नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, दिवाळीत या काही वस्तू आपण कधीही कोणाला भेट म्हणून देऊ नयेत आणि इतरांकडून भेट म्हणून या वस्तू घेऊ सुद्धा नयेत. अनेक वेळा सण समारंभाच्या वेळी आपण आपल्या आप्तेष्टांना किंवा मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करत असतो
जेणे करून त्यांच्यातील व आपल्यातील नातं आणखी घट्ट होईल परंतु कळत-नकळत आपण काही अशा वस्तू आपल्या आप्तेष्टांना नातेवाईकांना भेट म्हणून देतो त्याचा अशुभ परिणाम देणाऱ्या व घेणार या दोघांनाही भोगावा लागतो.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी एक एनर्जी असते, काही वस्तू मध्ये निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते तर काही वस्तू मध्ये सकारात्मक असते.
आपल्याला जर आपल्या जीवनात सफल व्हायचं असेल , यश पैसा समृद्धी हवे असेल तर आपल्या अवतीभवती आणि आपल्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला हवी .
नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असेल किंवा एखाद्या कारणाने आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा येत असेल तर यामुळे आपल्या घरातील सुख शांती धन आणि आरोग्याचा देखील नाश होतो.
वास्तुशास्त्र मध्ये काही अशा वस्तू सांगण्यात आलेले आहेत ज्या आपण इतरांना भेट म्हणून देऊ नयेत किंवा इतरांकडून सुद्धा वस्तू भेट म्हणून घेऊ नयेत, कारण या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते आणि यामुळे आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
काही अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण इतरांना भेट म्हणून देऊ नयेत किंवा इतरांकडून देखील या वस्तू भेट म्हणून घेऊ नयेत, यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे कोणत्याही देवतेची मूर्ती !
अनेक वेळा आपण पाहतो की दिवाळीच्या सणाला किंवा इतर कोणतेही सण समारंभाच्या वेळी किंवा लग्न प्रसंगाच्या वेळी अनेक जण देवतेची मूर्ती भेट म्हणून देतात , ही चूक चुकूनही करू नका कारण आपण जर एखाद्याला एखाद्या देवी देवतेची मूर्ती भेट म्हणून दिली
आणि त्या व्यक्तीने जर त्या मूर्तीचा आदर केला नाही तर या गोष्टीचा नकारात्मक प्रभाव घेणाऱ्याच्या व देणार याचाही जीवनावर पडतो. आपण जी वस्तू दुसऱ्याला देत आहोत त्या व्यक्तीने जर त्या वस्तूचा योग्य वापर केला नाही
तर यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला देखील भोगावे लागतात. दुसरं म्हणजे धारदार वस्तू, या सर्व वस्तू मध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, अशा वस्तू जर आपण आपल्या संबंधित जे आहेत त्यांना भेट म्हणून दिल्या तर त्या सोबतच ते आपले संबंध बिघडतात.
पुढची वस्तू म्हणजे पाण्याशी संबंधित वस्तू, कासव असेल, फिश टॅंक असेल किंवा फाउंटन अशा वस्तू अनेक वेळा आपण समोरच्याला भेट म्हणून देतो परंतु वास्तुशास्त्रानुसार या वस्तू भेट म्हणून दिल्याने देणारे व घेणारे ला मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होते
म्हणून पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू असेल तर ती इतरांना भेट म्हणून देऊ नका . पुढची गोष्ट म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरातील दही असेल किंवा ताक दुधाशी संबंधित कोणतीही वस्तू दुसऱ्याला देऊ नका.
तुम्हाला हे माहित असेल की जुन्या काळात सूर्यास्तानंतर कधीही कोणाला दुधाशी संबंधित कोणतीही वस्तू दिली जात नव्हती, कारण यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती निघून जाते . दूध हे सौभाग्य आहे, प्रगतिच्या संबंधित आहे,
आपण इतरांना दिला तर यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती आणि लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे वरील पैकी कोणतीही वस्तू इतरांकडून भेट म्हणून घेऊ नका किंवा इतरांना भेट म्हणून देवू पण नका.
अशी एक वस्तू आहे जी आपण इतरांना भेट म्हणून देऊ शकतो , भेट म्हणून देण्यासाठी शुभ मानली जाते ती वस्तू म्हणजे दागदागिने असतील, अलंकार असतील किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एखादी असेल या वस्तू तुम्ही एखाद्याला भेट म्हणून देऊ शकता
किंवा दुसऱ्याकडून देखील या वस्तू भेट म्हणून घेऊ शकता . तुम्ही मोरपंख एखाद्याला भेट म्हणून देऊ शकता. यात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते, असं मोरपंख जर तुम्ही एखाद्याला भेट म्हणून दिलं तर यामुळे घरातील वास्तु दोष नाहीसा होतो.
पुढची वस्तू आहे लाफिंग बुद्धा , लाफिंग बुद्धा सुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीला भेट म्हणून देऊ शकता, यामुळे समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद देत असतो. दुसरा म्हणजे माती पासून बनवलेले वस्तू, माती पासून बनवलेले वस्तू भेट म्हणून देणे देखील खूप शुभ मानलं जातं.
त्यामुळे देणारा व घेणारा च्या जीवनात शुभ ऊर्जा येते. तर अशा मातीपासून बनवलेल्या वस्तू तुम्ही भेटू शकता. तुम्हीदेखील आपल्या आप्तेष्टांना नातेवाइकांना किंवा मित्र-मैत्रिणींना काही भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर वरील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
दिवाळीत मांसाहार वर्ज्य आहे. संभोग करू नये. कोणाला शिवीगाळ ,चोरी लबाडी करू नका. तसेच या दिवसात जास्तीत जास्त मन प्रसन्न ठेवा. नक्कीच लाभ होतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.