घरात घेऊन या अशी बाप्पांची मूर्ती, बाप्पा सर्व इच्छा पूर्ण करतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात.

श्री स्वामी समर्थ…काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगानं हिंदू धर्मशास्रांत काही नियम दिले आहेत. घरात श्री गणेश मूर्ती एका विशिष्ट दिशेलाच ठेवावी असं सांगितलं जातं. .

श्री गणरायाची मूर्ती घरात ठेवल्यानं कोणत्याही प्रकारचा क्लेश, दुःख निर्माण होत नाही, तसेच कोणतंही विघ्न किंवा संकट येत नाही, असं मानलं जातं. परंतु, यासाठी गणपतीची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवणं महत्त्वाचं असतं.

घरामध्ये श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लाकडाच्या टेबलावर करू शकता. तसेच श्री गणरायाच्या चरणी एक वाटी तांदूळ अर्पण केले तर तुमचं भाग्य तुम्हाला नक्कीच साथ देईल, असं मानलं जातं.

घरातील जिन्याखाली कदापि श्री गणेश मूर्ती ठेवू नये, कारण त्या जिन्यावरून आपण चालतो आणि त्याखाली मूर्ती ठेवल्यास श्री गणेशाचा अपमान होतो. तसेच खोलीत ज्या ठिकाणी तुम्ही झोपता आणि तुमचे पाय ज्या दिशेला असतात, त्याच्या आसपास श्री गणेशाची मूर्ती ठेवू नये.

या ठिकाणी मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं. काही दिवसातच गणेश चतुर्थी येणार आहे आणि बरेचसे लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरात करत असतात परंतु गणपतीची मूर्ती घरात बसवताना कोणती काळजी घ्यावी? गणपतीची मूर्ती कशी असावी?

याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते, कळत नकळत या चुका आपल्या हातून होतात. गणपतीची मूर्ती जेंव्हा घरी आणणार असतो तेंव्हा ही एका फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती गणपतीची मूर्ती बनवणार असाल तर काळजी घ्या की मूर्तीची उंची ही एक फुटापेक्षा जास्त नसायला पाहिजे.

सहज उचलता आली पाहिजे अशी मूर्ती असली पाहिजे. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेली, विश्राम अवस्थेतील प्रतिमा, सर्वोत्तम मानली जाते. साप- गरुड- मासा किंवा युद्ध करताना चित्र विचित्र आकार असणारी गणपतीची मूर्ती मुळीच घेऊ नये किंवा खूप मोठे असलेले गणपती सुद्धा घेऊ नये.

पार्वतीच्या व शिव शंकराच्या मांडीवर बसलेली गणपती मूर्ती मुळीच घेऊ नये. कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती पूजा निषिद्ध मानली गेली आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी कधीच आणू नये.

गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही . केवळ माती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्की करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात वेळ वाया घालवू नका.

त्या मूर्तीचे त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. मनात कोणतीही भीती व शंका आणू नका. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी शेजारी मित्रमंडळी याचेकरवी पूजा नैवेद्य अर्पण करा.

गणपती विसर्जनाची घाई अजिबात करू नका. गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मद्य, मांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधा भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. जेवनात आंबट- तिखट पदार्थ नसावेत.

दही साखर भात हा सर्वोत्तम नेवेद्य मानला जातो. विसर्जन करताना मृदंग अभंग टाळाच्या गजरात परमात्म्याला निरोप द्यावा. गाणी वाजवून विकृत चाळे अजिबात करायचे नाहीत .

घरात गणपतीची मूर्ती कोणत्याही कोपऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते. बेडरूममध्ये गणपतीची मूर्ती ठेवू नये.असे केल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करतांना डाव्या बाजूने सोंड असणारी मूर्ती खरेदी करावी.

जर आपण उजव्या सोंड असणार गणपतीची मूर्ती आणल्यास कडक नियम पाळणे आवश्यक असते.वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना संततीची इच्छा असते ता लोकांनी घरात बाळ गणेशाची मूर्ती आणावी.

घरातील आणि व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी शिंदूर असलेल्या गणपतीचा फोटो लावावा.घरात गणपती बसवणार असणार तर ती मूर्ती उभी नसावी. म्हणजेच बसलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास कायमस्वरूपी लाभ मिळते.

तसेच घरात सुख-शांती कायम राहते.गणेशाची मूर्ती दुकानातून घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे पैसे आणि सुपारी ठेवण्याची पद्धत आहे. घरी आणताना मूर्तीचे तोंड आपल्याकडे करावे आणि विसर्जन करताना रस्त्याकडे तोंड करावे.

मूर्ती आणताना ती कोणाच्या दृष्टीस पडू नये, असा मूर्ती झाकून आणण्यामागील भाव असतो. घराच्या दारात औक्षण करताना मूर्तीवरून कापड काढले जाते. मातीची मूर्ती असेल तर ती जपली जावी किंवा मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये, अशी मूर्ती झाकण्यामागील भावना असते.

त्यामागे कोणतेही शास्त्र नाही, पण ती काळजी घेण्याची पद्धत आहे. गणेशाची प्राणप्रतिष्ठा सूर्योदयापासून दुपारी १ पर्यंत या कालावधीत अर्थात देवकाळात कधीही करता येऊ शकते. त्यासाठी विशिष्ट मुहूर्त पाहण्याची गरज नाही.गणरायाची मूर्ती दुकानातून आणतांना डोक्यावर टोपी घालून जावे.

तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. डोक्यावर काहीही न घालता पाहुण्याचे स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीला मान्य नाही. डोक्यावर काहीतरी घालून पाहुण्याचे स्वागत करणे हा त्या पाहुण्याचा सन्मान करण्याचा एक भाग आहे.दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा.

शक्यतो एकट्याने मूर्ती आणण्यासाठी जाऊ नये. गणपती आणण्यानारे डोक्यावर टोपी घालावी. श्रीगणेशाची मूर्ती घेताना सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी.

जर चुकून काही कारणास्तव मूर्ती खंडित झाली तर दहीभात नैवेद्य दाखवून ताबडतोब विसर्जन करून यावे नंतर लगेच दुसरी मूर्ती आणावी. चिंता नसावी. जास्तीत जास्त प्रसन्न राहवे व घरी वातावरण प्रसन्न ठेवावे. यामुळे घरात बाप्पांचा आशीर्वाद राहतो.

तुम्हीही तुमच्या घरामध्ये गणपती प्रतिष्ठापना करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे, सांगितलेली माहिती समजून घ्या याप्रकारे मूर्तीची स्थापना करा आणि याच पद्धतीने मूर्ती स्थापना करावी व कंमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *