नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दिवाळीतल्या वसुबारसच्या दिवशी केली जाते गायीची पूजा आणि मंडळी ही गाईची पूजा खरंतर गाईजवळ जाऊन करायची असते गोम मातेची पूजा फार महत्त्वाची असते.
पण शहरांमध्ये गाय दिसणं मुश्किल झालेला आहे अशावेळी देवांमध्ये जी कामधेनू असते तिचीच पूजा केली जाते. गायीच्या मूर्तीची पूजा घरातली घरात तुम्ही वसुबारसाच्या दिवशी कशी कराल तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे.
मंडळी नमस्कार मी कविता कुलकर्णी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळीमध्ये वसुबारस च्या दिवशी गायीची पूजा घरातल्या घरात कशी मांडावी आणि कशी करावी.
चला तर मग सुरुवात करूया साहित्य पासून इथे तुम्हाला दिसत असेल संपूर्ण साहित्य मी घेतलेला आहे यामध्ये गाईची छोटीशी मूर्ती आहे तुपाची निरांजन आहे.
त्याचबरोबर फुल आहेत विड्याची पान आहेत तेलाचा एक दिवा घेतलेला आहे हळदीकुंकू अक्षदा आहे दूध घेतलेला आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे पाणी आहे.
आणि अष्टगंध सुद्धा घेतलेला आहे या प्रकारे संपूर्ण साहित्याची जमा जमा झाल्यानंतर आता आपण सुरुवात करूया गाईच्या पूजेला मंडळी गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव वास करतात.
असं मानलं जातं म्हणून तर गाईला गोमाता म्हटले गेले अहो साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गोपालक म्हणून जन्म घेतला का बरं घेतला असेल तिथेच गाईचे महत्त्व आपल्या लक्षात येतं.
भगवंताने सुद्धा खूप आलत बनवून गाईची सेवा केली म्हणजे गाईचा आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून गायची सेवा आपणही करायला हवी आता अर्थात तुम्ही शहरात राहत असाल किंवा गाईची सेवा करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता.
वसुबारसच्या दिवशी घरातल्या घरात तुम्ही गाईच्या मूर्तीची तर पूजा कराच पण या दिवशी तुम्ही एखाद्या गोशाळेला दान देऊ शकतात त्या गोशाळेच्या गरजा ओळखून त्या गरजेनुसार त्या गोशाळेला दान दिलं तर गाईंची मदतच होईल आणि गोमातेची सेवा तुमच्या हातून घडेल चला आता बघूया की गाईची पूजा कशी करायची.
त्यासाठी मी इथे एक चौरंग घेतलेला आहे त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेतले इथे एक छोटा पाठ घेतलाय त्यावरही एक लाल वस्त्र टाकून घेतले फुलांनी थोडीशी सजावट केलीये एक तेलाचा दिवा इथे प्रज्वलित करून घेतलेला आहे.
आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत गणपती पूजन करणार आहोत कारण गणेश पूजन शिवाय कुठलीही पूजा सुरू होत नाही आणि कुठलीही पूजा पूर्ण झाली असं मानलं जात नाही.
म्हणे गायीच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर आपण गाईच्या मूर्तीची आसनावर स्थापना करणार आहोत तिथे दोन विड्याची पानं मांडणार आहोत.
त्यावर अक्षदा ठेवणार आहोत आणि तिथेच आपण आपल्या गोमातेची स्थापना करणार आहोत आता पाहणार आहोत गाईला हळद कुंकू अक्षदा अष्टगंध आणि फुल गोमातेला वस्त्र माळ हे अर्पण करणार आहोत गोमातेला वस्त्रमाळ फुल याप्रमाणे अर्पण केलेली आहे.
आणि गाईची व्यवस्थित पूजा केलेली आहे आता गोमातेला नैवेद्य दाखवायचा आहे तुपाच्या निरांजनीने ओवाळाच आहे या प्रकारे तुम्ही तुपाच्या निरांजलीने गोमातेला ओवाळायचा आहे गणपतीची आरती म्हणायचे आहे माता दुर्गेची आरती म्हणायची आहे आणि गोमातेला ओवाळायचा आहे.
या दिवशी गहू मूग खाऊ नये श्रेया बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात या दिवसापासून पणत्या लावायला सुरुवात होते हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गाईची उत्पत्ती ऋग्वेद अनुसार अंगीरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली.
गाय अमृताची नाभी देवांचे पूजन करण्याचे साधन रुद्राची माता वसुंची माता आणि आदित्याची बहीण आहे असं ऋग्वेदात सांगितलेले आदिती या वैदिकांच्या परमपुण्य देवीला गाय म्हंटल जातात म्हणूनच देवांना गोजात म्हटले जातात.
गाय प्रत्यक्ष आदिती आहे म्हणून ती अवध्य आहे असेही आवर्जून सांगितलं जातं गायीच्या सेवेने अनेक जन्माचे पापही नष्ट होतं.
म्हणून गोमातेच्या सेवेचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये आहे तेव्हा मंडळी यंदा दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा वसुबारसच्या दिवशी गायची अशी छोटीशी आणि साधी पूजा करा पण भक्ती भावाने करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.