नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, संकष्ट चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. आश्विन महिन्यातील चतुर्थीला वक्रतुंड संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे.
यंदा संकष्ट चतुर्थीचा हा उपवास १ नोव्हेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात बुद्धी आणि ज्ञानाची देवता गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रत्येक कार्यात पहिला मान दिला जातो. प्रत्येक महिन्यात २ चतुर्थीचे व्रत केले जातात.
विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविक सुख, शांती आणि समृद्धीसाठी श्री गणेशाची पूजा करतात.
हिंदू पंचागानुसार संकष्ट चतुर्थी तिथी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल. तर दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल.
परंतु, या संकष्टीचे व्रत हे बुधवारी १ नोव्हेंबरला केले जाणार आहे.संकष्ट चतुर्थीला सर्वप्रथम आंघोळ करुन नवीन वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गणेशाला सिंदूर लावून पूजा करावी. सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
तसेच श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला फुले, मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.धन प्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थीला गणेश स्तोत्राचे पठण करावे. तसेच श्रीगणेशाला जास्वंदीचे फुल आणि दुर्वा अर्पण करावे.
वक्रतुंडा संकष्टी चतुर्थी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भाविक गणेशाची पूजा करतात आणि उपवास करतात. यामुळे साधकाला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
पूजेदरम्यान श्री वक्रतुंडा महाकाय सूर्य कोटी सम्प्रभा निर्विघ्नम् कुरु या मंत्राचा जप करावा.
शेवटी, संपूर्ण कुटुंबासह गणपतीची आरती करा आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करा.श्रीगणेशाला सिंदूर खूप आवडतो. संकष्टी चतुर्थीला गणपतीला सिंदूर लावून पूजा करावी.
सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. गणपतीला सिंदूर अर्पण केल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते.
भगवान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला झेंडूची फुले, मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा.
धन प्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे पठण करा. यासह ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचा 11 माळ जप करा..यासह या दिवशी 17 वेळा श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा.
तसेच यावेळी ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आणि श्री गणेशाला शमीची पाने अर्पण करा. या उपायाने दुःख आणि गरिबी दूर होते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.