नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्म पुराणात काही गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यांचा लाभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात बरेच बदल घडवतात. त्यामुळे घरी सुख ,समृद्धी, धन, दौलत, समाधान म्हणजे एकूण एक चांगली परिस्थिती राहते.
पण जर काही अशुभ संकेत आपल्या सभोवताली घडत असतील तर आपल्याला मात्र सावध रहावं लागत. हे अशुभ संकेत कोणते ते आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये अशा पाच गोष्टी आहेत ज्यांचा परिणाम आपल्या कुटुंबावर वाईट रित्या होतो, म्हणजेच एखादं संकट घेरा घालत असतं.
असे कोणते पाच संकेत आहेत जे अशुभ आहेत. या अशुभ गोष्टींमध्ये प्रचंड मोठी नकारात्मकता असते. गोष्टी घडतात पण त्यांचे परिणाम वाईट असतात. या गोष्टी आपल्याला सूचना देत असतात ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.
या गोष्टी तुम्ही जर वेळीच समजून नाही घेतल्या तर येणाऱ्या काळात तुम्हाला नुकसान होऊ शकते, तुमच्यावर मोठे संकट येऊ शकते. तसेच तुम्ही बरबाद होऊ शकता, म्हणून वेळीच जाणून घ्या या पाच गोष्टी.
जर तुम्ही वेळीच सावध झालात तर नक्कीच तुम्ही स्वतःला, तुमच्या कुटुंबाला वाचवू शकता.
जर तुमच्या घरातील टेबल, खुर्ची किंवा बेड , अशा वस्तू ज्यावर तुम्ही उठता, बसता, झोपता , जर अशा गोष्टी अचानक तुटल्या तर हा एक अत्यंत अशुभ संकेत मानला जातो.
त्यामुळे तुमच्या किंवा तुमच्या जीवलगाच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे हे नक्की! त्यामुळे वेळीच सावध राहून स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवा.
तुमच्याकडे असणारे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने किंवा हिऱ्याचे दागिने जर का अचानक हरवले तर समजून जा की नजीकच्या काळात मोठं अमंगल काहीतरी घडू शकतं. पण जर का चोरी झाली असेल तर तो कोणत्याही प्रकारचा संकेत नसतो. पण जर हरवले तर नक्कीच सावधगिरी बाळगा.
सजलेली स्त्री, साज शृंगार करून एखादी स्त्री जर भेटली किंवा दिसली तर ती गोष्ट शुभ असते पण जर तीच श्रुंगार करून नटलेली सुंदर स्त्री जर तुमच्या नेहमी स्वप्नात येत असेल तर नक्कीच सावध व्हा. त्यामुळे लवकरच एखादं संकट तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. अशी समस्या जी तुम्हाला बेचैन करून सोडेल.
तुमच्या घरी जर भरपूर प्रमाणात उंदीर झाले असतील, किंवा मधमाशा, इतर खूप सारे जीव जंतू वारंवार होत असतील तर समजून जा की मोठे आजारपण येणार आहे आणि तुम्ही सावध राहून वेळीच त्यांचा नायनाट करायला हवा.
घराजवळ एखादं वाद्य वाजत असेल जसे की ढोल एखाद्या कार्यक्रमात वाजत असतील आणि त्यांचा आवाज तुम्हाला जर पानांच्या सळसळता आवाज जसा असतो तसं
भासत असेल तर नक्कीच सावध व्हा आणि तुमच्या नजीकच्या येणाऱ्या काळात प्रचंड उलथापालथ होणार आहे हे लक्षात घ्या कारण हा खूप मोठा अपशकुन असतो.
वास्तूशास्त्रानुसार, राहूचे प्रतिक गोम मानले जाते. त्यामुळे घरात शुभ आणि अशुभ अशा घटना घडू शकतात. त्यासाठी घरात गोम कुठे, कुठल्या अवस्थेत आढली यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात.
जर गोम पूजा घरात किंवा पूजा करत असलेल्या ठिकाणी दिसली तर त्याचा अर्थ असा की, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकरच होईल. तसेच धनलाभ मिळण्याचेही हे संकेत आहेत.
जर घरात गोम दिसून आली आणि अवघ्या काही सेकंदांत गायब झाली तर त्यालाही शुभ संकेत मानले जाते. हे या गोष्टीचे संकेत आहे की, तुमचे एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल.
ज्योतिषशास्त्रात, गोम ला राहू ग्रहाचं प्रतिक मानन्यात आलं आहे. यामुळे घरातून बाहेर पडण्याच्या वाटेवर जर गोम दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते. कारण, घरातून बाहेर जाणारी गोम तुमच्या सर्व समस्याही तिच्यासोबत घेऊन जाते असे मानले जाते.
घरात जर गोम मृतावस्थेत आढळून आली तर ते सुद्धा शुभ मानले जाते. पण गोमला स्वत:हून मारु नका. जर ती नैसर्गिकरित्या मृतावस्थेत आढळून आली तर ते शुभ मानले जाते.
याचा अर्थ असा होती की, तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार होते पण ते आता टळले आहे. हे पाच संकेत जर असतील तर वेळीच सावध व्हा आणि जरूर कटाक्षानं वागा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.