नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपण कुठल्यातरी विचित्र स्थितीत म्हणजेच एकाच भागावर ओझे टाकले किंवा बराच वेळ बसलो किंवा झोपलो तर रक्त वाहिन्या या दाबल्या जातात आणि काही भागांचा रक्तप्रवाह वाढणे हे थोड्या सेकंदसाठी खंडीत होते,
आणि तो भाग बधिर होतेा आणि मग जेव्हा रक्तप्रवाह वाढणे परत सुरू झाल्यास त्या भागांवर विचित्र संवेदना होतात आणि त्यालाच आपण मुंग्या आल्या असे म्हणतो. जरा वेळ पाय आपटला हलवला किंवा हात हालवला की परिस्थिती सर्वसाधारण होते.
हे सहसा सामान्य मुंग्या येण्याचे कारण आहे.हात आणि पायाच्या बोटांमध्ये मुंग्या येणे हे विशिष्ट व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण नाही. हात आणि पायाच्या बोटांच्या सांध्यामध्ये सूज येणे किंवा मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या असू शकते.
याव्यतिरिक्त, हात आणि पायाच्या बोटांमध्ये मुंग्या येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की अन्नात पोषक तत्वांची कमतरता, मज्जातंतू आणि हाडांचे आजार आणि रोगांशी संबंधित इतर घटक.
व्हिटॅमिन डी ची कमतरता हा एक घटक असू शकतो जो मुंग्या येणे आणि इतर समस्यांच्या विकासाशी संबंधित आहे, परंतु हे सहसा नसते.व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन डी चे मुख्य कार्य म्हणजे आपली हाडे आणि स्नायू निरोगी करणे. हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांमध्ये आणि मासे, दूध आणि अंडी यासारख्या अन्नात असते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात काही समस्या उद्भवू शकतात.
मशरूम व्हिटॅमिन डी चा एक चांगला स्रोत आहे. बऱ्याच प्रकारच्या मशरूममध्ये पदार्थांपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी असते.व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे. एक कप दुधात सुमारे 100 आययू व्हिटॅमिन डी असते.
सूर्यफूल तेल, सूर्यफूल तेलात व्हिटॅमिन डी असते. याचा उपयोग अन्नासाठी होत नाही, तर तो त्वचेवर लावण्यासाठी केला जातो.
सप्लीमेंट, शक्यतो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण व्हिटॅमिन डीसाठी सप्लीमेंट देखील वापरू शकता.अशा सामन्य कारणामुळे जर मुंग्या येत असतील तर काळजी करण्यासारखे असे हयामध्ये काही नाही आहे.
ज्यांचे स्नायू सैल आहेत. त्यांना हा प्रकार अनुभवण्यास मिळतो. सैल स्नायू मध्ये ताकद खूप असते पण मुंग्या येणे हा साईड इफेक्ट आहे. खुप वेळ मांडी घालून बसले तर पायाला मुंग्या येतात किंवा खूप वेळ एका कुशीवर झोपले तर हाताला मुंग्या येतात असे ब-याच जणांना होत असते.
काहींना या मुंग्याचा जास्तच त्रास होतो. हात एकाच स्थितीत जास्त वेळ राहिला किंवा काही जड उचलेले तरी मुंग्या येतात. अशावेळेस वैदयकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत मुंग्या येतात म्हणजे आतल्या बाजूने टोचल्यासारखे होते किंवा जळजळ ,सुन्न झाल्यासारखे वाटते.
सहसा हात-पायाला मुंग्या येण्याचा त्रास हा या सामन्य कारणांमुळे जाणवतो परंतु जर डोक्यात मेंदूत मुंग्या येत असतील तर कदाचित ती समस्या गंभीर असू शकते.हात पायाला जर मुंग्या येत असतील तर गरम पाण्याने किंवा गरम पाण्याची पिशवी भेटते.
हया पिशवीने शेकल्यावर देखील रक्त पुरवठा सुरळीत चालतो. मुंग्या येणा-या भागातल्या नसा देखील शेकल्यामुळे खुल्या होतात. आणि हाता पायला मुंग्या येण्याचा त्रास कमी होउ शकतो.
गरम पिशवी घेउन देखील मुंग्या येत असतील तर मुंग्या आलेल्या भागांवर ती पिशवी पाच ते सात मिनिटे ठेवावी. कसे दिवसातुन तीन ते चार वेळा शेकले तरी देखील हाता- पायाला मुंग्या येण्याचा त्रास कमी प्रमाणात होईल.
दही हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो. दही सर्वात सोपा उपाय आहे. हाता पायाला आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी दहयांचा वापर हा उत्तम उपाय आहे. फक्त रोज थोडे थोडे जेवतान किंवा इतर वेळी देखील दही खाण्यासाठी घ्यावे.
दहयात मॅगजीनचे प्रमाण खूप जास्त असल्याने त्याचा रक्त पुरवठा सुरक्षित चालण्यासाठी बरासचा फायदा होऊ शकतो. जर इतर कोणते पथ्य असतील किंवा दहयाची अॅलर्जी असेल तर दही खाणे टाळलेलेच बरे राहील.
दालचिनी हा एक खडा मसाला आहे. यामध्ये मॅगनिज आणि पोटॅशिअम खूप जास्त प्रमाणात आहे. यामुळे रक्त पुरवठा सूधारवायला या दालचिणीची भरपूर मदत होते म्हणुनच दालचिनी हात पायाला आलेल्या मुंगया कमी करण्यास खुप चांगला पदार्थ आहे.
कारण मुंग्या येण्या मागचे मुख्य कारण म्हणजे रक्त पुरवठा सुरळीत नसणे असे आहे. दालचिनी हा एक खडा मसाला आहे जो की प्रत्येकांच्या घरात उपलब्ध असतोच. एक चमचा दालचिनी पावडर खावी.
त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर आणि एक ग्लास गरम पाणी घ्यायचे आणि ते पाण्यात चाटवून रोज एकदा कधीही घेतले तरी हात-पायाला येणार्या मुंग्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि काही दिवसांनी आपल्या हाता पायाला येणार्या मुंग्या नाहीशा होतात.
मसाज करणे हा बराचश्या दुखण्यावर अगदी सोपा घरगुती उपाय आहे. त्याप्रमाणे हात-पायाला जर मुंगया आल्या तर एका वाटीमध्ये तेल घ्यायचे आणि ते मंद आचेवर ठेवून कोमट करून घ्यायचे खोब-याचे तेल घेतले तर उत्तमच होते व त्या खोब-याच्या कोमट केलेल्या तेलानी जिथे मुंग्या आल्या आहेत
त्या भागांवर मसाज करावा या उपायाने हात – पायाला मुंग्या येण्याचं प्रमाण ब-याच प्रमाणात कमी होते. मसाज केल्यामुळे आखडलेल्या नसा मोकळया होतात आणि रक्तवाहीन्यांमधून रक्त पुरवठा सुरळीत चालतो आणि रक्त पुरवठा व्यवस्थित झाल्यास हात – पायाला मुंग्या येण्याचा त्रास ब-याच प्रमाणात कमी झाल्याचा जाणवतो.
तुप खाण्यामध्ये जसा उपयोगी आहे तसाच हया हाता-पायाला मुंग्या येणाच्या त्रासाला देखील एक चांगला उपाय आहे. रात्री झोपण्यापुर्वी तुप एका वाटीत टाकून थोडेसे कोमट करून घ्यायचे आणि ते कोमट केलेले तुप तळपायाला लावून हलक्या हाताने मसाज करावी असे रोज तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी केल्यास हाता-पायाला मुंग्या येण्याचा त्रास कमी होईल.
पिंपळाचे झाड हे फार गुणकारी असे मानले जाते. पिंपळाच्या झाडांच्या पानामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात आणि त्याचबरोबर ब-याच प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात. पिंपळाच्या पानांमुळे हाता-पायाला येणा-या मुंग्या चा त्रास कमी होण्यास मदत होते. जर मुंग्या येण्याचा त्रास नेहमीच होत असते तर तीन ते चार पाने घ्यायची आणि
ती पाने मोहरीच्या तेलात उकळून घ्यायची आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हाता-पायाला मुंगया येतील तेव्हा या उकळलेल्या तेलाने त्या भागांवर हलक्या हाताने मसाज करावी.मुंगया येणे हे सर्वसाधारण बाब असली तरी देखील याचा त्रास मसूर प्रमाणात जाणवतो.
यासाठी सकाळी शौचास जाउन आल्यावर सुंठाचे काही तुकडे चाउन खावेत याने काय होते की, रक्तप्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते व आखडलेले हात पाय बरे होण्यास देखील मदत होते . सुंठ ही एक गरम मसाल्यात येणारा पदार्थ आहे, आणि त्यामुळे यात वात कमी करण्याची देखील क्षमता असते.
आणि त्यामुळे मुंग्या येणे कमी होते.लसूण हा देखील मुंगया येणे उपचार ,यासाठी प्रचलित आहे. सहसा लसूण हा प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतोच. लसूणच्या दोन पाकळया अना शापेाटी खाल्ल्यास बराच फायदा होतो. अनाशे पोती लसूण खाल्याने आपल्या रक्त वाहीन्या या मोकळया होतात आणि हाता पायाला येणा-या मुंग्या चा त्रास हा बर्याच प्रमाणात कमी कमी होतेा आणि काही दिवसणी नाहीसा होतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.