नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरी सतत वाद, चिडचिड, कलह होत असतील, अचानक दुर्घटना घडत असतील व तसेच कितीही प्रयत्न करून देखील आपल्याला यश मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल तर हा उपाय नक्की करा.
उपाय म्हणजेच आपल्या घराभोवती जर ही झाडे असतील तर ती त्वरित हटवा, कारण त्यांचा परिणाम आपल्या घरावरती, घराच्या सुखावरती होत असतो तसेच आपल्या होणाऱ्या दुर्घटना यामुळे होत असतात. आपल्या घरासमोर जर ही काही झाडे असतील तर तुमचं घर बरबाद होईल,
घरात येणारा पैसा टिकून राहणार नाही, कितीही पैसे आले तरी ते वायफळ खर्च होतील. तसेच कोणती झाडे लावणे शुभ ठरेल हे देखील महत्वाचे आहे, त्याची देखील आपल्याला माहिती हवी. सर्वांत पहिले म्हणजे घरासमोर काटेरी झाडे लावणे खुप अशुभ मानले जाते.
याला 2 अपवाद आहेत .त्यामध्ये प्रामुख्याने गुलाब आणि कोरफड याचा समावेश होतो या झाडांनी घरावरती काही परिणाम होत नाहीत. पण इतर काटेरी झाडे काही लोक घरात सजावटीसाठी ठेवतात.
त्याने घरात कलह निर्माण होतो आणि दुसरे झाड आहे ते पपईचे झाड. हे झाड जरी दिसायला चांगले दिसत असले तरी हे घरासमोर असल्यास घरात धन हानी होते. यानंतर देवाची वनस्पती म्हणून प्रचलित असलेले झाड म्हणजे रुईचे झाड ही घरासमोर असू नये
आणि असेल तर ते काढुन टाका. तसेच पिंपळाचे आणि वडाचे झाड सुध्दा; दोन्ही झाडे वातावरण निर्मितीसाठी जरी आवश्यक किंवा फायदेशीर असली तरी, ही झाडे आपल्या घरासमोर असल्याने घरात खुप अडचणी येतात.
पण ही झाडे उपटून टाकण्यापूर्वी 2 नवीन रोपटी आधी लावा मग 2 झाडे काढून टाका. त्यामुले 2 झाडे उपटून टाकल्याचे दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाहीत. पातक लागत नाही. कोणत्याही प्रकारचा घराच्या भिंतीवर चढणारा वेल असल्यास तो काढून टाका.
त्याने खूप सारे अनिष्ठ परिणाम आपल्या कुटुंबाला होऊ शकतात. तसेच या अशुभ वनस्पती बरोबर काही शुभ वनस्पती पण आहेत की ज्या घरासमोर लावल्यास घरात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते.
यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट हे सर्वात महत्त्वाचे शुभ झाड किंवा वनस्पती घरासाठी मानली जाते. याला पैशाचे झाड असेही म्हणतात . शमीचे झाड देखील घरासमोर चांगले मानले जाते.
तसेच तुळस ,कडीलिंब ,बेलाचे झाड , नारळ ,अशोक आणि चंदन , रक्तचंदन, नागकेशर आणि चाफा ही झाडे किंवा वनस्पती लावल्याने घरात पैशाचा पाऊस पडतो. तुम्हाला आवडणाऱ्या झाडांची लागवड तुम्ही अवश्य करावी पण जवळपास तुम्ही या झाडांची लागवड करू नका,
दूर कुठंतरी, शेतात अशी झाडे लावा व जतन करा. पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी झाडे लावावीत पण घरातील परिस्थिती, सुख, समृद्धीचा विचार करता निसर्गातील विविध ठिकाणी,
निर्मनुष्य ठिकाणी तुम्ही या घराजवळ न लावता येणाऱ्या झाडांची मशागत करू शकता. अशा प्रकारे तुम्ही वृक्षप्रेम व्यक्त करू शकता, आपलं शास्त्र विज्ञान आहे अंधश्रद्धा कोणतीही नाही.
मेंदी किंवा हीना सौंदर्याच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. हे वेगवेगळ्या वेळी वापरले जाते. मेंदी हे सौभाग्याचे लक्षण म्हणूनही ओळखले जाते. हे केवळ सुंदर मानले जात नाही तर त्याचा अध्यात्माशीही खोल संबंध आहे.
मेंदी वधूच्या तळहातावर आणि पायावर सजावट करून लावली जाते. मातृत्वासोबतच पती-पत्नीमधील अतूट प्रेमाची भावनाही यात दिसून येते. हातावर मेंदी लावणे हे शुभाचे प्रतीक मानले जात असले तरी त्याचे रोप घरामध्ये लावणे अजिबात शुभ मानले जात नाही.
वास्तु तज्ज्ञांच्या मते, यामुळे नकारात्मकता निर्माण होते. असे मानले जाते की मेंदीच्या रोपावर वाईट आत्म्यांची सावली लवकर पडते. अशा परिस्थितीत घरात चुकूनही मेंदीचे रोप लावू नये.काही लोक नकळत चिंचेचे रोप आपल्या घरात लावतात, ज्याचा वास्तुशास्त्रानुसार विचार केला जात नाही.
असे म्हटले जाते की ते केवळ घरातच नाही तर घराच्या आसपास असणे देखील शुभ नाही. ज्या लोकांच्या घराजवळ चिंचेचे रोप असते त्यांना त्यांच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
यामुळे कुटुंबातील सदस्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते, घरातील प्रमुखांसह इतर लोकांच्या व्यवसायात प्रगती होऊ शकत नाही, घरात त्रास इत्यादी असू शकतात.
वास्तु तज्ज्ञ म्हणतात की घरात किंवा घराच्या आजूबाजूला एकही बोराचे झाड नसावे. असे म्हटले जाते की सर्व वनस्पतींपैकी, सर्वात नकारात्मक परिणाम देणारी वनस्पती बोराटीची मानली जाते. या वनस्पतीबद्दल अशी श्रद्धा आहे की यामुळे घरामध्ये गरिबी येते.
जरी असे क्वचितच घडते की लोक त्यांच्या घरात कापसाचे रोप ठेवतात, परंतु काहीवेळा लोक सजावटीसाठी कापसाचे रोप घरी आणतात. त्याची फुले दिसायला खूप सुंदर वाटतात.
असे मानले जाते की घरामध्ये कापसाचे रोप लावू नये कारण हे रोप लावल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. याशिवाय वास्तूनुसार ही झाडे दुर्दैव आणि गरिबीला आमंत्रण देतात, त्यामुळे ही झाडे घराबाहेर ठेवावीत.
जर तुमच्या घराभोवती बाभळीचे रोप असेल तर ती चांगली गोष्ट नाही. वास्तूनुसार बाभळीची वनस्पती जीवनात संकट आणणारी असते. बाभळीच्या रोपातून नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य अनेकदा आजारी राहू शकतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.