महालक्ष्मीला प्रिय असणारा असा नारळ जे मिळाला तर लगेच घरी घेऊन या, झोपलेलं नशीब जाग होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, देवी लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते. ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते तिथे पैशाची कमी नसते. देवी माता तिथे नेहमी वास करते. घर नेहमी स्वच्छ ठेवणे, घरातील नको असणाऱ्या तुटक्या, फुटक्या वस्तू बाहेर काढणे यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो.

तसेच घरातील अशा काही वस्तू आहेत जय नेहमी घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या वस्तू जर घरात असतील तर तुम्ही नेहमी धनवान रहाल. त्या वस्तू घरात नसतील तर तुम्ही आणून ठेवा. तुमच्या नोकरीत, व्यवसायात भरभराट हवी असेल,

माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर या गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात. पहिली वस्तू म्हणजे पिवळी कवडी या कवड्या समुद्रात मिळतात जिथे माता लक्ष्मी प्रकट झाली. त्यामुळे माता लक्ष्मीला या पिवळ्या कवड्या अतिप्रिय आहेत.

त्यामुळे तुम्ही पाच पिवळ्या कवड्या आणून शुक्रवारी माता लक्ष्मी व विष्णूंसोबत पूजा करून लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत जिथे धन ठेवता तिथे ठेवा तुमच्या घरी उत्तरोत्तर धनाची वृद्धी होईल.

नारळाला आपण श्रीफळ असे म्हणतो जे देवाला अर्पण केले जाते. नारळाला तीन डोळे असतात ज्याला भगवान शिवाचे फळ असेही म्हणले जाते. हे श्रीफळ तुम्ही देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता,

परंतु याहूनही चांगले म्हणजे जे दुर्मिळ असतात ते म्हणजे एक डोळा म्हणजे एकाक्ष नारळ होय. असर म्हणतात की हजारो नारळात एखादाच एकाक्ष नारळ असतो, जेव्हा तुम्ही घरी नारळ घेऊन याल

तेव्हा तो तपासून पहा व लकिली तुम्हाला जर एकाक्ष नारळ मिळाला तर तुम्ही भाग्यवान आहात. तो नारळ फोडू नका तसाच देवीच्या चरणी घरीच ठेवा.

तिसरी व प्रिय वस्तू म्हणजे कमळाच्या फुलांच्या बिया होय. कमळाच्या फुलांच्या बियांची माळ आपण घरी आणून ती लक्ष्मीच्या प्रतिमेला अर्पण करा व पूजन करा. माता लक्ष्मी कमळात विराजमान असते

त्यामुळे कमळ माता लक्ष्मीस खूप प्रिय आहे. शक्य असल्यास जेव्हा मिळेल तेव्हा कमळ माता लक्ष्मी देवीला अर्पण करा. तसे करणे शुभ मानले जाते.

चौथी वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावले. असे म्हणतात की लक्ष्मीची पावले घरात आणल्याने साक्षात लक्ष्मी घरात वास करते. चांदीची पावले असलेली प्रतिमा घरी असावी तसे शक्य नसल्यास बाजारात इतर धातूची पावले सुद्धा मिळतात,

ही पावले शुभ चिन्हासोबतही असतात, जसे की मंगल कलश, स्वस्तिक, ओंकार चिन्ह व काही ठिकाणी लक्ष्मी यंत्र देखील असते. आवळ्याचे झाड शक्य असल्यास आपल्या अंगणात ,

कुंडीत लावा कारण आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो, जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते. त्यामुळे या झाडाचे पूजन रोज करावे. तसेच चांदीत माता लक्ष्मीचा वास असतो.

त्यामुळे घरी एखादे तर लक्ष्मीचे चांदीचे नाणे असावे. तसेच घरात लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र स्थापन करून त्याची पूजा केल्यास माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!