वास्तुदोष आणि उपाय जे तुमचं घर सुखी आणि समृध्द ठेवतील तेही 24/7…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, या गोष्टी आपली वास्तू तथास्तु बोलण्यासाठी केल्या जातात. तेव्हा या गोष्टी तुम्ही नक्कीच वाचा, यावरून नक्की समजेल की आपल्या घरी वास्तुदोष आहेत किंवा नाहीत, नसतील तर उत्तमच पण असतील तर त्वरित दूर करता येतील.

घराच्या उत्तर दिशेला ऑफव्हाईट किंवा हलका पांढरा रंग द्यावा. यामुळे घरात माता लक्ष्मी येते, उत्तरोत्तर प्रगती होते. तसेच कोणत्याही शुभ कामासाठी काळ्या रंगाचा वापर अथवा तशा गोष्टी वापरू नका..त्यामुळे तुम्ही या रंगाच्या गोष्टी खरेदीही करू नका.

शुक्रवारी श्रीयंत्र स्थापन करून विधिवत पूजा करावी ज्यामुळे माता लक्ष्मी चा वास घरात राहतो. तसेच मुख्य दरवाजातील पायपुसनी ही हिरव्या किंवा निळ्या रंगाची असावी. तसेच मुख्य दरवाजात चप्पल स्टँड ठेवू नये.

ज्यामुळे घरात नकारात्मकता येते. घराच्या सुख व समृद्धीसाठी ईशान्य दिशेला तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा अथवा ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवले तरी उत्तमच.
घरात फिश टॅंक हा दक्षिण, उत्तर, पूर्व दिशेला ठेवू नये तसेच हा फिश टॅंक भव्य मोठा असू नये,

लहान आकाराचा असावा. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरी उत्तर किंवा ईशान्य दिशेला वॉटर फॉल लावावा. तसेच ईशान्य कोपऱ्यात, उत्तर दिशेला फुलांची झाडे, वेली लावाव्यात. त्यामुळे तुमचं घर नेहमी सकारात्मक राहील, वातावरण प्रसन्न राहील.

घरातील ब्रम्हस्थळ किंवा घरातील मध्यभागी कोणतीही अवजड वस्तू ठेवह नका, ती जागा नेहमी मोकळी ठेवा, त्यामुळे घरात अडचणी, अचानक संकटे येत नाहीत. तसेच घरात सुख, समृद्धी आणण्यासाठी घरामध्ये भरपूर खिडक्या असाव्यात.

इंडस्ट्री, व्यवसाय, फॅक्टरी, घर इथे वास्तू पाहणी करताना ब्रम्हस्थळ हे रिकामे असणे गरजेचे असते, जर नवीन घर घेताना ब्रम्हस्थळ ठिकाणी टॉयलेट किंवा घराच्या बाहेर येत असेल तर ती वास्तू खरेदी करू नका.

घराच्या छपराचा उतार हा पूर्व किंवा उत्तर दिशेत असावा, चुकूनही हा उतार दक्षिण दिशेला असू नये त्यामुळे खूप हानी होते. घराच्या पूर्व व उत्तर दिशेला टेरेस असावा, दक्षिणेला नसावा. घरामध्ये गोलाकार जिना नसावा.

तसेच तुम्ही घरातील या गोष्टी नेहमी ध्यानात ठेवा. सोलर पॅनेल बसवताना आग्नेय किंवा दक्षिण दिशेस बसवा. डायनींग टेबल किचनच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. तसेच मास्टर बेडरूम मध्ये बेडखाली कोर्टाची कागदपत्रे, बँक पासबुक ठेवू नका.

त्यामुळे निद्रानाश होतो. तसेच झोपण्याची दिशा दक्षिण किंवा पश्चिम नसावी. घरामध्ये प्रगती होण्यासाठी उत्तर दिशेला कासव ठेवावा. तसेच उत्तर ईशान्य दिशा ही नेहमीच हवेशील, फुलझाडांनी भरावी.

आग्नेय कोपऱ्यात कधीही पाणी ठेवू नका, पाण्याची मोटर, नळ असू नये. घरातील नळ गळत असतील तर दुरुस्त करून घ्यावेत त्यामुळे नाहक खर्च होतो. नविन घर बांधताना पाण्याची टाकी नैऋत्य दिशेला ठेवावी तीपण उंच ठेवावी.

तसेच घरातील लादी आठवड्यातून एक वेळ खडे मीठ वापरून पुसून घ्या, रोज देवपूजा, प्रार्थना करावी व थोरा मोठ्यांची सेवा करावी. अन्नदान करावे. नवीन वस्तू घेताना जवळ ट्रॅफिक, क्रॉस रस्ते, हायवे असू नये.

तसेच टेरेस वर , घरात तुटक्या फुटक्या गोष्टी ठेवू नका. घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा व कोणतेही चीक निघणारे झाड आसपास असू नये. मुख्य दरवाजातील उंबरठ्यावर स्टिकर असू नये..

नित्य सडा रांगोळी करावी. तुळशीला रोज पाणी घालावे. घराच्या प्रगतीसाठी उत्तर दिशा हलकी ठेवा, इथे गडद रंगाचे काही वापरू नका. रोज अथर्वशीर्ष पाठ करावा, श्री सूक्त, विष्णुसहस्त्र नाम व हनुमान चालीसा नेहमी सुरू ठेवा.

घरातील सर्व वस्तू वास्तू शास्त्रा नुसार ठेवा, त्यामुळे तुमच्या घरी धनाची कमी भासणार नाही. माता लक्ष्मी ची अवहेलना करू नये. घर किंवा ऑफिस समोर उतरता जिना अथवा लिफ्ट असल्यास असे घर, ऑफिस खरेदी करू नका.

तसेच ईशान्य दोष दूर करण्यासाठी तुम्ही ईशान्येस पाण्याच्या कारंज्या ठेवा, संगमरवरी बाउल मध्ये पाणी भरून ठेवा. उत्तरेला कासव ठेवा..कापूर, धूप दीप रोज करावे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!