फक्त या गोष्टी करा, डोळ्याचा चष्मा काढून फेकाल!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सध्याच्या काळात स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहने तसेच चुकीचा आणि अवेळी आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

कमी वयात चष्मा लागणे ही आजकल सामान्य गोष्ट झाली आहे. या समस्येला कंटाळलेले लोक हतबल होऊन नेहमीसाठी चष्म्याचा वापर सुरु करतात. परंतु एकदा लागलेला चष्मा कायम वापरावाच लागतो असे नाही.
चष्मा लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे डोळ्यांची व्यवस्थित निगा न राखणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा अनुवंशिकता असू शकते. यामधील अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांमुळे लागलेला चष्मा, योग्य निगा आणि आहाराकडे लक्ष दिल्यास तसेच काही घरगुती उपचार केल्यास दूर होऊ शकतो.
पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपावे. सकाळी अनवाणी पायाने हिरव्या गवतावर थोडावेळ चालावे. अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास डोळ्यातील कमजोरी कमी होईल.डोळ्यांच्या आसपास अक्रोड तेलाने किंवा एरंडेल तेलाने हलकी मालिश करावी. यांमुळेही दृष्टी तेज होऊन चष्मा दूर होण्यास मदत होते.
एका शेंगदाण्याच्या आकाराएवढी तुरटी गरम करून त्याची पूड करा. शंभर ग्रॅम गुलाबपाण्यामध्ये ही पूड टाका. दररोज संध्याकाळी या गुलाबपाण्याचे चार-पाच थेंब डोळ्यात टाका. पायाला शुद्ध तुपाने मालिश करा. या उपायाने चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल.

त्यामुळेच अनेक लोकांना चष्मा लागत आहे. येथे चष्मा कायमस्वरूपी घालवण्यासाठी उपयुक्त असा घरगुती उपाय आपल्या आयुर्वेदात सांगितला आहे. या उपायामुळे डोळ्याचा नंबर कमी होऊन तुमचा चष्मा कायमचा निघून जाण्यासाठी मदत होईल.

डोळ्यांच्या काही समस्या असतील जसे की डोळे दुखणे, डोळ्यांची आग होणे ,डोळे लाल होणे व व्यवस्थित न दिसणे आणि डोळ्यांच्या समस्या दुर होण्यास मदत होते. यामुळे डोळे निरोगी राहतील तसेच डोळ्याच्या नसांना ताकत मिळते.

दृष्टी सुधारण्यास मदत होते. जर वारंवार डोळे लाल होत असतील किंवा डोळ्यांची आग होत असेल त्यासाठी गाईचे तुप उपयुक्त ठरते.

हे गाईचे तुप रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांना लावायचे आहे आणि दोन्ही तळपायांना तुपाने मसाज करून, ते तूप नाभीमध्ये सोडायचे आहे. यामुळे डोळ्यांची ताकद वाढण्यास मदत होते. तसेच दोन चमचे दही घेऊन त्यात 4 ते 5 काळ्यामिऱ्या मिश्रण करायचे आहे.

त्यानंतर एक चमचा कच्ची बडीशेप आणि खडीसाखर खायची आहे. ही खडीसाखर बारीक करून घेतल्यावर ती दहीमध्ये मिक्स करायची आहे. जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तूम्ही एक वाटी दूध घेऊ शकता.

हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी चहा प्यायच्या वेळेस घ्या. हे मिश्रण दिवसातून फक्त एकच वेळी घ्या. त्यावेळेस हे मिश्रण पुर्ण खाऊन घ्या.

दोन्ही उपाय तुम्ही काही दिवस केल्यास तुमच्या डोळ्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत होते. जसे की डोळे लाल होणे तसेच तीन महिन्यात तुमचा चष्मा देखील निघून जाईल.

अगदी साधा सोपा आणि घरगुती उपाय हिवाळ्याच्या दिवसात दुधाचा वापर तुम्ही करू शकता. तसेच सतत अत्याधुनिक गॅजेट्सचा वापर मर्यादित करावा. थोड्या-थोडया वेळाने डोळ्यांना विश्रांती द्यावी.

त्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. डोळ्यांचे काही काही व्यायाम देखील करावेत. डोळ्यांसाठी उपयुक्त प्रथिने असणारी फळे व भाज्या खाव्यात.

त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच काही आसने, योगा करावेत ज्यामुळे डोळ्यातील नसांना आराम मिळेल. डोळे वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावेत. काम करताना अधून मधून डोळ्यांवर अलगद हात फिरवावा.

जिरे आणि खडीसाखर समान प्रमाणात घेऊन बारीक वाटावीत. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्यावे. यामुळे दृष्टी चांगली होऊन चष्म्याचा नंबर जाण्यासाठी मदत होते.

रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला थोडे खोबरेल तेल किंवा तिळ तेल लावून कांस्याच्या वाटीने मालिश करावी. यामुळेही झोप व्यवस्थित लागते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारते व चष्मा लवकर दूर होतो.

रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लासभर ते पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे दृष्टी सुधारण्यास व डोळ्यांचा नंबर कमी होण्यास मदत होते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!