नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ , ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः… हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीचं विशेष महत्त्व मानलं जातं. श्रावण महिन्याच्या वद्य पक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हटले जाते.
या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून, आंघोळीतून निवृत्त झाल्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान करून आणि पूजास्थळाची स्वच्छता केल्यानंतर श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करावी. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे
आणि अश्वमेध यज्ञाचे फळ देते. या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यानंतर कथा वाचावी किंवा ऐकावी. निराहार राहून सायंकाळी फराळ करावा तसंच दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा दिल्यानंतरच अन्न ग्रहण करावे.
धार्मिक श्रद्धेनुसार, जो माणूस हे व्रत करतो तो शेवटी सर्व सुख उपभोगल्यानंतर विष्णू लोकात जातो. तसेच या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात. त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील.
10 सप्टेंबर,रविवारी, मोठी अजा एकादशी आली आहे, घरात इथे एक वाटी तांदूळ ठेवा, ज्यामुळे घरात पैसा येईल, बरकत होईल, सुख-समृद्धी नांदेल, लक्ष्मीचा वास होईल. रविवारी दिवशी अजा एकादशी येत आहे,
या एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे, एक तोडगा करायचा. हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैसा टिकू लागेल , पैसा पाण्यासारखा खरचने बंद होईल, उलट बरकत होईल, समृद्धी नांदेल, लक्ष्मीच्या वास होईल म्हणून मनोभावाने ,
श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करा. एकादशीचा दिवस हा माता लक्ष्मी आणि विष्णू देवाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण त्यांची पूजा करावी, त्यांना प्रसन्न करावे, जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावर होऊ शकेल,
तुम्हाला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत, हे तांदूळ आपल्या घरातच वापरायला असणारे तांदूळ घेऊ शकता, तांदूळ घेतल्यानंतर दिवसभरातून केव्हाही सकाळी- दुपारी- संध्याकाळी दिवशी- एकादशीच्या दिवशी तुम्हाला ही वाटी देवघरात ठेवायचे आहे.
तांदूळ घेऊन झाल्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा, त्यानंतर हळद-कुंकू अक्षता आणि फुले वाहून त्या तांदुळाचे पूजन करायचे व त्यानंतर स्वामींचे पूजन करायचे व लक्ष्मीचे पूजन करायचे आणि विष्णू देवाची पूजा तुम्हाला करायचे आहे. एक मंत्र जो आहे. “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”
या मंत्राचा जप करीत पूजा करावी. जमेल तितका जास्त जप करावा.कारण हा विष्णू देवाचा चमत्कारी मंत्र आहे. जप झाल्यानंतर तुम्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे.
आपल्या घराच्या सुखासाठी, घरातील शांती समाधानासाठी, यशासाठी प्रार्थना करावी. यानंतर हे तांदूळ तसेच देवघरात ठेवायचे आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ देवपूजा झाल्यावर हे तांदूळ नमस्कार करून अंगणात पाखरांना खाऊ घाला किंवा वाहत्या पाण्यात तांदुळाच विसर्जन करायचे. अशा रीतीने तुम्ही हा उपाय एकादशीच्या दिवशी अवश्य करा तुम्हाला नक्की लाभ होईल. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.