नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते.
रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते.
निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर एकूणच आपल्या दिनचर्येवर झोपेचा खूप मोठा प्रभाव असतो.
माणसाला निरोगी जीवन आणि तजेलदार दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी 7 ते 8 तास शांत झोपेची गरज असते.
रात्री झोप निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते.
निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. काही वेळा रात्री निवांत झोपण्यापूर्वी काही वाईट विचार येत असतात.
याशिवाय रात्री शांत झोपायच्या वेळी ,आपल्याला सतत कोणतीतरी चिंता सतावत असते.
टेन्शन वाढत असते ,तसेच मुलांच्या भविष्याच्या विचारांनी आपण टेन्शन घेत असतो.अशा प्रकारे बरेच विचार आपल्याला खूप त्रास देत असतात.
ही समस्या खासकरून घरातील मुख्य व्यक्तीला किंवा कमावणाऱ्या व्यक्ती किंवा महिलांना होत असल्याचे दिसून येते. यामध्ये त्यांना रात्री झोप येत नाही, आली तर अर्ध्या रात्री येत असते.
त्यामुळे या अर्ध्या झोपेमुळे, सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवस खराब जातो, त्यामुळे त्याना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
यासाठी हा एक मंत्र तुम्हाला रात्री निवांत आणि चिंतामुक्त झोपण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. शांत झोप म्हणजे शरीर व मन चांगले राहण्यासाठी मदत करते.
या मंत्र जपासाठी काही विशेष गोष्टी करण्याची गरज नाही.
“या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता ll नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ll”
हा जप झोपताना मनातल्या मनात बोला, तसेच देवीचे स्मरण देखील करा त्यामुळे तुमची झोप छान होईल. आपल्या जीवनातील अडीअडचणी देवी मातेला सांगा.
त्यामुळे मन हलकं होईल. आपला त्रास कमी होऊन भक्ती व शक्ती दोन्ही वाढेल. परिणामी आपल्याला जीवनात संघर्ष करण्याचं बळ मिळतं.
त्यामुळे आपलं जीवन सुखी व आनंदी बनते. देवी माता आपल्या सर्वांचे रक्षण करते, जर वाईट स्वप्न पडत असतील,
काही अनामिक भीती वाटत असेल तर तुम्ही हा मंत्र रोज झोपताना बोलू शकता.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.