नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भगवान श्री कृष्णाची जयंती श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीलाजन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी जन्माष्टमी केवळ भारताच्या सर्व भागातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते.
सर्वत्र लोक हा सण उत्साहात साजरा करतात. ते देवासाठी प्रेमाने पदार्थ तयार करतात आणि रात्री 12 वाजता श्री कृष्णाची पूजा करुन हा सण साजरा करतात.श्रावण महिण्यात श्री कृष्ण अष्टमीस आपण सर्व जण श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो.
यंदा श्री कृष्ण जन्माष्टमी गुरवारी मध्य रात्री साजरी कायची आहे. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा असणार आहे. त्यामुळे सर्व भक्तांनी गुरुवारी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यसाठी तयारी करायची आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आधीच्या लेखात दिली आहे.
आपण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी आवर्जून आणल्या पाहिजेत. अशा काही वस्तू आहेत ज्या पैकी एक तरी वस्तू आल्या घरी नक्की आणली पाहिजे. यावर्षी काही अत्यंत शुभ संयोग जुळून आलेले आहेत. वर्द्धि आणि ध्रुव योग जुळून आलेले आहेत. हे दोन्ही योग माता लक्ष्मी याना प्रसन्न करून घेण्यासाठी खुप चांगले मानले जाते.
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पहिली वस्तू आहे, ती म्हणजे गाय आणि वासरू एकत्र असलेली वस्तू आपल्याला घरी घेऊन याचे आहे. गाय वासरू यांची प्रतिमा किंवा मूर्ती हि आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवायही आहे.
पूर्व आणि उत्तर यामधली दिशा म्हणजे ईशान्य होय. प्राचीन काळी गायला धन मानले जायचे. तसेच गाय वासरू एकत्र घरी आणल्यास आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो. तसेच श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी गाय आणि वासरू यांची पूजा केल्यास घरात सुख समुद्धी निर्माण होते.
दुसरी वस्तू म्हणजे मोरपंख. मोरपंखा बद्दल एक कथा सागितली जाते. मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तसेच मोरपंख हे श्री कृष्णाने आपल्या मस्तकी धारण केले आहे.
त्यामुळे त्याचे पूजा नक्की करावी. तसेच वास्तूशास्त्रा नुसार ज्या घरात मोरपंख आहे अशा घरात अमंगळ, चुकीच्या आणि अशुभ गोष्टी घडत नाही. तसेच सकारात्मक गोष्टी आपल्या घराकडे ओढल्या जातात.
घरात काही दोष असतील तर त्या सुद्धा दूर होण्यसाठी मदत होते. त्यामुळे एकतरी मोरपंख नक्की घरी घेऊन या. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी मोरपंख नक्की घेऊन या.
तिसरी वस्तू म्हणजे बासरी हे एक प्रमचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. तसेच श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिया वस्तू पैकी एक आहे. संपूर्ण सृष्टीत प्रेमाचे प्रतीक म्हणजे बासरी आहे. बासरी जर का आपण घरात ठेवली तर घरातील वस्तू दोष कमी होतो.
तसेच पती पत्नी मध्ये सतत वाद विवाद होत असतील तर बेडरूम मध्ये नक्की एक बासरी ठेवावी. त्याच सोबत घरातील सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्र जास्त वेळ घालवतात त्या ठकाणी बासरी नक्की ठेवून दयावी ती सुद्धा आडवी बासरी आधीही सरळ किंवा उभी ठेऊनये.
त्याच सोबत घरात भगवत गीता नक्की घरात घेऊ यावे जर का तुम्हला शक्य असेल तर काही लोकांना भगवत गीता अवश्य दान करावी. हे सुद्धा एक पुण्याचे काम आहे. तसेच याच दिवशी एक तरी अध्याय नक्की वाचावा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.