वसुबारस 2023, वसुबारसच्या दिवशी असा चमत्कारिक उपाय तुम्हाला कुणी सांगितला नसेल!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, 9 नोव्हेंबर पासून दिवाळी सुरू होईल. त्यामुळे दिवाळी अगदी जवळ आली आहे, दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, जो गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी साजरा होईल. वसुबारसेच्या दिवशी आपले हिंदू शास्त्र सांगते की महिलांनी आपल्या मुलांसाठी आपल्या अपत्यासाठी या दिवशी उपवास करावे.

व्रत करावे, ज्यामुळे मुलांवर कोणतेही संकट येणार नाही, मुलांची प्रगती होईल, मुलांचे आरोग्य चांगले राहील, महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करावे,

कारण एक नोव्हेंबरला दिवाळी सुरू होत आहे. एक नोव्हेंबरपासून दिवाळीची सुरुवात होईल. एक नोव्हेंबरला रमा एकादशी सुद्धा आहे. रमा एकादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी सुद्धा या दिवसाला म्हणतात. काही ठिकाणी वसुबारस म्हणतात.

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा करावी. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.

वसुबारस हा दिवस आईच्या मुलांसाठी असतो, त्यांच्या नात्यासाठी असतो म्हणून या दिवशी महिलांनी उपवास करावा. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी तोच उपवास वसुबारस चा उपवास केला तरी चालतो.

एकादशीचा उपवास करत नसतील तरी त्यांनी वसुबारसचा उपवास नक्की करायचा आहे. हा उपवास आपल्या मुलांसाठी करायचा. खास करून महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी उपवास करताना शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे फळ त्वरित मिळते,

सकाळी लवकर वसुबारसेच्या दिवशी उठायचे, आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी स्वामी महाराजांना नमस्कार करायचा, देवी देवतांना नमस्कार करायचा, गोमातेची प्रतीमा असेल तर पूजन करा, स्मरण करावे आणि आपल्या उपवासाची सुरुवात करायची.

यादिवशी अभद्र बोलू नये,असत्य बोलू नये.यादिवशी विशेषतः पुरण पोळीचा नैवेद्य करतात, शक्य नसल्यास काहीतरी गोड नक्की करा व या नैवेद्याच्या सोबतच तुम्ही डाळ व गूळ गाईला खायला द्या, हिरवा चारा द्या, मुलांसमोर प्रेम व्यक्त करा.

कारण हा दिवस गाईच्या दिवस असतो . मातेचा दिवस असतो. गायीला नैवेद्य घेऊन बरेच लोक उपवास सोडतात. तुम्हीसुद्धा गायीला नैवेद्य दाखवायचा आहे. बऱ्याच शहरांमध्ये गाय मिळत नसते.

गाईला नैवेद्य देऊ शकत नाहीत, त्यावेळेस तुम्ही फक्त बाजूला काढून ठेवायचा , गोशाला तर असतेच प्रत्येक शहरात, तिथे जाऊन दान करून गाईचा आशीर्वाद घ्या. देवाला नैवेद्य नंतर तुम्ही खाऊ शकता.

शकतात तर अशा रीतीने महिलांनी आपल्या मुलांसाठी व्रत नक्की करावे . मुलांचे भविष्य सुंदर घडते, त्यांच्या अडचणी दूर होतात.उपवासाच्या दिवशी कोणतेही मिठाचे पदार्थ खायचे नाहीत,

तुम्ही फलाहार करू शकता, तुम्ही जेवण फक्त संध्याकाळी करू शकता, त्या दिवशी तुम्ही मिठाचे पदार्थ न खाता फलाहार करा किंवा तुम्ही चहा ज्यूस वगैरे पिऊ शकता, कारण मीठ वर्ज्य आहे

आणि संध्याकाळी तुम्ही जेवण करायचे आहे स्वयंपाक करायचा आहे आणि सगळ्यात आधी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर गायीला नैवेद्य द्यायचा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे. गायीला हिरवा चारा घाला. गायीची पूजा करून आशीर्वाद घ्या.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *