इथे ठेवा एक मोरपंख, सगळे प्रॉब्लेम चुटकित होतील गायब, शत्रू होईल पसार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मोरपंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे. तसेच इंद्रदेव देखील मोरपिसांच्या आसनावरती बसतात.

घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते ज्यामुळे मन प्रसन्न राहते. मोर धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी संबंधित आहे. जर घरातील सदस्यांची प्रगती थांबली असेल तर घरात मोराची पिसे जरूर ठेवा. याच्या शुभ प्रभावामुळे घरात धनाचे आगमन होऊ लागते.

आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचं काम मोरपीस करते. म्हणून त्यासाठी मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावेत. पुराणात ऋषी, योगी लिहण्यासाठी याचा वापर करत असत त्यामुळेच आज देखील ग्रंथासाठी

व साहित्य पुस्तकांच्या साठी याचे महत्व कायम आहे. मोरपीस ज्याला आवडते त्यावर कृष्णाची कृपा बरसते, तसेच नेहमी स्वतः सोबत एक मोरपीस ठेवल्याने अमंगल, अशुभ गोष्टी घडत नाहीत, त्यापासून संरक्षण होते.

मोराचं आवडतं खाद्य हे साप आहे त्यामुळे जिथे मोर किंवा मोरपीस असते तिथे साप येत नाहीत. तुमच्या मुलाचे जर शाळेत, अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी व शाळेच्या पिशवीत नेहमी एक मोरपीस ठेवा.

तसेच स्वतःच्या खिशात, पाकिटात तसेच डायरीत नेहमी मोरपीस ठेवा. तसे करणे लाभदायी असते. तुमचा दरवाजा जर वास्तू शास्त्रानुसार नसेल तर 3 मोरपीस घेऊन ते मुख्य दारावर लावा. तिथे त्याखाली श्री गणेशाचा फोटो लावा. त्यामुळे वास्तुदोष कमी होतो. मोरपीस मस्तकावर धारण केल्याने विद्याप्राप्त होते.

घरातील कलह दूर होण्यासाठी सुद्धा घरी मोरपीस लावावे. पती पत्नी मध्ये सारखे वाद होत असतील तर तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये 2 मोरपीस गुपचूप आणून ठेवा. असे केल्याने भांडण होत नाहीत, प्रेम वाढते.

मोरपीस नेहमी स्वतःजवळ ठेवाल तर यश तुमच्या जवळच राहते. रात्री मोरपीस घराबाहेर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

मोरपीस तोडल्यावरही ताजे व जीवनात राहते ते कधी कोमेजत नाही आणि तीच त्याची खासीयत आहे. त्यामुळे जीवनात कधीही निराशा जरी आली तरी मोरपीस जवळ ठेवा, सकारात्मकता जागी होईल.

तुम्हाला सहज कुणी मोरपीस दिले तर समजा तुमच्या आयुष्यात सुख, धन येणार आहे व प्रगतीची द्वारे खुली होतात. तसेच मोरपीस खाली टाकू नका, किंवा फेकू नका, असे केल्याने तुमच्या घरातील हानी होऊ शकते.

शुभ मुहूर्तावर मोरपीस खरेदी केल्यास उन्नती होते. आग्नेय कोपऱ्यात नेहमी मोरपीस ठेवल्याने घरात सुख व समृद्धी येते. तसेच तुटलेली किंवा अर्धवट मोरपीस खरेदी करू नका अथवा घरी ठेऊ नका.

नेहमी श्रीकृष्ण जप करत मोरपीस घरी आणा, त्यामुळे मनाला शांती मिळते. घराच्या मुख्य दारावर आतील बाजूस 3 मोराची पिसे जरूर लावावीत.

यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तो निघून जातो. आपल्या डायनिंग टेबलच्या आसपासही एक मोरपंख जरूर ठेवावे यामुळेही घरात सुख व समृद्धी येते.

वैवाहिक जीवनात तणाव असेल तर बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा. असे मानले जाते की यामुळे पती-पत्नीमधील संबंध सुधारतात आणि त्यांच्यातील प्रेम वाढते. मोराची पिसे ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

जर तुम्हाला शत्रूंपासून त्रास होत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी रात्री हनुमानजींच्या डोक्यावर सिंदूर लावून मोराच्या पिसावर त्या शत्रूचे नाव लिहा आणि घरातील पूजास्थानात ठेवा.

सकाळी उठल्यावर हे मोरपंख वाहत्या पाण्यात सोडा. त्यामुळे शत्रू कमजोर होतो.कुंडलीतील चंद्राच्या अशुभ स्थितीपासून मुक्त होण्यासाठी मोराच्या पिसांसंबंधीचे उपाय खूप प्रभावी आहेत.

यासाठी सोमवारी मोराची पिसे आणावीत, पिसाखाली पांढऱ्या रंगाचा धागा बांधावा. यानंतर पंखांसह आठ सुपारी ताटात ठेवा. गंगाजल शिंपडताना ‘ओम सोमय नमः जागरे स्थिराय स्वाहा’ या मंत्राचा 21 वेळा जप करा. असे केल्याने मानसिक शांती मिळते.

वास्तूनुसार मोराची पिसे घरात ठेवल्याने घरातील सर्व दोष दूर होतात. कुंडलीत नवग्रह दोष असल्यास घराच्या पूर्व आणि उत्तर-पश्चिम भिंतीवर मोराची पिसे लावावीत. यामुळे प्रत्येक ग्रहाचे दोष शांत होतात.

जर तुम्ही ग्रहांच्या अशुभ प्रभावाने त्रस्त असाल तर ग्रहाच्या मंत्राचा 21 वेळा जप करून मोराच्या पिसांवर पाणी शिंपडा. आता ते जिथे दिसतील अशा ठिकाणी स्थापित करा.

घराच्या मुख्य दरवाजावर 3 मोराची पिसे लावून ‘ओम द्वारपालाय नम: जाग्रे स्थिराय स्वाहा’ हा मंत्र लिहून खाली गणेशाची मूर्ती ठेवा. यामुळे घरातील सदस्यांवर देवाची कृपा राहते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *