नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुमचा ज्योतिषशास्र , कुंडली, पत्रिका, ग्रह तारे यावर कदाचित विश्वास नसेलही. तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या कर्तृत्वाने मी यश मिळवेल. पण तरीही तुम्ही हे वाचत आहात म्हणजे तुमच्या मनात कुठेतरी राशिभविष्य जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
अगदी गंमत म्हणून का होईना तुम्ही हे सदर वाचताय म्हणजे असं म्हणताच येईल. असो. बहुतांश लोक दररोज सकाळी वृत्तपत्र घरी आलं की आधी आपलं राशी भविष्य बघतात. काहीजण मासिकामध्ये शोध घेतात. अर्थात काही जण ते मनोरंजनासाठी वाचतात, तर काही अगदी गांभीर्यानं वाचतात.
प्रत्येक राशीची काही स्वभाव वैशिष्ट्यं असतात. आपली जी रास असते त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्त्वात काही गुणवैशिष्ट्ये आढळतात.
मेष राशीचे लोक नेहमी उत्साही असतात. त्यांना सर्व गोष्टींबद्दल उत्सुकता, कुतूहल असतं. एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तर ते त्याबाबत अतिशय सकारात्मक असतात. अत्यंत निर्धारानं, झपाटून जाऊन ते हाती घेतलेलं काम पूर्ण करतात.
स्वतःच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ते सगळी आव्हानं पेलण्यास तयार असतात. पण या मेष राशीच्या लोकांचा एक दुर्गुण आहे तो म्हणजे त्यांच्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत की ते चिडचिडे होतात.
वृषभ राशीचे लोक विश्वासार्हता, व्यवहारीपणा आणि संयम यासाठी ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या हातांनी काम करायला आवडतं आणि कोणत्याही कामासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची त्यांची तयारी असते. या व्यक्ती विश्वासार्ह असल्याने उत्कृष्ट कर्मचारी किंवा मित्र म्हणून लोकप्रिय असतात. त्याचवेळी ते अतिशय ठाम असतात, आपल्याच म्हणण्याला चिकटून राहण्याचा त्यांचा स्वभाव असतो.
मिथुन राशीच्या व्यक्ती अगदी समर्पित साथीदार असतात. गप्पीष्ट स्वभावाच्या या व्यक्तींना त्यांना भेटणार्या प्रत्येकाशी गप्पा मारायला आवडते. अतिशय प्रेमळ असणाऱ्या या व्यक्ती जिज्ञासू आणि मुक्त, दिलखुलास स्वभावाच्या असतात. लेखक आणि कलाकार व्यक्ती या राशीच्या असतात. चंचलता आणि अस्थिर स्वभाव ही यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना आयुष्यात सतत नावीन्य हवे असते.
कर्क राशीचे लोक सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्ट्याही भावनिक असू शकतात. हे लोक समर्पित, दयाळू आणि सहानभूती असणारे असतात. अडचणीत असणाऱ्या लोकांच्या मदतीला ते स्वतः धावून जातात. मात्र कर्क राशीचे लोक अतिशय मूडी असतात. त्यांच्या स्वभावात अधीरता असते. काहीसे स्वार्थीसुद्धा असतात.
सिंह राशीच्या व्यक्ती नावाप्रमाणे उग्र असतील असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही. या राशीच्या लोकांना इतरांचे लक्ष आकर्षित करून घ्यायला आणि सतत केंद्रस्थानी राहायला आवडतं. त्यामुळं सेलिब्रिटी असलेल्या व्यक्ती या राशीच्या असतात. या लोकांची कल्पनाशक्ती उत्तम असते;पण उत्कटतेचा अभाव असतो. त्यांना थिएटरमध्ये जाणे, मित्रमैत्रीणीबरोबर मजा करणे, वस्तू खरेदी करणं आवडतं.
कन्या राशीचे लोक अतिशय व्यवस्थित, बारकाईनं सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारे असतात. स्वतःचे अतिशय परखड आत्मपरीक्षण करणारे असे हे लोक असतात. एखादी गोष्ट उत्कृष्ट करण्यासाठी ते स्वत:वरच दबाव आणत असतात. अतिशय समर्पित आणि दयाळू असलेले हे लोक मनाने अतिशय उदार असतात. ते उत्तम केअरटेकर, नर्सेस होऊ शकतात.
तूळ राशीच्या व्यक्तींना लोकांमध्ये रहायला खूप आवडतं. ते समाजशील असले तरीही त्यांना एकांतही आवडतो. व्यक्तिस्वातंत्र्य त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यांना स्वतःबद्दल अतिशय अभिमान असतो. बुद्धिमत्तेवर यांचा अधिक भर असतो.
अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चेत त्यांना रस असतो. सभ्यता आणि सकारात्मकता यांचा अपूर्व संगम या लोकांमध्ये आढळतो. कोणत्याही किमतीवर मतभेद टाळण्याकडे त्यांचा कल असतो.
वृश्चिक राशीचे लोक नैसर्गिकरित्या नेते असतात. प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असणारे हे लोक सत्यतेवर विश्वास ठेवतात. विश्वासार्हता हा त्यांचा मोठा गुण असतो. एखादी गोष्ट यांना गुप्त ठेवायला सांगितली तर ते जीवाच्या करारानं ते गुपित बाळगतात. मात्र कधीतरी हाच गुण त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. इर्ष्या हा वृश्चिक राशीच्या लोकांचा मोठा अवगुण आहे. त्यांच्या नात्यांसाठी हाच गुण मारक ठरतो.
धनु राशीचे अत्यंत दिलखुलास आणि उत्तम विनोदबुद्धी हे या लोकांचे खास स्वभाव विशेष. त्यांना प्रवास करायला आणि नवीन लोकांना भेटायला आवडते. नवनवीन ठिकाणं पाहण्यास ते नेहमीच उत्सुक असतात. धनु राशीच्या लोकांना एखादी कल्पना सुचते तेव्हा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते झपाटून काम करतात. त्यांची एक सवय मात्र त्यांना अडचणीत आणणारी असते.
मकर राशीची माणसं अतिशय शिस्तबद्ध आणि जबाबदार असतात. त्यांच्याकडे कार्यपद्धती तयार करण्याची आणि त्यांची अमलबजावणी करण्याची क्षमता असल्यानं या व्यक्ती व्यवस्थापकीय पदांची जबाबदारी उत्तम रितीनं पार पाडतात.
तेच एखादं रेस्टॉरंट निवडण्याची वेळ येते तेव्हाही ते विनाविलंब निवडतात. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची यांची क्षमता कौतुकास्पद असते; परंतु यामुळे ते काही वेळा दूरस्थ असल्यासारखे भासतात. यांना संगीताची आवड असते. कुटुंबाला त्यांचं सर्वाधिक प्राधान्य असतं.
कुंभ राशीचे लोक विचारवंत असतात. ते सतत इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात. अर्थपूर्ण संभाषण त्यांना अधिक आवडतं. कुंभ राशीचे लोक थोडेसे लाजाळू असतात; परंतु आवश्यकता असते,तेव्हा ते मोकळे होतात. मित्रांच्या गटात हे लोक खूप खुलतात. समाजातील सर्व स्तरातील लोकांबद्दल त्यांना काळजी असते.
मीन रासही प्रेमळ आणि दयाळू व्यक्तींची रास आहे. दयाभाव आणि बुद्धिमत्ता हे गुण असणाऱ्या या व्यक्ती दुसर्याचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात.
त्यांना संगीत आवडतं. रोमान्स आवडणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींना वास्तवापासून दूर रहायचे असते. या व्यक्ती सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात. त्यामुळं अनेकदा त्यांच शोषण होतं.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.