नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, यंदा दसरा 24 ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या दिवशी अपराजिता मातेची पूजा करून सायंकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हे अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. 5 राशीच्या लोकांसाठी हा शुभ दिवस विशेष भाग्यवान ठरू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी यंदाचा दसरा चांगला राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवन आनंदी आणि समृद्ध होऊ शकते.चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. या सप्ताहात रविवारी दुर्गाष्टमी, सोमवारी महानवमी, मंगळवारी विजयादशमी (दसरा), बुधवारी पाशांकुशा एकादशी,
गुरुवारी प्रदोष तर शनिवारी कोजागरी पौर्णिमा तसेच खंडग्रास चंद्रग्रहण आहे.मंगळवारी पहाटे ४:२४ पासून पंचक सुरु होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे तीन दिवस पूर्ण काळ पंचक असून, शनिवारी सकाळी ७:३१ पर्यंत पंचक राहील.
मेष राशी: तुमच्या राशीच्या लोकांसाठी दसऱ्याचा दिवस खूप शुभ आहे. दसऱ्याच्या दिवशी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुम्ही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि संततीकडून चांगली बातमी मिळू शकते.
हा दिवस तुमच्यासाठी व्यग्र असेल. दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते किंवा काही मोठा फायदा होऊ शकतो.कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. असे असले तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो.
व्यापारातील पाऊले विचारपूर्वक उचलावी लागतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो. व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारीत तणाव वाढू शकतो, तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. जोडीदाराची रागीट वृत्ती आपणास पसंत पडणार नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे.
वृषभ राशी: दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळेल. या दिवशी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांसाठी देखील दसरा हा एक चांगला दिवस असू शकतो.
तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल कारण तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. पद आणि प्रतिष्ठा वाढून तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल. पगारात वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि भेटवस्तू मिळाल्याने मन प्रसन्न राहील.
आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानकपणे झालेल्या ह्या वाढीमुळे आपण काहीसे घाबरून जाल, परंतु धीर धरा. प्राप्तीत कपात संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव राहील. विनाकारण भांडण होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम केल्या नंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवते. परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कन्या राशी : दसर्याचा दिवस नोकरदारांना विशेष आनंद देईल. या दिवशी तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. दसऱ्याच्या दिवशी तुमची कीर्ती आणि वैभवात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल.
विवाहित महिलांना माहेरहून काही चांगली बातमी मिळू शकते. हा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने घालवाल.विवाहितांचे जीवन चढ – उतारांसह वाटचाल करेल. व्यापारास अत्यंत फायदेशीर आहे. आपले कौशल्य व आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील.
नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र कनिष्ठांपासून थोडे सावध राहावे लागेल. ते काही त्रास देऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होऊ शकतो.
धनु राशी: दसरा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. या दिवशी तुम्हाला पूजेची आवड निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता.
कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. या दिवशी कोणतेही काम सुरू करायचे असल्यास ते यशस्वी होऊ शकते.प्रलंबित योजना सुरु झाल्याने नोकरी असो किंवा व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तीत जलद गतीने होणारी वाढ.
वाढीव रकमेची गुंतवणूक अशा ठिकाणी कराल की ज्यामुळे भविष्यात लाभ घेऊ शकाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी होण्याची संभावना आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष ठेवावे. पोटाशी संबंधित विकार आपणास त्रस्त करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक विघ्नांना सामोरे जावे लागेल व त्यामुळे अभ्यासावर जास्त एकाग्र होण्याची आवश्यकता भासेल.
कुंभ राशी: तुमच्या राशीच्या लोकांसाठी दसरा चांगला दिवस असू शकतो. तुमचे मन प्रसन्न राहील आणि कौटुंबिक जीवन सुखकर राहील. यामुळे तुम्हाला चांगले वाटेल, शरीर आणि मन दोन्ही ठीक राहतील. दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला मित्रांकडून मोठी भेट मिळू शकते.
या दिवशी तुम्ही अध्यात्मातही थोडा वेळ घालवाल.इच्छा असेल तर नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी योजना यशस्वी होतील. कामानिमित्त प्रवास करावे लागतील व त्यामुळे आपण यशाच्या मार्गापर्यंत जाऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणात यश प्राप्ती उत्तम होईल
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.