हरितालिका पूजन व या वस्तू चुकूनही विसरू नका नाहीतर पूजा निष्फल होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, चातुर्मासातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा श्रावण सरला की, सर्वांना वेध लागतात, ते गणपतीचे. भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते. मात्र, त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.

कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते.सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.

अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.

पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती,

अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे.

उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. वाळू आणून वाळूची शिवलिंग तयार करा. पूर्ण श्रध्देने जसे जमेल तसे म्हणजे शिवलिंगाचा आकार असतो तसेच ते थोडे करा.

हरितालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे.

दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचे व्रत केले जाते. हरितालिका व्रताचरणात संपूर्ण दिवस निर्जळी उपास करून दुसऱ्या दिवशी पारणे केले जाते. हरितालिका व्रत कसे करावे? हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी.

पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते. यंदा सोमवार, 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे.

शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी, असे सांगितले जाते. हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली,

तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते.हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. देशातील अनेक भागांत सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.

सकाळी नित्योपचार उरकल्यांतर हरितालिका व्रतपूजनाचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर स्थापना कराव्यात. या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते.

षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो.फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते.

व्रतराज या ग्रंथात या व्रताचे वर्णन आढळते.हरितालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवस उपास करण्याची प्रथा आहे. काही महिला निर्जळी उपास करतात. कुमारिका चांगला पती मिळावा;

तसेच विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, यासाठी हे व्रताचरण करतात. रात्री विविध खेळ खेळून रात्र जागविली जाते. दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखविला जातो.

यानंतर या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यानंतरच उपास सोडला जातो. याला पारणे असे म्हणतात.हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला.

मात्र, पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. ती इतक्यावरच ती थांबली नाही,

तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली.

दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.

हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी.

कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत.

नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *