नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुरटीचे जसे आपले सौंदर्य, त्वचा, दात, केस आपला चेहरा यासाठी जशी फायदेशीर आहे तसेच तुरटीचे टोटके केल्याने आपल्याला अपार धनप्राप्ती, कर्जापासून मुक्ती, घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, वाईट नजर, विचित्र स्वप्न व घरातील भांडण दूर करते.
तुरटीचा हा टोटका अगदी सोपा व सरळ आहे. याच उपायाचा अवलंब करून ,आपले जीवन सुखी व समृद्ध होऊ शकते.त्यामुळे आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.
त्यामुळे हा उपाय पूर्ण विश्वासपूर्वक केल्यास कोणतेही काम पूर्ण होते व या उपायाचा निश्चितच आपल्याला फायदा होतो.तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने धनप्राप्ती होते.
याशिवाय काळ्या कपड्यात बांधून तुम्ही घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दाराला टांगू शकता किंवा बांधू शकता. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे व्यवसायात वाढ होते.
तुरटीचा वापर आपण फार पूर्वीपासून आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. तुरटीचा वापर आपण साधारणपणे पाणी स्वच्छ करण्यासाठी करत असतो किंवा काही लागल्यास किंवा काही मार लागला तर त्याठिकाणी तुरटीची पावडर , पाणी लावून ती जखम धुतली जाते.
याशिवाय आपण या तुरटीचा आपल्या जीवनात धनलाभ किंवा दारिद्र्य नष्ट होण्यासाठी करणार आहोत.तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात.
हा वास्तुदोष दूर करण्यासाठी 50 ग्रॅम तुरटी घेऊन घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवा. असे केल्याने विविध वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुख-शांतीही वाढेल.
हा उपाय करत असताना लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की, ती तुरटी काढून तिथे नवीन तुरटी ठेवा.
जर आपल्या कष्टाचे म्हणावे तितके फळ मिळत नसेल किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तसेच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी किंवा घरातील प्रत्येक खोलीत एक छोटटा तुकडा ठेवल्यास,
त्या ठिकाणचा वास्तू दोष निघून जातो.परिणामी यामुळे कामातील अडथळे दूर होतील ,तसेच तुमची प्रगती होईल व तुमची सर्व कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. याशिवाय आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल,
तर एका काळ्या कापडात हा तुरटीचा एक तुकडा बांधून ,आपल्या दुकानाच्या किंवा घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून द्यावे ,असे केल्याने वास्तूदोष दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तसेच तुमच्या व्यवसायात वृद्धी व्हायला सुरुवात होते ,परिणामी आपल्या पैशांची आवक वाढते. तसेच आपल्यावर खूप कर्ज असल्यास किंवा काही केल्याचे कमी होत नसल्यास यासाठी एका विड्याचे पान घेऊन त्यामध्ये कुंकुुं टाकावे
व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून ते पान लाल रंगाच्या दोर्याने बांधून , पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकावे. या उपायामुळे थोड्याच दिवसात तुम्हाला कर्जा पासून मुक्तता मिळेल.
थोडेथोडे करत करत आपले सर्व कर्ज कमी होईल आणि थोड्याच दिवसांत तुम्ही कर्ज मुक्त होण्यास मदत होईल. या चमत्कारी उपायांचा अगदी पूर्ण विश्वासाने अवलंब केल्यास ,तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न होऊन तिचा वास नेहमीच तुमच्या घरात राहील.
अनेकदा भीतीमुळे मन अस्वस्थ होते. कधीकधी लोक घाबरतात. जर तुम्हालाही रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही तुरटी काळ्या कपड्यात बांधून तुमच्या पलंगाखाली ठेवावी. असे केल्याने तुम्ही भीतीदायक स्वप्नांपासून दूर राहाल.
दुकानात, व्यवसाच्या ठिकाणी किंवा इतर कामाच्या ठिकाणी प्रगती होत नसेल तर काळ्या कपड्यात तुरटी बांधून मुख्य दरवाजावर टांगावी. असे केल्याने कामात येणाऱ्या समस्या, कामाच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल.
व्यवसायात भरभराट आणि कामात यश मिळवण्यासाठी नवमी तिथीला तुरटीचे पाच तुकडे, सहा निळी फुले दुर्गा मातेला अर्पण करा. त्यानंतर दशमी तिथीला वाहत्या पाण्यात निळी फुले वाहून द्या.
धनलाभासाठी तुरटीचा एक सोपा उपाय तुमची मदत करु शकतो. धनलाभासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने आपले दात स्वच्छ करा. पाण्यात थोडे मीठ आणि तुरटी मिसळा. घरातील लादी पुसण्यासाठी हे पाणी वापरा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.