या वेळेस झाडूची पूजा करत असाल तसेच नवीन झाडू घरात आणत असाल,
तर ती जाणारी आणि यावेळेस आधी कोणत्याही एका शनिवारी दिवशी तुम्ही झाडू विकत घेऊ शकता. असा प्रकारे तुम्ही तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा बरसवू शकतात,त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात निवास करेल..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.