थोडा वेळ काढून नक्की ऐका, महत्त्वाच्या २७ वास्तु टिप्स, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, महत्त्वाच्या 27 वास्तु टिप्स…

घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणत असतो वाईट बोलाल तेही तथास्तु होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तु होईल.

घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही.

घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल ठेवू नये.

घरांमध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे.

हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी.

भाग्यवंतीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर ती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे.

घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवतो म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये.

घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते.

घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंक खाली खडे मिठाचा पाऊल ठेवावा.

स्वयंपाक घरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये स्वयंपाक घर शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तराभिमुख ठेवावे.

घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वास्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे.

घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो.

घरांमध्ये खिडक्या दरवाजांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा आठ किंवा दहा दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी.

घरांमध्ये व्यर्थ जड समान ठेवू नये या वस्तूंमुळे घरातील तणाव वाढू शकतो.

आर्थिक ला प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मूक उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधित ठेवावे यासाठी उदबत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो.

तिजोरीच्या दरवाज्यावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मी चा फोटो लावावा.

घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा.

घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या लगेच भरून घ्याव्यात.

घरामध्ये कोळ्याची जाळी घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात 

संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी 

कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी विजिटिंग कार्ड लेटरहेड किंवा कंपनीच्या नावे असलेले बोर्ड हे काळा रंगाचे असू नये ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाचे असावे 

ऑफिस मधले टेबल खुर्ची फर्निचर काळा किंवा लाल रंगाचे असू नये 

नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा इंटरेस्ट असणारे घर विकत घेऊ नये यामुळे आरोग्य हानी धनहानी चिडचिड अशा गोष्टी घरांमध्ये होतात 

घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा करू नये यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते 

घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे धान्याचे पोती भरपूर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नी तत्व संबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नये 

घरामध्ये कोठेही लाल मरून व काळा रंगाचे पडदे वापरू नयेत 

वास्तू नुसार जर घरात दक्षिण दिशेला औषध ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आले असून या नियमांचे पालन केल्यास घराचे पावित्र्य कायम राहते 

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!