नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी केळी एक आहे. याचे अनेक प्रकार आहेत. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. शरीराला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असतं.
गोड, पिवळ्या रंगाची केळी जास्त मिळतात. हिरवी केळीही आपल्याकडे उपलब्ध आहेत. हिरवी केळी बहुतेक भाजी म्हणून वापरली जातात.केळी पुरुषांची कामवासना वाढवण्यास अतिशय रामबाण आहे.
केळ्यांमध्ये पेक्टीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आतड्यांचं काम सुधारतं. अन्न पचन प्रक्रियेला मदत होते. फायबर शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करतं.
केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं. ज्या गोष्टी पचायला कठीण असतात त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात.
केळ्यांमुळे जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देतं. असिड निर्मितीत योगदान देतं.केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं. शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सपैकी एक आहे. यामुळे हृदयाचं काम सुधारतं. शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राहतं.
रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे. साहजिकच केळी खाणं शरीराला फायदेशीर असतं.
केळी पोटातल्या असिडचं संतुलन राखतं. ल्युकोसायनिडिन आतड्याचे पातळ आवरण घट्ट होण्यास मदत करते. पिकलेली केळी छातीत जळजळीपासून आराम देते.जर तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला कोरडा खोकला किंवा जुनाट खोकल्याची समस्या असेल तर केळीचा ज्यूस प्यायल्याने आराम मिळतो.
केळीचे ज्यूस बनवण्यासाठी दोन केळी मिक्सरमध्ये घेऊन नीट फेटून घ्या. आता त्यात दूध आणि पांढरी वेलची मिसळून प्या.जर तुमच्या घरात कोणाला जुलाब झाला असेल तर पिकलेल्या केळ्याला फेटून ते लोण्यासारखे बनवा. आता दिवसातून दोन ते तीन वेळा त्यामध्ये साखर मिसळून घ्या.
असे केल्याने लूज मोशनच्या समस्येपासून आराम मिळेल.रोज सकाळी किंवा संध्याकाळी केळी आणि दुधाची खीर खाणे किंवा जेवणानंतर दोन केळी नियमित सेवन केल्याने रक्ताच्या आजारात आराम मिळतो. याशिवाय ल्युकोरियामध्ये आराम मिळण्यासाठी केळी खाल्ल्यानंतर दुधात मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो.
ऊर्जा- केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.केळीच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढून शरीराची ताकद वाढते. केळी आणि दुधाचे रोज सेवन केल्याने काही दिवसातच माणूस तंदुरुस्त होतो आणि त्याचे शरीर तंदुरुस्त आणि मजबूत बनते.
फायबरसह सुक्रोज, फ्रक्टोज, ग्लुकोज शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात. पोटॅशियम स्नायूंच्या हालचालींना मदत करते आणि पेटके कमी करते.केळीमध्ये आढळणारे ट्रिप्टोफॅन हे अमिनो अॅसिड शरीराद्वारे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे मेंदूला शांत करण्यास मदत करते.
हे सेरोटोनिन मेंदूला आराम करण्यास मदत करते. हे तणाव दूर करते आणि उत्साही करते.प्रत्येकजण केळी खाऊ शकतो. काहींना केळ्याचा त्रास होऊ शकतो. जसं काहींना मायग्रेनचा त्रास होतो. काहींना अलर्जी असू शकते.
तुम्हाला अलर्जी असेल तर केळं खाल्ल्यावर काही मिनिटात त्रास होऊ लागतो. अशा प्रकारच्या ऍलर्जींना अॅनाफिलेक्सिस म्हणतात. असे झाल्यास, त्वरित वैद्यकीय मदत घ्या.काही औषधं रक्तातली पोटॅशियमची पातळी वाढवू शकतात.
अशी औषधे वापरत असल्यास, केळीसारखे पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या.अॅनिमिया म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता. तुम्हीही अॅनिमियाचे शिकार असाल तर केळी जरूर खावी.
केळीचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता हळूहळू कमी होते आणि तुमची अॅनिमियाची समस्या देखील दूर होते.
केळीच्या सेवनाने डिप्रेशनच्या रुग्णांना आराम मिळतो हे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केळीमध्ये असे प्रोटीन आढळते ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. यामुळेच डिप्रेशनचा रुग्ण जेव्हा केळी खातो तेव्हा त्याला आराम मिळतो.
याशिवाय केळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी6 शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य ठेवते.पोटातील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून केळी आराम देते. तुम्ही दररोज रात्री झोपताना इसबगोल भुसा किंवा केळीचे दुधासोबत सेवन करावे.
असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल.केळी खाल्ल्याने पुरुषांची रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे पुरुष योग्यरित्या कार्य करू शकतात.
एवढेच नाही केळीमध्ये भरपूर प्रमाणात झिंक आढळते, जे की पुरुषांचे सेक्स हार्मोन्स वाढवण्यास कारगर असल्याचा दावा केला जातो. या मुळे पुरुषांची सेक्स करण्याची कार्यक्षमता वाढते.
ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते अशा पुरुषांसाठीही केळीचे सेवन फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. केळीमध्ये असणारे पोषक घटक शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करत असल्याचा दावा केला जातो.
विवाहित पुरुष रात्री झोपण्यापूर्वी 1 किंवा 2 तास आधी केळीचे सेवन करू शकतात. दुधासोबत केळी खाणे सर्वात अधिक फायद्याचे असल्याचे सांगितलं जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.