घरात गणेश मूर्ती खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी माहीत असायलाच हवे….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्रावण महिना संपला की सणांची तारांबळ उडते. श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पोळा आणि पोळा आला की लगेच इतर सर्व सणांची लगबग सुरू होते. पोळा झाला की लगेच हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी असे एकामागून एक सण येतात, सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाचे !

सर्वजण अधीरतेने गणपती बाप्पांची वाट बघत आहेत, कोणाची तयारी झाली आहे, तर कोणाची चालू आहे, घरातील स्वच्छता, तोरण, फुले, याची गडबड सुरुय, या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती !

आपण घरी गणपती बाप्पा बसवत असताना यासाठी घरातील काही मंडळी जाऊन पसंत करतात, जी मूर्ती सुंदर व आकर्षक दिसेल अशी मूर्ती आपण निवडतो, बाप्पांची मूर्ती घेताना शक्यतो सहा इंचाचा पासून ते एक फुटापर्यंत आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन असे काही कुठल्याही शास्त्रात वगैरे नाही

परंतु घरांचा बाप्पा बसवायचे असते तर कमी उंचीचे बाप्पा असले त्यांचे वजनही कमी असते उचलायला ही सोपे जाते त्याबरोबरच आपण घराचे मखराचे डेकोरेशन करतो त्यातही ती मूर्ती अगदी योग्य बसते शक्यतो दहा इंच ते एक फुटापर्यंत गणपती बाप्पांची मूर्ती असावी दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पांची मूर्ती नेहमी शाडू मातीची घ्यावी

यात आपला पर्यावरणाचाही भाग येतो शाडू मातीची मूर्ती असेल तर तिचे विसर्जन केले आहेत ते पाण्यात लवकर विरघळत ते जर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर ती मूर्ती लवकर विरघळत नाही, जेव्हा गणपती विसर्जन होते तेव्हा तिथे अक्षरशः गणपती बाप्पांचे हाल झालेले आपल्याला बघायला मिळतात.

खंडित केलेल्या तुटलेला मूर्ती आपल्याला दिसतात म्हणून आपल्या बाप्पांचे चांगल्या प्रकारे विसर्जन व्हावे असे वाटत असेल तर शाडू मातीची मूर्ती घ्यावी त्याशिवाय प्लास्टर ऑफ पॅरिस मुळे नदीचे किंवा तलावाचे पाणी दूषित होते.

त्यात विषारी घटक मिसळतात म्हणून शाडू मातीची मूर्ती बसविल्यास एक प्रकारे आपण पर्यावरणाचे रक्षण करीत असतो. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेली, विश्राम अवस्थेतील प्रतिमा, सर्वोत्तम मानली जाते.

साप- गरुड- मासा किंवा युद्ध करताना चित्र विचित्र आकार असणारी गणपतीची मूर्ती मुळीच घेऊ नये किंवा खूप मोठे असलेले गणपती सुद्धा घेऊ नये. पार्वतीच्या व शिव शंकराच्या मांडीवर बसलेली गणपती मूर्ती मुळीच घेऊ नये.

कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती पूजा निषिद्ध मानली गेली आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी कधीच आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही .

केवळ माती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्की करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात वेळ वाया घालवू नका .

त्या मूर्तीचे त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. मनात कोणतीही भीती व शंका आणू नका. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी शेजारी मित्रमंडळी याचेकरवी पूजा नैवेद्य अर्पण करा.

गणपती विसर्जनाची घाई अजिबात करू नका. गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मद्य, मांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधा भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. जेवनात आंबट- तिखट पदार्थ नसावेत.

दही साखर भात हा सर्वोत्तम नेवेद्य मानला जातो. विसर्जन करताना मृदंग अभंग टाळाच्या गजरात परमात्म्याला निरोप द्यावा. गाणी वाजवून विकृत चाळे अजिबात करायचे नाहीत.

गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती शांत, तेजस्वी, सात्विक चेहऱ्याची, तजेलदार डोळ्यांची व आरामात बसलेल्या आणावी. गरुडावर बसलेला, मोदकावर बसलेला असे कोणतेही प्रकारची गणपती मूर्ती घरी आणू नये.

आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून येत असतात, तर त्यांना आरामात बसू द्यावे, सिंहासनावर आरामात बसलेले गणपती बाप्पा आणावेत, मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी, कारण आपण गणपती बसवतो, उभा, नाचणारा असे कोणत्याही प्रकारचे गणपती बाप्पा आणू नयेत.

गणपतीची मूर्ती आणताना ती सर्व बाजूंनी व्यवस्थित बघून आणावी. तिला कोठे तडा नसावा, हात- पाय – सोंड- दात सर्व व्यवस्थित पाहून घ्या, मूर्तीचे रंगकाम व्यवस्थित असावे, डोळ्यांची घडण हे सर्व व्यवस्थित असावे, हे सर्व तपासून घ्यावे मगच मूर्ती बुक करावी. भंगलेली, खंडित झालेली नसावी म्हणून मूर्ती अगदी व्यवस्थित बघून आणावी.

आजकाल विविध प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती दिसतात, त्यातच महादेव व पार्वती यांच्या मधोमध बाप्पा बसलेले असतात , अशी मूर्ती दिसायला खरोखर सुंदर असते पण अशी ही मूर्ती कधीही घरात बसविण्यासाठी आणू नये, कारण आपण महादेव व पार्वतीची पूजा लिंग स्वरूपात आपण करतो

तर गणपतीचे पूजन मूर्ती स्वरूपात करतो, त्याशिवाय दहा किंवा अकरा दिवसात आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो त्यांच्यासोबत महादेव पार्वती चे विसर्जन करावे लागते म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती फक्त बाप्पांचीच असावी, इतर देवी-देवता सोबत आणू नयेत.

त्याशिवाय मुकुट नसलेला गणपतीही कधीही आणू नये, कारण गणपतीचा मुकुट हा त्यांचा दागिना आहे आणि त्या मुख्य दागिन्याशिवाय गणपती बाप्पा आणू नयेत आणि जर आपल्याला विना मुकुटाची मुर्ती आवडली आणि जरी आणली तरी छान छान मुकुट आपण आणून मूर्तीला घालावेत .

आता शेवटची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांच्या वाहना शिवाय म्हणजेच उंदीर नसलेली मूर्ती घरी आणू नये कारण वाहन नसेल तर ते कशावर येतील म्हणून गणपती बाप्पा आणतांना छोटासा उंदीर बाप्पांच्या पायाशी असावा. मूर्तीच्या सोबत उंदीर नसेल तर ती मूर्ती आणू नये.

मूर्ती घरी आणताना ती कशी आणावी याबाबत काहींच्या मनात संभ्रम असतो, त्यासाठी या काही गोष्टी लक्षात घ्या, तुमची ठरवलेली जी मूर्ती असेल त्या हिशोबात मोठे ताट बरोबर घ्यावे,

त्यावर एक लाल वस्त्र टाकावे, आसनावर थोडेसे तांदूळ टाकावेत व मूर्ती त्या ताटात घेऊन बाप्पांच्या अंगावर दुसरे नवीन लाल कापड टाकून घरी आणावे , घरी आणताना बाप्पांचा चेहरा आपल्याकडे असावा, समोर बघताना नसावा, घंटा वाजवत ,

वाजत गाजत बाप्पांची स्वारी घरी आणावी, दारात आल्यानंतर बाप्पांचे तोंड दाराकडे करावे, ज्यांनी गणपती हातात घेतले आहेत त्यांचे दूध पाण्याने पाय धुवावे , त्यांना गंध लावावे, मग गणपती बाप्पाचे पूजन करावे, पाणी ओवाळून टाकावे

व त्यानंतर बाप्पांना घरात आणावे. बाप्पा घरात येण्यापूर्वीच मखरामध्ये चौरंगावर किंवा पाटावर आसन टाकून त्यावर तांदूळ आणि स्वस्तिक काढावे, त्यावर मधोमध एक रुपया ठेवावा व त्यावर बाप्पांची स्थापना करावी.

त्यानंतर बाप्पांना जाणवे घालावे, त्यांचे पूजन करावे, नैवेद्य करावा अशा प्रकारे प्रसन्न चित्ताने व आनंदाने बाप्पांचे घरात स्वागत करावे . बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *