फक्त ही 1 वस्तू लगेच जवळ ठेवा, लोक जवळ यायला तडफडतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अशक्य काही नाही. आपण करत राहायचं. रामभक्त श्री हनुमान आपल्या बलशाली व्यक्तित्वामुळे प्रसिद्ध आहेत. ते चिरंजीवी आहेत म्हणजेच सूक्ष्म रीतीने ते अजूनही भूतलावर वास करत आहेत.

त्यामुळे ते आपल्या साधनेला लवकर प्रसन्न होऊ शकतात जर आपण शुद्ध मनाने त्याचे स्मरण केले तर. मंगळवार हा मारुतीचा मानला जातो, त्यामुळे घरातील कोणतीही समस्या जर तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही काही उपाय मंगळवारी करू शकता.

कारण बजरंगबली हनुमान यांची ऊर्जाशक्ती या दिवशी अधिक कार्यशील असल्याने केलेला उपाय हा अधिक फलीभूत ठरतो. यामुळे तुमचं जीवन संपूर्ण आनंदी बनेल. तुम्ही जर शुद्ध मनाने,

हनुमानजिना शरण गेलात तर पवनपुत्र हनुमान प्रसन्न होतील. घरातील सर्व समस्या यामुळे दूर होतील. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करावी, लाल रंगाचे कपडे वापरावेत.

महाबली, बजरंगबली हनुमान यांना संकटमोचन म्हणले जाते. मंगळवारी हनुमानच्या मंदिरात किंवा घरी त्यांची प्रतिमा स्थापून त्यासमोर हा उपाय करू शकता. यामध्ये तुम्ही चार कापसाच्या वाती घेऊन त्याचा चार वातींचा दिवा या प्रतिमेसमोर एक छोटा विधी करून प्रज्वलित करायचा आहे.

त्यामुळे तुमचं संकट नक्की दूर होईल व घरात सुख शांती नांदेल.हनुमंताला लाल रंग अतिशय प्रिय आहे. हा उपाय करण्यापूर्वी स्नान करा किंवा स्वच्छ हात पाय धुवून शक्यतो लाल रंगाचे कपडे घाला. हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे.

हे करताना तुम्हाला एक दिवा ज्याचा रंग लाल असेल, मोहरीचे तेल जे जास्त प्रभावी असते, कापसाच्या चार वाती ज्या लाल रंगाचा रंगवायच्या आहेत, एक पूर्ण लवंग जी तुटलेली नसेल, प्रसादासाठी फुटाणे आणि गूळ घेऊ शकता.

हनुमानसमोर काहीही मनात शंका न ठेवता तो दिवा चार दिशांना चार वाती प्रज्वलित करा. नंतर प्रतिमेसमोर बसून हनुमानजीना फुटाणे गूळ अर्पण करा. खाली बसून उजव्या किंवा डाव्या हातात ती लवंग घट्ट पकडून बसायची आहे.

ही मूठ घट्ट पकडून हनुमान जींना तुमची कोणतीही एक समस्या सांगायची आहे. घरातील आजारपण, धनसंपदा यापैकी एक गोष्टीचा प्रार्थना मनापासून करा. ही प्रार्थना करून एक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

तो मंत्र म्हणजे, 11 , 21, 108 यापैकी की जमेल तितक्या वेळा हा जप तिथे करा.हा जप झाल्यावर ती लवंग त्या दिव्यात टाका. यानंतर हनुमान चालीसेचा पाठ करा. 1, 2, 11 जितक्या वेळ जमेल तितका करा.

त्यामुळे हा उपाय प्रभावी बनतो. हा उपाय केल्यावर जय श्री राम या नामाचा काहीवेळा घोष करून मनात रामाची मूर्ती पाहून दर्शन घ्या.

हा उपाय अत्यंत प्रभावी, प्रबळ मानला जातो त्यामुळे तुमची अडचण नक्कीच दूर होईल, जे कोणते संकट असेल ते दूर होईल. त्यामुळे तुमच जीवन सुखी होईल.

हा उपाय जर तुम्ही बाहेर हनुमान च्या मंदिरात केला तर तिथून पटकन घरी यायचे आहे तेही न बोलता. हा एक अतिशय परिणामकारक उपाय मानला जातो.

मंगळवारी सायंकाळी हे नक्की करून पहा. मंत्र खालीलप्रमाणे आहे. || ओम नमो हनुमते भय भंजनाय, सुखम कुरु करू फट स्वाहा ||

||जय श्री राम || जय श्री हनुमान|| हे झाल्यावर अखंड 1 हळद कुंड उंब्र्यावर ठेवा, रात्र भर ठेऊन सकाळी वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.

अडचणी दूर होतील.पिंपळाच्या झाडाचे खास महत्व आहे, त्याचाच उपाय आपण मंगळवारी किंवा शनिवारी करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकता.

त्यासाठी 11 पिंपळाचे पाने घ्या व त्यावरती श्री राम असे चंदन किंवा सिंदुर ने लिहायचे. घरातील देव पुजेत वापरले जाणारे कुंकू तुम्ही यासाठी वापरू शकता.

किंवा हनुमंत प्रिय शेंदूर याचा देखील वापर करू शकता. हे थोडं पाण्यात मिसळून त्याने श्री राम असे पिंपळाच्या त्या पानांवरती लिहा.

या पानांची माळ बनवली तरी चालते किंवा पाने एकत्र करून मारुतीला अर्पण केली तरी चालतात. हा उपाय म्हणजे तुमच्यावर मारुतीची कृपा अखंड रहावी,

तुमच्या प्रत्येक कामात यश मिळावे यासाठी केला जातो. तसेच भगवान श्रीराम जप केल्याने श्री राम प्रसन्न होतात तसेच हनुमान देखील प्रसन्न होतात.

आपल्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत नसेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करायचे. यामुळे अनेक गोष्टी लाभ होतात.

जसे रोज किंवा निदान रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्य मंत्र बोला. तसेच रोज लाल रुमाल व त्यात छोटा तांब्याचा शिक्का ठेवून स्वतः जवळ ठेवाच. नेहमी जिथे जाल तिथे लोक सलाम करतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *