14 नोव्हेंबर दिवाळी पाडव्याला असे करा पतीचे औक्षण, बलिप्रतिपदा, कार्तिक महिन्यात रोज करा हे काम…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, मी तुम्हाला दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदेची संपूर्ण माहिती सांगणार आहे कार्तिक महिन्याला सुद्धा याच दिवसापासून सुरुवात होते तर भगवान श्रीहरी विष्णूंचा हा अतिशय प्रिय महिना आहे.

याच महिन्यामध्ये देव उठणे एकादशी येते म्हणजेच चातुर्मासाची समाप्ती होते तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्या सेवा आपण या दिवशी केल्या पाहिजे कोणता नैवेद्य आपण त्यांना दाखवला पाहिजे.

मंडळी बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो जो दिवाळीमध्ये येत असतो दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा पाचवा दिवस संबोधला जातो.

वसुबारसे पासून सुरुवात केली तर वसुबारस त्यानंतर धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर येथे बलिप्रतिपदा ज्यालाच आपण दिवाळी पाडवा सुद्धा म्हणतो आणि याच दिवसापासून कार्तिक महिन्याला देखील सुरुवात होते.

या दिवशी मध्य आणि उत्तर भारतामध्ये नवीन विक्रम सावंत सुरू होते इसवी सणाच्या आकड्यामध्ये 57 किंवा 58 मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो शालिवाहन सकाळच्या आकडे यामध्ये 135 किंवा 136 मिळवले तरी सुद्धा संवत्सराचा अंक मिळतो.

महाराष्ट्रामध्ये या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या किंवा सासरच्या पुरुषांना सुद्धा ओवाळतात म्हणूनच या दिवसाला आपण दिवाळी पाडवा म्हणतो तरी यंदा म्हणजे 2023 या वर्षांमध्ये 14 नोव्हेंबर 2023 ला मंगळवारी दिवाळी पाडवा आलेला आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला बलिप्रतिपदेची कथा सांगते.

त्यानंतर पतीचा औक्षण कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे मंडळी बलिप्रति पदेला भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा करतात बळी हा असूरांचा राजा होता त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला.

त्याला पाताळलोकी पाठवलं आपल्याकडे काही समाजकंटक श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणतात परंतु शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम आहे त्याची हत्यार सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहे.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त या दिवशी अनेक प्रकल्प चालू केले जातात या दिवशी बळीराजाचे रांगोळीचे चित्र काढतात त्याची पूजा करण्याची पद्धत आहे तुमच्याकडे ही पद्धत आहे का कमेंट्स करून नक्की कळवा इडा पिडा टळु आणि बळीच राज्य येऊ.

हे त्यासाठीच म्हणतात पण त्यामधला जो बळीराजा आहे तो श्रीकृष्णांचा भाऊ बळीराम आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं शेतकरी लोक पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात आणि एका मडक्यामध्ये कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतामध्ये जातात आणि ते मडक शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.

काही ठिकाणी बळीची अश्वारूढ म्हणजे घोड्यावर बसलेली प्रतिमा करून तिची पूजा करण्याची पद्धत आहे असा हा लोककल्याणकारी राजा बळी त्याच्या पूजनाचा हा बलिप्रतिपदेचा दिवस असतो या दिवशी विक्रम सावंत सुरू होतो पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.

आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात तर तुम्ही सुद्धा तुमचा काही व्यापार असेल व्यवसाय असेल तर या दिवशी तुम्ही एखादी नवीन व्यवसायाची वही खरेदी करू शकतात आणि तिची सुद्धा पूजा करू शकता.

जर तुम्ही लक्ष्मीपूजनाला नवीन वया घेऊन त्याची पूजा केलेली असेल तरी पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वस्तिक वगैरे काढून तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या वयांची पूजा करता येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्यावयांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.

जसा आपण भाऊबीजेला एक पिठाचा दिवा तयार करतो साईडने दोन पिठाचे मुटके सुद्धा या पिठाच्या दिव्याजवळ ठेवले जातात अगदी त्याच पद्धतीचे ताट तयार करून आपल्याला आपल्या पतीचा औक्षण या दिवशी करायचा असतं प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचा औक्षण या दिवशी करायला विसरू नका.

त्यानंतर पतीने सुद्धा आपल्या घरची लक्ष्मी आहे म्हणून पत्नीला काही का होईना भेटवस्तू द्यायला विसरू नका तर यामध्ये खूप महागड्या वस्तू किंवा सोन्या-चांदीचे दागिने दिले पाहिजे असं काही नाही तुमच्या इयत्ता शक्तीनुसार तुम्ही तुमच्या पत्नीला काहीतरी आनंद द्यावा किंवा तिला खुश करावं.

म्हणून काही का होईना भेटवस्तू या दिवशी देऊ शकता नवविवाहित जे दांपत्य असतं त्यांची बऱ्याच वेळा पहिली दिवाळी जी आहे किंवा पहिला दिवाळी पाडवा जो आहे तो मुलीच्या माहेरी केला जातो.

जेणेकरून जावयाला सुद्धा काहीतरी कपड्यांचा किंवा पैसे वगैरे म्हणा तर काही का होईना वस्तू देऊन अहेर करण्याची पद्धत या दिवशी आहे तर तुम्ही भले या दिवशी माहेरी असाल महिलांसाठी सांगते तुम्ही भलेही या दिवशी माहेरी असाल किंवा सासरी असाल तरी पण तुम्ही तुमच्या पतीचा औक्षण या दिवशी करायचा आहे.

बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्या लक्ष्मीपूजन झालं तरी पण दिवाळी पाडवा झाल्याशिवाय सासरी यासाठी जात नाही कारण पतीचा औक्षण त्यांना दिवाळी पाडव्याच्या दिवशी करायचा असतं कधी कधी काय होतं आता मागच्याच वर्षाचं घ्यायचं झालं तर भाऊबीज आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी होता तर बऱ्याच स्त्रियांची या दिवशी तारांबळ उडते कारण माहेरी जायची सुद्धा घाई असते.

भावाला वळण्यासाठी आणि इकडे पतीचे ओवाळणं पण कधी कधी राहून जायला नको तर यावर्षी काही नाहीये लक्ष्मीपूजन १२ तारखेलाच होईल 13 तारखेला अश्विन अमावस्या आहे आणि 14 तारखेला दिवाळी पाडवा आहे त्यानंतर 15 तारखेला भाऊबीज आहेत त्यामुळे तुम्ही 14 तारखेला तुमच्या पतीचा औक्षण करायला विसरू नका.

राजा म्हणाला तिसरा पाय आता माझ्या मस्तकावर ठेवा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवला आणि बळीराजाला पाताळात घालवायचं ठरवून वामनाने असं म्हटलं की तुला आता पातळात जावं लागणार आहे तर तुला काही वर मागायचा असेल म्हणजे शेवटची इच्छा मागायची असेल तर तू नक्की मागू शकतो.

तेव्हा बळीराजा म्हणाला आता पृथ्वीवरील सर्व काही माझं राज्य संपणार आहे कारण मी पाताळात जाणार आहे तुम्ही मला पाठवणार आहात तेव्हा तीन पावलं टाकण्याच्या अगोदर जे काही सर्व घडलं ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझं राज्य म्हणून ओळखला जावं प्रभू यमाप्रित्यर्थदीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत.

त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा ते तीन दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी ज्याला आपण नरक चतुर्दशी म्हणून ओळखतो त्याचबरोबर अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि शेवटचा.

म्हणजे तिसरा दिवस जो आहे तो हा कार्तिक शुद्ध प्रतिपदा ज्याला बळीराजा किंवा आपण बलिप्रतिपदा असे म्हणतो तर म्हणून ही बलिप्रतिपदा या बळीराजाच्या स्मरण म्हणा किंवा त्याला शिक्षा जी दिली होती भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवतारने तर त्याच स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

बऱ्याच ठिकाणी गोवर्धन पूजा म्हणून किंवा भगवान श्रीहरी विष्णूंनी जी काही पर्जन्यवृष्टी झाली होती त्यामध्ये तिथली जनता वाहून जाऊ नये म्हणून गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला आणि सगळ्यांना जो काही आसरा दिला होता तर त्या गोवर्धन पूजेचे प्रतीक म्हणून शेणाचा डोंगर तयार केला जातो.

आणि तिथेच भगवान श्रीहरी विष्णूंची तांदळाने किंवा रांगोळीने मूर्ती रेखाटली जाते तिथे मिठाई वगैरे ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे बरेच जण आपल्या घराच्या बाहेर बळीराजा आणि त्याची पत्नी जी होती विंध्यावली तर त्यांचे सुद्धा चित्र काढतात त्यांची सुद्धा पूजा करतात.

काही ठिकाणी मिठायांचेच गोवर्धन पर्वताच्या आकाराची रास तयार करतात आणि तिथे सुद्धा श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आहे तर वेगवेगळ्या भागांनुसार पूजेची किंवा सण साजरा करण्याची पद्धत जरी बदलत असली तरी पण कार्तिक महिना जो आहे.

तो भगवान श्रीहरी विष्णूंचा आवडता किंवा सेवेचा महिना म्हणून ओळखला जातो तर या दिवसापासून आपण सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरू नका तुमच्या आसपास कुठे आवळ्याचे झाड असेल तर या आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दिवा लावू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *