नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जा , नकारात्मक शक्ती वावरत असेल तर हे समजण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला खात्री होईल की तुमच्या घरी वाईट गोष्टींनी प्रवेश केलाय.
या ठराविक गोष्टी जर घडत असतील तर समजून जा की तुमच्या घरात वाईट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वेळीच घरातून दूर करायला हव्यात. घरातील या वाईट, नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्यासाठी अनेक अनेक उपाय केले जातात.
घरात वाईट शक्ती असल्याचे काही संकेत आहेत, जे आपल्या पुराणात सांगितले आहेत. ज्याचा वापर करून आपण पडताळून पाहू शकता की तुमच्या घरी वाईट शक्ती वास करते किंवा नाही.
तुमच्या घरातील दही सारख नासत असेल , खराब होत असेल तर तुमच्या घरात वाईट शक्ती वास करते. सकाळी जेवण बनवलेले रात्री ते खाण्यायोग्य राहत नसेल व सतत असे घडत असेल तर तुमच्या घरी नक्कीच वाईट शक्ती वास करते.
घरात विनाकारण भांडण होत असेल, सतत चिडचिड होत असेल, घरातील काही सदस्य विनाकारण वाद घालत असतील, अर्थहीन बडबड करत असतील व निष्कारण काहीही विपरीत घडत असेल तर समजून जा घरी वाईट शक्तींचा वास आहे.
आपल्या घरी जर नेहमी पाल आवाज करत असेल तर समजा की येणाऱ्या काळात एखादी विपरीत घटना घडू शकते. त्यासाठी तुम्ही सावध राहिले पाहिजे. घरात पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील,
घरात काहीही शुभ घडत नसेल, आलेला पैसा नाहक, अनावश्यक ठिकाणी खर्च होत असेल तर समजून जा की घरात वाईट वस्तू, गोष्टी कार्यरत आहेत. तसेच घरातील लोक विनाकारण आजारी पडत असतील,
अपघात होतील किंवा घरी बसून एखाद्या गोष्टीच भांडण होईल व त्यामुळे घरात नेहमी ताण राहील. असे खूप संकेत जे आपल्या घरात वाईट शक्ती जागृत असल्याचे दर्शवतात.
घरातील अन्न धान्य सारखं संपत असेल, सारखं नास होत असेल म्हणजे कितीही काळजी घेऊनही नासाडी होत असेल, किडे उशा होत असतील तर नक्कीच घरात वाईट शक्ती आहे.
आपल्याला सारखी भीती वाटत असेल, आपल्या सोबत कुणीतरी आहे असं वाटत असेल किंवा वाईट स्वप्न पडत असेल तर नक्कीच कुणीतरी दुष्ट शक्ती तुमचा पाठलाग करत तुमच्या घरी थांबली आहे. यावरती सुद्धा एक प्रभावी उपाय आहे.
प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण तुम्ही घरच्या घरी घाला. जसा जमेल तसा तुम्ही करत चला. अगदी साधी मांडणी, मोजकेच गरजेचे साहित्य आणि मुख्य म्हणजे पोथी वाचन, कथा वाचन व थोडा गोड प्रसाद आपल्या घरच्या लोकांसाठी
असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईल व सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित होईल. तसेच घरी रोज् देवपूजा, पोथीवाचन, हनुमान चालीसा, रामरक्षा मंत्र, श्रीसूक्त लावत चला किंवा स्वतः जप करा. असे सतत केल्यास मनाला शांती मिळते, घरातील वातावरण प्रसन्न राहते व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.