या शेवटच्या श्रावण सोमवारी केलेले दान देईल अपार सुख आणि घसघशीत पुण्य!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भगवान शंकरासाठी श्रावण महिना हा अत्यंत प्रिय असतो. त्यामुुळे शिवभक्तासाठी हा महिना विशेष आहे. श्रावण हा हिंदू धर्मातील मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे.तसेच हा महिना निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो.

श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे परंतु यातील महत्वाचे व्रत म्हणजे ते श्रावण सोमवार होय.या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मातील प्रत्येक महिला उपवास करतात तसेच या दिवशी श्री शंकर भगवानाची पूजा सुद्धा केली जाते या व्रताबदल अशी मान्यता आहे

कि हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.आता बघू या शेवटच्या श्रावण सोमवारी दानाचे काय महत्व आहे.

त्याविषयीची सविस्तर माहितीभगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. असे सांगितले जाते

कि श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपुजनात जलाभिषेक रुद्रभिषेकाला विशेष महत्व असते.शेवटच्या श्रावण सोमवारी शिवपूजन करून खालील गोष्टी दान केल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते .

दानाचे महत्त्व प्रत्येक धर्मात आपापल्या परीने सांगितले गेले आहे. सनातन धर्मातील दानधर्माची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. एखाद्याच्या कुवतीनुसार धान्य, कपडे, अन्नपदार्थ, पैसा आणि इतर अनेक वस्तू गरजूंना मूकपणे देऊन विसरणे याला दान म्हणतात.

हिंंदु धर्मात गाय दान करणे हे श्रेष्ठ मानले जाते. गोदान हे अनेक जन्म आणि अनेक पिढ्यांसाठी हितकारक असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सुख, संपत्ती आणि संपत्ती हवी असेल तर त्याने गाय दान करावी.

श्रावणात तूप दान करायला खूप महत्त्व आहे. गाईचे तूप भांड्यात ठेवून ते गरजूंना दिल्याने कुटुंबात शुभ वार्ता प्राप्त होते. यासोबतच घरातील सदस्यांचीही प्रगती होते. वस्त्र दान केल्याने तुमच्या जीवनात अनेक यश मिळतात.

चांगल्या मनाने नवीन आणि स्वच्छ कपडे दान करणे फायदेशीर आहे. तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ लागेल.हिंदू धर्मातही श्रावण महिन्यात धान्य दानाला खूप महत्त्व आहे. धान्य दान केल्याने आई लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघीही प्रसन्न होतात.

सोबत शिवमुठचे दान केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात. धान्य दान केल्यास इच्छित फळ मिळते, असा समज आहे. हिंदू धर्मात श्रावणात तीळ ,जवस, मुग हे धान्य दान करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे.

मिठाचे दान सनातन धर्मात हितकारक मानले जाते. श्राद्धाच्या वेळी त्याच्या दानाचे महत्त्व खूप वाढते. गुळाचे दान केल्याने घरातील वादविवाद संपतात. याशिवाय गरिबी दूर होऊन घरामध्ये संपत्ती येण्याचा मार्ग मोकळा होतो. गुळाचे दान केल्याने आनंद वाढतो.

मेष: मेष राशीचे लोक स्वभावाने तापट असल्याने त्यांनी या दिवशी दूध, दही, तूप, ताक यथाशक्ती दान करावे.

वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्याने आपल्या क्षेत्रातील प्रगतीसाठी मंदिर, मठ, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला आर्थिक स्वरूपात दान करावे.

मिथुन: ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. या लोकांनी बुद्धीतेज लाभण्यासाठी लोणी किंवा तूप दान करावे.

कर्क : कर्क राशीच्या लोकांची मनस्थिती आणि परस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी अन्नदान तसेच वस्त्रदान करावे.

सिंह: या राशींचा स्वामी सूर्य असल्यामुळे त्यांनी तांब्याच्या वस्तू दान कराव्यात.

कन्या : या राशीचा अधिपती ग्रह बुध असल्याने त्यांनी शैक्षणिक वस्तूंचे दान करावे.

तूळ : यादिवशी जव शिवामूठ म्हणून वाहायचे असल्याने त्याचे तसेच तांदळाचे दान करावे.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी एखाद्या गरीब कुटुंबाला अन्न धान्य दान करावे किंवा किराणा सामानाच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करावे.

धनु: या राशीचा स्वामी ग्रह गुरु गुरु असल्यामुळे या लोकांनी लोकरीचे वस्त्र किंवा उबदार कपडे दान करावेत.

मकर: मकर राशीचे लोक शनी देवाच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांनी काळ्या रंगाच्या वस्तू तसेच वृद्धाश्रमाला आर्थिक दान करावे.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामीदेखील शनिदेव असल्याने त्यांनीही लोखंडी वस्तूचे, चपलांचे, उबदार कापडाचे दान करावे.

मीन: मीन राशीच्या लोकांनी एखाद्या जोडप्याला जेवू घालावे किंवा अन्नधान्य दान करावे.

वापरातील वस्तु, श्रावणात महिलांनी घरामध्ये असलेली वापरातील वस्तु वापरू नये. असे केल्याने घरात दारिद्रय येऊ शकते.

झाडू, महिलांनी घरातील झाडू ही या महिन्यात कोणाला देऊ नये. कारण झाडू ही घरातील लक्ष्मी मानले जाते. कारण घरात केर काढल्यानंतर स्वच्छ घरात लक्ष्मीचा वास असतो.

मीठ आणि मसाले, घरात बनवलेल्या पदार्थांना स्वाद आणणारी गोष्ट म्हणजे मीठ आणि मीरपुड महिलांनी दान करू नये. असे करणे अशुभ मानले जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *