19 सप्टेंबर, मंगळवार, गणेश चतुर्थी, अंगारकी अद्भुत दुर्मिळ योगावर ही गोष्ट करायला विसरू नका…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका दैवत आहे. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा करण्याला शास्त्रोक्त महत्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते.

परंतू भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी येतो आणि हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, अंगारक योगात ही चतुर्थी आल्याने खास महत्व प्राप्त झाले आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला. यामुळेच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवशी लोक लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात आणि श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात. हा उत्सव महाराष्ट्रासह सर्व देश-विदेशात उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो.

यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३ ला आहे. पंचांगानुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल आणि १९ सप्टेंबर रोजी १ वाजून ४२ मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल.

त्यामुळे श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार १९ सप्टेंबरला साजरी केली जाईल आणि या दिवसापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होईल. श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ७ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे.यंदा गणेश चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारक योग तयार झाला आहे तसेच,

गणेश चतुर्थीच्या दिवशी वैधृति योगही आहे. यासोबतच स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा संगम होण्याचाही दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी श्रीगणेशाची पूजा आणि आराधना करणाऱ्यांच्याअडचणी गणपती बाप्पा नक्की दूर करेल.

गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करा. पूजेचे साहित्य घेऊन आसनावर बसा. पूजेच्या स्थानावर पवित्र गंगा जल शिंपडा. ब्राम्हणाला बोलवून पूजा करत असाल तर ते सांगतील तशी मनोभावे पूजा करून स्थापनाविधी करा.

घरच्या घरी पूजा करत असाल तर, श्री गणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा लावा. स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. गणपतीला नमस्कार करून तीन वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा.

दिवा लावा. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर गणपती बाप्पाला वस्त्र, चंदन, अक्षदा, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. श्री गणेशाची आरती करा, मंत्रपुष्पांजली आणि कपुरआरती म्हणा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद मागा.

बोला गणपती बाप्पा मोरया. प्रसाद ग्रहण करा. तसेच तुम्ही दीड, पाच, सात, दहा जितके दिवस गणपती बसवतात तितके दिवस दररोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती करा.यावर्षी असे अनेक योगायोग आणि शुभ योग घडत आहेत,

त्यामुळे गणेश चतुर्थी हा सण विशेष ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असतील.मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थी गणेशाला समर्पित असून,

या दिवशी अनुक्रमे विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. मात्र, चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, अंगारक योग जुळून येतो. म्हणून याला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. यंदा सन २०२३ मध्ये मंगळवारी श्रीगणेश चतुर्थी येत आहे.

त्यामुळे या दिवशी अंगारक योग जुळून आले आहे.गणेश पुराण किंवा मुदगल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल कथा सांगितली जाते, ती अशी- अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली.

त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की ‘माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल!

अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी महिलांनी प्रथम गूळ, तूप, मीठ, दुर्वा, पुआ इत्यादी वस्तू सासर, सासरे किंवा आईला द्याव्यात.

तर पुरुषांनी सर्वप्रथम या वस्तू गणेशाला अर्पण कराव्यात. असे केल्याने तुमचे सौभाग्य वाढेल आणि तुम्हाला श्रीगणेशाची कृपा प्राप्त होईल. तसेच, कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि सर्व त्रास हळूहळू दूर होतील.

जीवनातील प्रगतीसाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी कुंभाराच्या चाकाची थोडी माती घेऊन त्या मातीपासून अंगठ्याच्या आकाराची गणपतीची मूर्ती बनवावी. नंतर ती मूर्ती लाल कपड्याने पोस्टावर पसरवून ब्रह्म स्थान, पूर्व दिशा किंवा उत्तर-पूर्व कोनात ठेवा.

यानंतर श्रीगणेशाची आराधना करून ‘ओम ह्रीं ग्रीम ह्रीं’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस या मूर्तीची पूजा करा. असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *