नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय…आपल्यावर किंवा आपल्या कुटूंबावर जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येणार असते तेव्हा तेव्हा आपली वास्तू म्हणजे आपलं घर विशिष्ट प्रकारे संकेत देऊ लागते.
जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल तर आपली वास्तू येणाऱ्या संकटा विषयी काही तरी आपल्याला संकेत देत आहे. अश्या वेळी या अपरिचित असणाऱ्या संकटा पासून आपलं आणि आपल्या कुटूंबाचे रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकता.
हजारो वर्ष्यापासून भारत देशात हा उपाय केला जात आहे. केवळ इतकंच करायचे आहे की आपल्या देवघरासमोर एक नंदा दीप लावून या एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे.
हा दिवा आपण तिळाच्या तेलाचा लावायचा आहे शक्य नसेल तर साध्या तेलाचा देखील लावू शकता. हिंदुधर्म शास्त्रात आणि जोतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्र मध्ये या तिळाच्या तेलाचे खूप महत्व सांगितले आहे.
अश्या या तिळाच्या तेलाचा नंदा दीप आपण लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर लगोलग जाणवेल की तुमच्या घरातील अस्वस्थता दूर झालेली आहे आणि हळूहळू घरात शांतता प्रस्थापित होत आहे.
अनेक लोकांना याची अनुभूती आलेली आहे. काही कारणांनी हा दिवा विझला तर काही काळजी करू नका. मनात कोणत्याही प्रकारच्या शंका न आणता आपण पुन्हा हा दिवा लावा .
पुन्हा हा दिवा लावल्यावर मनोभावे नमस्कार करा. हिंदुधर्म शास्त्रात दिवा म्हणजे प्रत्यक्ष भाग्यविधाता आहे. अश्या या दिव्याला नमस्कार करावा. या दिव्याखाली काही तरी आसन आवश्य असते.
कारण दिवा देवाचे प्रतीक आहे आणि म्हणून आपण देवाला बसायला आसन देतो त्या प्रकारे या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या असतील किंवा झाडाची पाने असतील किंवा एखादे पात्र असेल किंवा काही नसेल तर मूठभर तांदूळ असेल त्यावर आपण जर दिवा लावला तर अतिउत्तम मानले जाते.
दिवा अश्या प्रकारे खाली ठेऊ नये. त्याला आसन आवश्य असावे. पहिली दिशा उत्तर दिशा आणि दुसरी दिशा पूर्व दिशा या दोन पैकी कोणत्याही दिशेला आपण या दिव्याची वात करू शकता.
अस म्हणतात जर आपण या दिशेला वात केली तर त्या योगे वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीना सुख प्राप्त होते. सोबतच दीर्घायुषी देखील प्राप्त होते. म्हणजेच त्या घरात राहणारे लोक.
हे अकाल मृत्यूच्या भयापासून दूर राहतात. त्यांना अकाल मृत्यूचे भय राहत नाही. दीर्घायुष्य प्राप्त होते. दिपाचे जे तोंड आहे ते चुकूनही दक्षिणेकडे करू नका किंवा पश्चिम दिशेला सुद्धा करणे आपण टाळावे ते हानिकारक मानले जाते.
जर आपल्याला अस वाटले की घरात खूप मोठ्या प्रमाणत निगेटीव्ह एनर्जी आहे खूप मोठं मोठी संकटे येऊ शकतात तर आपल्या घरातील चारही कोपऱ्यात आपण चार दिवे लावावेत .
पाचवा आपण देव घरासमोर प्रजवलीत करावा. जे जे काही दोष आहेत येणारी संकटे आहेत ती नष्ट होतील. वास्तूमध्ये सुख सौभाग्य वास करू लागेल. हिंदू धर्म शास्त्र अस मानते की ज्या घरात दिवा तेवत ठेवला जातो त्या घरात आनंदाची निर्मिती होते.
सुख शांती त्या घरात निर्माण होते. या दिव्यातून जी दिव्य किरणे बाहेर पडतात. ही किरणे आणि आपल्या इलेक्ट्रिक ब्लब मधून बाहेर पडणारी किरणे याच्या मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो.
ज्या ज्या वेळी तुम्हाला शंका येईल की आपल्या घरावर बाधा येत आहेत. काही संकटे निर्माण होतील तेव्हा दिवा लावून हा मंत्र कमीतकमी 21 वेळेस व 108 वेळेस करा. दुर्गा मंत्र हा खूप शक्तिशाली मानला जातो. यामुळे तुमचं प्रत्येक संकट दूर करेल माता दुर्गा देवी. अतिशय सोपा असा मंत्र आहे.
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। प्रत्येक गुरुवारी दत्त गुरूचरित्र मधील 12 वा अध्याय जरूर पठण करा. यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. पण स्वच्छ शुद्ध भाव ठेऊन प्रामाणिक प्रयत्न करून निस्वार्थी मनाने पठण करा कोणतेही संकट पार होणारच.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.