स्वामींना मानत नसणारा व्यक्तीला स्वामींनी मृत्यूच्या दारातून का वाचवले?…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली.

अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.या भगवान श्री दत्तयांचे अवतार श्री स्वामी समर्थ याच्या भक्ताची एक अविस्मरणीय अनुभव आहे.

स्वामी महाराज एक खूप मोठी अद्भुत शक्ती आहेत, अनंत कोटी ब्रम्हांड चालविणारी शक्ती अक्कलकोटमध्ये सगुण मानवी रूपात प्रगट झाली. असेच एकदा एका मुक्या ब्राम्हण सोबत घडलेली घटना.

तो मुका ब्राम्हण अक्कलकोट नगरीत स्वामींच्या चरणी सेवा करण्यास आला होता. त्यानें श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्याचे खूप गुणगान ऐकले होते. स्वामींच्या कृपेने अशक्य ही शक्य होते हा विश्वास त्यांच्या मनात जागृत झाला होता.

आणि विश्वासाने त्याने स्वामी चरणी सेवा सुरू केली, नित्यनेमाने स्वामींच्या दरबारात पडेल ती कामे तो करत असे. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ रोज

विविध असंख्य भक्तांना योग्य दिशा देण्याचे काम करत होते तसेच मार्गदर्शन करत. यातुन तो मुका ब्राह्मण बोध घेत स्वतःला घडवत होता. स्वतःचा विश्वास वाढवत होता.

असे जवळजवळ त्या मुक्या ब्राम्हणाने बारा वर्ष स्वामींची सेवा केली. आता त्या ब्राम्हणाची सेवा फळाला येण्याची वेळ आली होती.एके दिवशी स्वामी आनंदात चिंतन करत बसले होते.

तेव्हा मुका ब्राम्हण नेहमीप्रमाणे स्वामीच्या सेवेसाठी दरबारात आला. तेव्हा स्वामींच्या समोर हात जोडून उभा राहून दर्शन घेत असतो. तेवढ्यात स्वामींनी आपल्या मुखातून तांबूल काढला आणि त्या ब्राह्मणांस खाण्यास दिला.

हे पाहुन मुक्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला , त्याने स्वामींचा तो विडा उचलला आणि खाल्ला . त्या वेळी त्या ब्राह्मणास बोलायला येऊ लागल तसेच त्याला वाचा फुटली. हे पाहून सर्वांनी स्वामींच्या नामाचा जयजयकार केला.

स्वामी लीलेतून स्वामी आपल्याला असा काही बोध देतात की स्वामींवर अतूट विश्वास ठेवला असता, अशक्य असे काहीच नाही, ही प्रेरणा आपल्याला समजते.

मुक्या ब्राह्मणाकडून स्वामींनी ही 12 वर्षं सेवा करून घेतली, तसेच श्रद्धा ,निष्ठा याचे शिक्षण दिले. यात पारंगत गेले आणि मग त्याच्यावर कृपा करून त्याच्या आजाराचे निदान केले.

त्यानंतर आपल्याला आलेले अनुभव योग्य , गरजू व पात्र व्यक्तीस द्यावे त्यामुळे स्वामी भक्तीची भावना दृढ होण्यास मदत होते. ” स्वामी राया मला माहित आहे की, ज्या क्षणी मी तुम्हाला माझे सर्वस्व अर्पण केले ,

त्या क्षणापासून जीवनात दुःख, संकट येण्याचे बंद झाली आहेत आणि हे समर्थ जरी दुःख आले तरी मला त्याची पर्वा नाही , कारण मला ठाऊक आहे ,तुम्ही हा प्रसंग नेहमीच मला घडविण्यासाठी दिली आहे.

तुम्ही त्या संकटांना निमित्त करून पुढील पिढीसाठी अनुभवांचा खजाना तयार करून घेत आहे” अशी प्रार्थना करावी. गोविंद नास्तिक होता तो एक शिकलेला इंजिनियर होता.

एक दिवस शेतात काम करत असताना त्याला चक्कर आली व तो कोसळून पडला. दवाखान्यात गेल्यावर समजले की त्याला हृदयविकार झटका आला होता. पण परिस्थिती खूप नजुक होती व तो आता जेमतेम 3 दिवसांचा पाहूणा होता असे डॉक्टर म्हणाले.

अशावेळी सर्वजण चिंतित होते. त्याचे घरचे व मित्र परिवार स्वामींना साकडं घालत होते. अशावेळी एक भुजंग नावाचा व्यक्ती आला व त्याने सांगितले

की तो स्वामी भक्त असून त्याला दृष्टांत झाला की गोविंद ला स्वामींचे रज ललित स्तोत्र वाचायला सांगा. सुरवातीला त्याने नकार दिला पण घरच्यांनी गयावया केल्यावर त्याने 2 दिवस वाचले. यामुळे त्याला बरे वाटले.

डॉक्टर सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याला घरी जायला परवानगी दिली. यामुळे काय सिद्ध होत? स्वामी योग्य वेळी भक्ताची वाट बघत असतात व आपला भक्त त्याच्याकडून भक्ती करून घेतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *