घुबड दिसल्याने काय होते ?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, बर्‍याचदा घुबडांचा आवाज एखाद्या अपशकुनाशी संबंधित असतो, परंतु प्रत्येक वेळी असे होत नसत. घुबडांचा आवाज काय सूचित करतो ते जाणून घेणे अधिक योग्य ठरेल. तथापि, अशा धारणेत विज्ञान शोधणे अवघड असत तरी परंपरा आणि श्रद्धेच्या आधारावर काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहे-

जनुश्रुतीच्या म्हणण्यानुसार घुबड रडण्याची आवाज गंभीर संकटाची चाहूल असते. घुबडाची आवाज रात्रीच्या पहिल्या प्रहर, द्वीतीय किंवा चतुर्थ प्रहरात ऐकू आल्यास इच्छा पूर्ण होते. अर्थात लाभ प्राप्ती आणि राजयोग देखील असू शकतात.

विश्वासानुसार घुबडांचा आवाज एकाच दिशेने वारंवार येणे, दिसणे अशुभ असतं. संकटाची चाहुल असते ‍किंवा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.

घुबड वारंवार उच्च स्वारात ओरडत असल्यास हानी होण्याचे संकेत समजावे. रात्री प्रवासासाठी निघताना घुबड प्रसन्न मुद्रेत मध्यम स्वरात आवाज करत असेल तर हे शुभ संकेत समजावे.

असे म्हणतात की घुबडच्या उजव्या बाजूला पहाणे किंवा बोलणे नेहमीच अशुभ असते, परंतु घुबड डाव्या बाजूस पाहणे चांगले आहे. घुबड गच्चीवर बसून आवाज काढत असल्यास एखाद्याची मृत्यूचे संकेत असतं.

सकाळी पूर्व दिशेकडे घुबड दिसल्यास किंवा आवाज येत असल्यास अचानक धन प्राप्तीचे योग बनतात.घुबड एखाद्या आजारी व्यक्तीला स्पर्श करत किंवा त्यावरुन उडत निघाल्यास गंभीर आजार देखील बरे होण्याची शक्यता वाढते.

एखाद्याच्या दाराजवळ घुबड तीन ‍दिवस रडत असल्यास तेथे चोरी, लूट किंवा आर्थिक हानीची शक्यता अधिक असते.

जर घुबड एखाद्या घरावर वारंवार येऊन बसत असेल तर विपत्तीचे संकट समजावे. पांढरं घुबड दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.

घुबड साधारणपणे लाजाळू असतात. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी घुबड दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते. रात्री घुबड दिसणे हे समस्यांपासून मुक्त होण्याचे संकेत मानले जातात. यासोबतच ते करिअरमधील प्रगतीही दाखवते. रात्रीच्या वेळी घुबडाचा आवाज ऐकणे हेही शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहे.

अनेक वेळा रात्री अचानक घुबड पाहायला मिळतं. जर घुबड सतत तुमच्याकडे एकटक पाहत असेल किंवा तुमची आणि घुबडाची वारंवार नजरानजर होत असेल हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

याशिवाय तुमच्या आयुष्यातून आर्थिक समस्या लवकरच संपुष्टात येणार आहेत. तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला घुबड दिसले तर ते शुभ मानले जाते.

जर एखाद्या व्यक्तीला दिवसा घुबड दिसले तर ते त्याच्यासाठी शुभ मानले जाते. हे एक लक्षण आहे की तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. यासोबतच तुमच्या आयुष्यात लवकरच काही सकारात्मक बदल होणार आहेत. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते.

आपण सर्वांनी काळे किंवा तपकिरी घुबड पाहिले असेलच, परंतु हिंदू धर्म शास्त्रानुसार पांढरे घुबड पाहणे खूप शुभ आहे.

पांढऱ्या रंगाचे घुबड क्वचितच दिसत असले तरी, जर एखाद्या व्यक्तीला पांढरे घुबड दिसले तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहेत असा समज आहे.हिंदू धर्मात, पांढरे घुबड मृतांच्या आत्म्याशी देखील संबंधित आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!