शुक्रवारी करा ही 10 कामे, पैसा कधीच कमी पडणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, || जय माता लक्ष्मी || हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी आणि उपवासासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणार्‍या भक्तांवर देवी लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते.

तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शुक्रवारचा दिवस यासाठी सर्वात शुभ दिवस आहे. आपली भरभराट व्हावी, घरात अनेकविध धनाचे स्रोत यावेत, घरात नेहमी धन संपदा असावी असे नेहमीच सर्वांना वाटत असते.

प्रत्येकाला आपली परिस्थिती चांगली असावी, सर्व सुख समृद्धी घरात असावी असे वाटते, तसे प्रयत्नही खूप जण करतात पण बऱ्याचदा अपयश येते, त्याची कारणे आपल्या वास्तू शास्त्रात, ज्योतिष शास्त्रात, भविष्य शास्त्रात सांगितली आहेत,

जर आपण त्याप्रमाणे उपाय केले तर नक्कीच आपली प्रगती होईल व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे,

आपल्यावर सदैव तिची कृपा बरसावी यासाठी शुक्रवारी हे छोटे छोटे उपाय नक्की करावेत. घरातील धन, पैसा यांची सफाई आठवड्यातून एकवेळ करावी व शुक्रवारी त्याची पूजा करावी.

शुक्रवार हा देवी लक्ष्मी चा असतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. त्यानुसार आपल्याला फलप्राप्ती होते. सर्व ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा सर्वात चमकदार ग्रह आहे.

जीवनातील यश, कीर्ती, आकर्षण यांच्याशी फार जवळच संबंध या ग्रहाचा असतो. म्हणून शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून प्रसन्न करून घेतले जाते व त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्रवारी लवकर उठुन माता लक्ष्मीची पूजा करा व प्रार्थना करा.

तसेच कमळाचे फुल किंवा कोणतेही लाल रंगाचे फुल मातेला अर्पण करा. घरात धन येत नसेल, बरकत येत नसेल, पैसा टिकत नसेल , नोकरी मध्ये, व्यवसायात पाहिजे तसे काम होत नसेल तर शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला,

तुम्हाला बढती मिळेल, व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळेल. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करा, पांढऱ्या वस्तू दान करा, जसे की तांदूळ, दूध, दही, पांढरी फुले, पांढरी मिठाई इ. जमलं तर वैभव लक्ष्मीचं व्रत संकल्प करून करा.

माता लक्ष्मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. तसेच यादिवशी देवघरातील लक्ष्मीच्या मातेची पूजा करा, धने अर्पण करा, श्री सूक्त, लक्ष्मी मंत्र जप करा. यामुळे माता लक्ष्मी घरात वास करेल. तसेच सायंकाळी कधीही झोपू नका, घरात वाईट, अपशब्द बोलू नये, आपलं काम प्रामाणिक पणे करा ज्यामुळे माता लक्ष्मी सदैव घरी वास करेल.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी : शुक्रवारी गाईला भाकरी खायला द्या, गरीबांना कपडे किंवा अन्न दान करा आणि देवी लक्ष्मीला खीर द्या. शुक्रवारी या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

धनप्राप्तीसाठी: प्रत्येक व्यक्तीला संपत्तीची इच्छा असते. आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये हीच प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही हेच हवे असेल तर शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर ‘ श्रम श्रीं स: केतवे नमः ‘ या मंत्राचा 11 वेळा जप करा.

आम्ही तुम्हाला सांगतो की हा मंत्र केतूचा आहे. शुक्रवारी या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही.

मनोकामना पूर्ण करण्यासाठी : तुमची काही विशेष इच्छा असेल तर त्यासाठी शुक्रवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करावा. एक कच्चा नारळ घेऊन शिवलिंगावर अर्पण करा आणि हात जोडून तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.

जोडीदारासाठी: तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि वैवाहिक जीवनात शक्ती मिळविण्यासाठी , शुक्रवारी 21 वेळा ओम श्रं श्रं श्रं केतवे नम: चा जप करा. नदी मध्ये मूठभर तांदूळ टाका यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!